स्त्री धर्म

धर्म रूढी परंपरा पाळणं सुवासिनी म्हणून दागिने अनिवार्य घालणं हे सगळं स्त्रियांसाठी आहेत  । पुरुष प्रधान संस्कृती पण स्त्रियांचाच पाठिंबा असतो ह्या गोष्टींना ।

त्यांना स्वतः चे विचार च नसतात माहेर आणि सासर चे  सगळे  शिकवतात हे असंच वागायचं | काही जणींना  विरोध करावासा वाटतो पण   वाद होतात म्हणून शांत राहणं पसंत करतात ।

संमेलन

संमेलना मुळे साहित्यिकांच्या भेटी गाठी होतात । वाचक आणि साहित्यिक,प्रकाशक  एक ठिकाणी भेटतात । राजकारण असलं तरी प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू दोन्ही असतात ।

साहित्य संमेलन

साहित्यिकांना संमेलनाची गरज आहे की
संमेलनाला साहित्यिकांची ??
दुसरं उत्तर येईल तेव्हा साहित्य संमेलन सफल झालं असं मी तरी समजीन।

साहित्य मंडळाने कविता निवडली म्हणजे कवींनी आधीच हि  कविता सदर करणार आहोत हे पूर्व माहिती दिली असते ... कविता निवडण्या पेक्षा कवीची निवड होते असं म्हणीन मी ..... खर्च फक्त मोठ्या साहित्यिक मान्यवर यांचाच करतात ... अजूनही ...  आणि एक ह्या कविता निवड प्रक्रीये मध्ये पण राजकारण असतं कधी कधी अपवाद असू शकतात ..

प्रजा सत्ताक दिवस

देशभक्ती च्या दिवशी काही लोकं आवर्जुन न चुकता लिहितात दोन दिवस तुमचं देशप्रेम उफाळून येतं म्हणे । ह्याचा अर्थ काय
वर्षाचे 12 महीने देशवासियांना काहीच वाटतं नाही असं थोडी असतं । मैत्री दिवस , भाऊबीज , आई ,वडिलां साठी असे खूप सारे दिवस साजरे करतो म्हणजे त्यांच्या वर एक दिवसा पुरतं प्रेम आहे असा अर्थ निघतो की यांच्या विचाराने  । प्रत्येक दिवसांच वेगळं महत्त्व असतं  व्यक्त करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी वेगळे  दिवस असतात  हेच विशेष ।  #Vidya

देशभक्ती

देशभक्ती च्या दिवशी काही लोकं आवर्जुन न चुकता लिहितात दोन दिवस तुमचं देशप्रेम उफाळून येतं म्हणे । ह्याचा अर्थ काय
वर्षाचे 12 महीने देशवासियांना काहीच वाटतं नाही असं थोडी असतं । मैत्री दिवस , भाऊबीज , आई ,वडिलां साठी असे खूप सारे दिवस साजरे करतो म्हणजे त्यांच्या वर एक दिवसा पुरतं प्रेम आहे असा अर्थ काढायचा का मग  यांच्या विचाराने  ?  प्रत्येक दिवसांच वेगळं महत्त्व असतं  . व्यक्त करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी वेगळे  दिवस असतात  हेच विसरून कसं चालेल ।  दुसरे काय करतात ह्यापेक्षा आपण देशासाठी काही अंशी तरी काही करू शकतो का हा विचार करणं महत्त्वाच नाही का वाटतं  #Vidya

कृष्ण राधा

प्राक्तन , विधिलिखित  .. यांच्या पुढे  भावनेला महत्त्व कमी । यशोदा , देवकी , वासुदेव असो किंवा गोपिका सर्वानी तप केलेल पूर्व जन्मी म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला कृष्णाच प्रेम लाभल । राधा कृष्ण वियोग शाप होता त्यांना म्हणून झालेला ।

संस्कार

संस्कार लहानपणा पासून केले की खोल रुजतात मनात।  मग ते धर्माचे असो वा संस्कृती चे ।

नाती


वळण

भारतीय स्त्रिया

कसल्या सुंदर दिसतात भारतीय स्त्रिया ...एकदा तरी भारतीय नृत्य पाहायला हवच सर्वांनी स्त्रियांनी सुद्धा ! नको ते लठठ्पणा च्या गोष्टी करून स्वत : ला बारीक होण्या साठी धडपडतात ! मानसिक ताण तो वेगळाच ! स्वत : ला आहोत तसं स्वीकारावं उगाच कोणाचं ऐकून मनस्ताप करून घेण्यात काहीच अर्थ नसतो #vidya

उपवन फेस्टिव्हल मधल्या गोष्टी

कोणी बाईक वर मैत्रिणीला सांगत होत की साडी नेसू नको

आई मुलीला शिकवण देत होती वाटतं टेम्पो म्हणजे काय

एक मुलगी फोटो काढताना हरवली
आणि बाबा पुढे गेले मग रडत होती विचारल तर balance नाही मी फोन करते तेवढयात  तिचे बाबा दिसले

एक गरीब मुलगी फुगे विकत होती
दोन मुलींनी फोटो काढले तिचे
आणि नंतर तिला दाखवले
आणि पळता पळता चक्क लाजली ती ।
उपवन रंग मना मनाचे
तरुणाई फोटो मध्ये दंग आहे हे मात्र निश्चित ।

#vidya

13.1.2018

आठवणी

एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरू होतो आपण उगीच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून ।समोरच्याच अस्तित्व आपल्या मानण्यावर असतं ना । मला  नाही पाहता आलं  आई ला माझी मैत्रिण च होती पहिली मला समजून घेणारी सुद्धा  । प्राक्तनाचे भोग भोगावेच लागतात चांगले असो वा वाईट त्या शिवाय सुटका नसतेच मुळी । पण चांगल्या आठवणी कायम स्मरणात राहतील । काळ किती वेगाने धावतो । येत्या एप्रिलमध्ये दहा वर्षे होतील आई देहाने दुरावली त्याला मनाने मात्र कायम च सोबत राहील आणि असतेही  <3 #vidya

15 jan 2018
10.56 am

वारस

म्हणून मी मागेच लिहील होतं मातृत्व उपजतच असतं स्त्री मध्ये त्यासाठी आई होण्याची अट नसते .. पण आपल्याला समाजाचे विचार अजून पण संकुचित बुरसटलेलेच आहेत .. वारस मिळाला नाही म्हणून शिकलेल्या सुनांना  पण त्रास देतात हि लोक.. :(

15.1.2018

ऋतुरंग

ऋतुरंग ई पुस्तक  साहित्य

मी माझ्या मैत्रिणीच, नीता जयवंत याचं पुस्तक प्रकशित केल आहे वाचकां साठी मोफत उपलब्ध आहे . जरूर वाचावे आणि प्रतिक्रिया कळवाव्यात .

मोफत ई पुस्तक उपलब्ध @
http://eaksharman.blogspot.in/2017/03/blog-post_70.html
किंवा  @ https://drive.google.com/file/d/0B5A6Xt0lKacmUkJVREZxMXVhTG8/view

Fb group post @ https://m.facebook.com/groups/204761046648876?view=permalink&id=396073867517592

Fb वरील अनुभव

माणस ओळखा यला शिकलो हे अनुभवलं मी ही आणि जुळले विचार तर नाती जोडली गेली काही नको असलेले वाईट लोकं ही तोडली गेली भले त्या व्यक्ती किती ही नावाने मोठ्या असो साहित्य क्षेत्रात मान असो। #vidya

15.1.2018

प्रश्न

मी पण शोधते आहे मकर संक्रांतीला काळे च कपडे कशाला !आपल्याला तर मुळात तो रंग च आवडत नाही। ☺️

भारतीयभाषेचा आग्रह

स्वकीयांची हिंदी  भाषा चालत नाही मात्र परकियांची इंग्रजी बरी चालते यांना।  काल #SanskritiArtFestival  च्या  भारतीय नृत्य कार्यक्रमात फक्त इंग्रजीच भाषेचाच वापर करण्यात आला होता । मराठी नाही आली तरी हिंदी भाषेचा तरी वापर करावा इतकी अपेक्षा आहे #1

इंग्रज गेले तरी इंग्रजी चा उधो उधो करणारे स्वकीयच । आयोजकानीं आधीच ठरवलं पाहिजे हिंदी चा वापर करा नाहीतर मराठी तरी। #2

स्वकीयांची हिंदी  भाषा चालत नाही मात्र परकियांची इंग्रजी बरी चालते यांना।  काल संस्कृती कला फेस्टिव्हल  च्या  भारतीय नृत्य कार्यक्रमात फक्त इंग्रजीच भाषेचाच वापर करण्यात आला होता । मराठी नाही आली तरी हिंदी भाषेचा तरी वापर करावा इतकी अपेक्षा आहे #3

16.1.2018

नाते

Quotes and Editing



कवीचे प्रकार

कवीचे दोन प्रकार असतात व्याकरणाच्या बंधन पाळून कविता लिहिणं आणि दुसरं सुचेल तेव्हा मुक्त कविता लिहिणं। आपला स्वभाव मुक्त आहे बंधनात राहायला आवडत नाही म्हणून आम्ही तरी मुक्त कविता लिहितो हे वेगळं कारण ।व्याकरणा पेक्षा भावनेला महत्त्व देते  #विद्या

शब्द रंग

Chango Birthday Celebration





आज आमच्या लाडके कवी , लेखक उर्फ बाबा , गुरु , Best friend , Philosopher , Guide अश्या माझ्या आयुष्यात सगळ्या भूमिका एकाच वेळी राबवणाऱ्या चंगो चा वाढदिवस आहे ...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐🙏 जुग जुग जियो चंगो 


एकटेपणा

एकटेपणा भक्कास
असतो म्हणून एकटेपणा आणि एकांत यातला फरक जाणून घेतला की एकांत सुखद धक्का देऊन जातो मनाला ।
#vidya

संवाद

संवाद

संवाद

संवाद नात्यांना जोडणारा एक दुवा
..संवाद कधी भाषेतून होतो ,कधी देह बोलीतून,कधी मौनातून ,कधी अंतकारणातल्या शांततेतून आलेला एक हुंकार आपलेपणाची जाणीव , आपलेपणाची एक ओढ घेऊन येतो  त्याला अंतर्नाद म्हणतो.
ब्रह्मज्ञानी संत निराकराशी मौनातून संवाद साधतात ... मनाची शांती अनुभवतात.

संवाद फक्त माणसांसोबत नसून निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी सोबत सुरू असतो एकमेकांचा की आपला.फुलांचा गंध मन प्रफुल्लीत करतो . पक्ष्यांच्या किलबिलाट सृष्टी मध्ये नवं चैतन्य निर्माण करते

संवाद 2

एका हाताने टाळी वाजत नाही तस दोन व्यक्ती मध्ये संवाद व्हायला एकालाच रस असणं पुरेसं असत नाही ।

संवाद कधी इतरांसोबत साधतो कधी स्वतः सोबत ।वपु बोलतात दोघां मध्ये होतो तो संवाद आणि तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात

निसर्गाच्या विरुद्ध वागलो तर निसर्गाचा कोप होतो हा सुद्धा निसर्गाने आपल्या सोबत साधलेला संवादच की।

संवादासाठी शब्दांची भाषाच अनिवार्य आहे असं नसतं। संवाद आईच्या कधी जिवलगा च्या स्पर्शातून होतो कधी नजरभेटीतूनही होतो ।

मनाच्या नात्यासाठी सह वासाची गरज नसते संवादात खंड पडला  कधी भेटी होतं नाहीत म्हणून  दुरावा आला  तरी पुन्हा भेट होता  तेव्हा सोहळे होतात ।

#vidya
6.1.18 आणि
7.1.18

Fb post

लोकमान्य टिळकांच्या मुलांना कोणी लोकमान्य संबोधत का मग बाबासाहेब एकच होते त्यांच्या मुलाला का तसे संबोधल जातं यात कसला आला वारसा ?

कायद्याचा गैरवापर

ज्या कायद्याचा गैरवापर होतं असेल तो कायदा काय कामाचा एकेदिवशी
Atrocity  act मध्ये बदल झाला किंवा कायमचा रद्द झाला तर नवल कशाला..

Defamation law

आरोप सिद्ध झाल्याशिवाय कसे काय ही लोकं News Channel वर येऊन ठाम पणे आरोप करून मोकळे होतात  समाजकारा
णी सुद्धा   बदनामी विरोधातला कायदा का वापरत नाही?

Defamation law must used by  social activist.

बुद्ध

हिंदू मध्ये दलित होते नंतर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी बुद्ध धर्मात जाती तर नाही मग अजून दलिताना दलित का संबोधलं जातं अजूनही ?

समाजकारण

राजकारणी लोकं स्वार्थ विसरून राजकारण कमी समाजकारण अधिक करतील ..विकसनशील भारत ...विकसित देश होण्याकडे वाटचाल करेल ।

जाती व्यवस्था कर्मा नुसार झाली होती

बरोबर , जाती व्यवस्था कर्मा नुसार झाली होती .. आता कोणीहि जाती धरून कर्म करत नाही ... ब्राह्मण सगळे भिक्षुकी करत नाही ..ना क्षत्रिय युद्धात लढतात ना शुद्र कमी मान मिळणारी कामी करतात ..आपल्याला क्षेत्रात शिक्षणानुसार काम करतात ... आणि रक्तदान,अवयव दान करते वेळी सुद्धा जातीचे दाखले देत नाही ..घेते वेळी सुद्धा कोणी धर्म जातीचे दाखले मागत नाही ...तरी जात काही जाता जात नाही ...

राजकारण

आंदोलन शांत ठेवण्याची जबाबदारी आपली नाही पण महाराष्ट्र बंद ची हाक मात्र देता येते यांना ! महाराष्ट्रातल वातावरण शांत ठेवण्याची जबादारी मुख्यामंत्र्यावर सांगून मोकळे ....तसही मोकाट हिंसा करायचं license दिलं होतं ...राजकारण सगळं ..आणि त्रास मात्र जनतेला भोगावा लागतो ...

शक्तीचं प्रदर्शन

शक्तीचं प्रदर्शन करून झालं ...
हिंसेला हिंसेने उत्तर देऊन झालं
... जनतेविरुद्ध वागून झालं आणि वरून जनतेचे आभार दिले ... धन्य !
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .