post 14 vidya diary

वाचन  लेखकाची शब्दांची भूक भागवते !
.....
ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं!
....

आताच्या जगात सर्वात सुखी प्राणी कोण?
ज्याचो भाऊ आणि मित्र फोटोग्राफर असतत !
🤣
स्वानुभवाचे बोल !
....

आपण आपल्या जवळच्या व्यक्तीलाच का त्रास का देतो?
आपलं माणूस आहे म्हणून गृहीतच धरतो.

विद्या

.....

लोकं आपल्या सोबत अशी का वागतात हे आपल्याला दिसत पण आपण सुद्धा परिपूर्ण नाही हे मात्र कळत नाही.आपण सुद्धा तसेच वागतो कधी कधी इतरांसोबत हे का विसरतो ना माणूस . आपल्यावर अन्याय झाला की आपण बोलतो आपण दुसऱ्यावर अन्याय केला ते काही लक्षात राहात नाही  कोणाच्या ! दुसऱ्याच्या चुका बघण्यात इतके व्यस्त असतो की आपल्या चूका कधी का होत असेना ह्या कडे लक्ष द्यायला जमत नाही ! #vidya

.....

अंतर वाढण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं. हे सगळं ठरवलेलं असत . आपण फक्त स्वीकाराच.
#vidya
......
नमस्कार, मी वाचक आहे इथे. सगळ्या लेखन करणाऱ्यांना शुभेच्छा! असा छान उपक्रम सुरू केल्या बद्दल आणि इतरांनी भाग घेतल्या बद्दल.मी जी ए ची पत्रे वाचली आहे.इतर लेखन वाचायचं बाकी आहे. जी ए गूढ व्यक्तिमत्त्व वाटले.म्हणून त्यांची लेखणी ही तितकीच गूढ . जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत वाचन ,मनन ,चिंतन करायचं ! धन्यवाद ! 🙏 
विद्या

....

Viviana mall मध्ये दोन T-shirt वर १५० रु कमी करणार असं लिहिलेलं असून सुद्धा १५० कमी करणार नाही बोलले मग माझ्या ओळखी चे दोघे ते t shirt counter वरच टाकून आले!

News

....


मी १५ वी पर्यंत फक्त व्यावहारिक शिक्षण शिकत राहिली.आई ने कधी ही जेवण करायला सांगितले नाही पण आम्ही संजीव कपूर आणि पराग असो सगळे कूकिंग शो बघायचो.पण आई असताना काही फसले बेत आणि काही छान झाले.
आता मी आणि भावाने #foodloverslife channel सुरू केला आपल्याच recipe चे video आपल्या साठी पुन्हा पुन्हा बघायला! ❤️ पहिल्या lockdown मध्ये हेच केलं.  बघता बघता ५० च्या आसपास झाले.☺️

Vidya
....
जसं जस वय वाढतंय तस तसं मन दगड होतंय. कशाचाच फरक पडत नाही. जगाचा माणसांचा आरसा समोर येतो.माणसं वाचन चांगलं पण त्रास ही तितकाच होतो . लेखन करणाऱ्या व्यक्तीला जास्तच जाणवतं.

...

माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच अनंताच्या प्रवासाला जातो.
आयुष्यात माणसं भेटतात भेटीगाठी होतात . काही आयुष्यभर सोबती होतात काही मध्येच आपापल्या वळणावर वळतात.कदाचित आपला आणि त्यांचा सहवास तेवढाच असतो. कधी आपण ही आपला मार्ग निवडतो.



© #vidyamslife


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .