ओळख

नाती मना मनाची



      ओळख व्हायला मन जुळावी लागतात .  कधी एक क्षण हि पुरेसा असतो . नाहीतर कधी आयुष्यभर नाती जुळता जुळत नाही सोबत असूनही. कधी कधी आवडी, निवडी, विचार, स्वभाव इतके जुळतात कि पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री होते. तिथे जुळवून घेण्याचा अट्टहास नसतो. समोरच्याला काय वाटेल. आपण कसे वागावे काय बोलावे. असा विचार देखील नसतो.मोकळीक असते आपण आहोत तसं स्वीकारल्याची जाणीव एकमेकांना किती सुखावह असते मग !  
       सहवास लाभो न लाभो एकदा जुळलेली मन ...एकदा जुळलेलं नातं मनात इतकं घट्ट बांधलं जात कि कितीही दुरावा आला . तरी भावनांचा धागा नेहमी जोडून ठेवतो नाती मना मनाची. पुन्हा भेट होता मग दोघे मनोमन सुखावतात. क्षणभर भेटीत देखील तृप्त होतात. जिथे शब्द निशब्द होतात. भावना अंतरीच्या हळव्या होतात . आठवणी कोवळ्या मनी दाटतात ... अंतरीच सुख लपवण कठीणच होऊन बसतं .. अश्यावेळी ... दुराव्याची कारणं किती हि असो .. सारं काही विसरून एकमेकां मध्ये नाती पुन्हा गुंफतात .. नव्याने गप्पा रंगतात .. दुराव्याचे नियम हि पाळतात .. तरी मनाची जवळीक ... अंतरीची भावना अगदी तशीच ... क्षणभर हि न बदलेली ... मनाच्या कुपीत जपून ठेवलेली ... अगदी काळ गेला किती मागे हि पुर्नभेट होता ह्याचा मनात मागमूसही नसलेली ... असतो फक्त नात्याचा ओलावा मनीचा सोबती. क्षणिक लाभलेला सहवास . मनाचा कोपरा हळवा करून जाणारा .
#विद्या

नात बंधन वाटावं इतका अट्टहास का

 नात संपल हे कळत नाही.. कारण सवय झाली असते ... मुळात घरी सुख दिलं नाही म्हणून दुसरी कडे सुख घ्यायला पुरुष असो वा स्त्री जाते ... त्यामुळे दोघां मध्ये तिसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही ... चुक बंधनात असलेल्या नात्यात राहण्याचा अट्टहास असतो ... तलाक घेणं कोणी स्वीकारणारच नाही ... नातं तोडायचं कोणी किती हि अप्रामाणिक वागो विचार करणार नाही ...आणि समाजात मान कमी होतो ... समाज काय म्हणेल ... जे काही चाललं ते चार भिंतीत राहू दे ...

Speak against sexual abuse


Fight hard against Child sexual abuse. Speak up with family.No matter who is done that crime family members must aware about not to make their child alone  while with unknown or new relatives .Such sexual abuse people may have tags as brother,uncle etc .BE Aware . Fight Hard against injustice.Be strong enough TO SPEAK .

Parent and child relationship


आपल्या इथे वय वर्ष १८ झालं कि मतदान करायचं स्वातंत्र्य मिळतं पण मुलांनी त्यांच्या आवडी प्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं स्वातंत्र पालक देत नाहीत किंवा प्रौढ मुलांना विचार स्वातंत्र्य हि देत नाहीत .. समाज काय म्हणेल ... मुलांच्या समाधाना पेक्षा पैसे किती कमवतो हे जास्त महत्वाचं वाटतं ... #विद्या


Parent must treat their grown up child as adult ...


 व्यक्ती म्हणून स्वतंत्र्य विचाराने जगायला देणारे पालक विरळाच ...


मुफट

गोड गोड बोलण्या पेक्षा मुफट असलेलं केव्हाही बरं नाही का जे मनात ते बोलून मोकळं व्हावं नाहीतर उगाच खोट्याचे मुखवटे घालून फिरत असतात लोकं । #vidya

Cremation ... Life ...Death

One who don't accept the last truth of life . Don't run away from it . Cremation ... Life ...Death .. Will one day surely solve the true mystery of life by having faith on God and understanding the scripture. #vidya #life#advaita #truth #shiva

नातं जपू शकतो

नातं जपू शकतो पण नातं टिकणं एक तर्फी गोष्ट नाही ना .. . एका हाताने टाळी कुठे वाजते ...

जन्म

मनुष्य सर्वांत बुद्धिमान प्राणी असला तरी शस्त्रक्रिया करून त्याचा जन्म होतो जास्त नैसर्गिक रित्या कमी !


.. मी पाहिलं बरं का आमच्या गावी पण आहेत गुरं .. नवीन वासरु झालं कि ते शांत असतं सुरवातीला मग किती किती उडया मारत .. जन्म झाल्यावर आल्हाददायक असतो सोहळा 

भक्ती डोळे बंद करून करू नये

बरोबर भोळे भक्त ना ते देवाचे .. विचार बुद्धी सगळं बाहेर ठेऊन मंदिरात प्रवेश घेत असतील ... दान पेटी काढून टाकली तर काही बदलेल ... जनतेची देणगी आणि जनतेलाच त्रास


साई बाबांनी कधी पैश्याची साठवण केली नाही ..साई भक्त देऊळ म्हणजे धंदा करून टाकलाय बघू तिकडे देवस्थानाची स्पर्धा .. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या कोणत्या देवस्थानांनी मदत केली असेल का देव जाणे असे किती प्रश्न आहे .. पण तिजोरी भरण्यात जास्त लक्ष ना



 राजकारणात असो वा देवस्थानात पैसा जनतेचाच आहे मात्र उपभोग भलतेच घेत आहेत हे बदलायला हवं 

शब्दांगण


life

Don't take life seriously . The one thinks life useless enjoy more than others

मानसिक त्रास विरोधी कायदा

स्त्री वादी चळवळी झाल्या आता पुरुषवादी झाल्या तर नवल वाटू नये ... आज काल बायका पण मागे नाही राहिल्यात पुरुषांना छळण्यात ... पुरुषी स्वभाव झाला म्हणीन चुकिचच आहे ते .. अतुल तापकीरने बायकोच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा नाही देहहत्येचा म्हणीन चुकीचा निर्णय घेतला ... आपल्या इथे नाही का मानसिक त्रास विरोधी कायदा ... ? #विद्या

मुक्त जगणं


आयुष्यातील खूप गोष्टी समाज काय म्हणेल .. घरच्यांना काय वाटेल ... भले स्वत : च्या आयुष्याचे निर्णय घेणं असो .. मनात दुसर्यांना काय वाटेल ..  आपल्या विचारावर दुसर्याच्या विचारांच सावट असतं .दुसर्यांनी थोपवलेले विचार जास्त असतात आणि स्वत : च्या विचारांचं  प्रमाण कमी च असतात अस्तिव हीन जणू .. दुसर्यांच्या जीवावर मन मारून जगणारं निष्क्रिय मन ... मनमोकळं स्वत : साठी जगणारे विरळाच असतात ... निर्मल मन असावं लागतं ... मात्र .. स्वत : ची जबाबदारी स्वत : ला च घ्यावी लागते .पडतो धडपतो आणि एक दिवशी जिंकतो . जिंकण्या आधी चा संघर्ष महत्त्वाचा . स्वत : वर च्या  आत्मविश्वासाची  आणि मनाची पराकाष्टा असते . दुसऱ्यांवर अवलंबून राहायची सवय माणसाला मानसिक , आर्थिक असो वा शारीरिक गुलामच करते . हळव्या भित्र्या मनाला कधीच शक्य नाही स्वत : च्या मना सारखं मुक्त जगणं .

सच और साहस है जिसके मन में अंत में जीत उसीकी होवे .. लगान मधलं गाणं आठवलं
16/5/17

मना करा रे प्रसन्न


मना करा रे प्रसन्न 

मन प्रसन्न करायचं असेल तर सकारात्मक विचार करावे .छंद जोपासणे .वाचन मनन चिंतन करणं .. कधी एकांतात स्व चा शोध घेणं . कधी मैत्री सोबत मनमोकळ्या गप्पा मारणं .  भटकंती उत्तम उपाय . निसर्गाच्या सानिध्यात जितका वेळ राहता येईल तितकं चांगलं . निस्वार्थी मनाने निसर्ग देत असतो . आपण त्याच्या ऋणात राहून आनंदी मनास करणं महत्त्वाचे .भूतकाळ विसरून भविष्याची चिंता न करता वर्तमानात जगावे .
मनावर ताबा नसला कि राग येतो आणि माणूस दुसर्याला दुखावतो . जर त्याला राग येऊन गेल्यावरही आपली चूक लक्षात आली नाही तर पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचं . आपण मात्र शांत राहायला शिकायचं . अंतर्मन सुखाय ...

if the person regret after being angry then its good otherwise he  will suffer .

तुलना

दुसऱ्याच्या मुलांशी तुलना करून निव्वळ स्वत : मुलांच्या मनाचं खच्चीकरण करण्यात काही पालकांना कसला असुरी आनंद मिळतो देवास ठाऊक
if u cant motivate others then at least dont demotivate !
#vidya

पाप पुण्य आणि पवित्र स्त्री पुरुष

पाप पुण्य आणि पवित्र स्त्री पुरुष 

स्त्री ची पाप आणि स्त्री ची पवित्रता का आठवते .. अत्याचार स्त्री वर केलेत ...मग अश्या दुष्कृत्य करणाऱ्या पुरुषांच्या पवित्रतेच आणि त्यांनी केलेल्या पापाचा विचार कोणी करत का ? स्त्रियांना कसं वागावं हे सांगणारा समाज मुलांना का शिकवत नाही ...स्त्रियांशी कसं वागावं ते ...


पुरुषप्रधान संस्कृती आणि त्याला समर्थन देणाऱ्या स्त्रिया पण कमी नाहीत ... वारस म्हणून मुलाचाच आग्रह करणाऱ्या स्त्रियाच असतात ...


म्हणून बोलते आहे प्रत्येक वेळी स्त्री च का .... पुरूषाच पण ठरवू दे कि समाजात तो किती पवित्र आहे किती अपवित्र झालाय ते ...अश्या ना नरक यातना ह्याच जन्मात .. आणि सुटले तर वाळीत टाकायची शिक्षा तरी द्यावी समाजाने ...
~ विद्या 
fb वर दिलेली प्रतिक्रिया 

Quotes


शब्दांगण

शब्दांगण


विवाह

धर्माच्या नावावर सगळं चालतं ... धर्माने परवानगी license दिल्यासारखं ! अनोळखी मुलगा बरा चालतो विवाहा साठी .. ओळखीच्या मुलाशी मैत्री केली तरी खटकणारा समाज आहे ..प्रेम विवाहा ला संमती देणं दूरच !नातं विश्वासाच असावं .. बंधनाची नाती थोपवलेलीच जास्त बघायला मिळतातमागे मी सांगितलं तर चिडल्या बायका ... स्त्री चा career घडत असेल तर पुरुषांनी घर सांभाळावं कि ..पण आपल्या इथे स्त्रियांना हि जास्त कमाई करणारा नवरा हवा असतो आणि पुरुषांना जास्त शिकलेली मुलगी खटकते .. लग्ना आधी मुलीनी job करायची अट आणि लग्न झाल्यावर मुलं झाली कि घर सांभाळ बोलायला मोकळे ...अमेरिका आणि भारताचा विवाह पद्धती वर विचार केला तर लोकसंख्या भारताचीच जास्त आहे ..आणि विवाह बाह्य संबध हि .. पुरुष आणि स्त्री दोघ अपवाद नाहीत ..म्हणून स्त्री वैश्या सगळी कडे भेटतील .. पुरुषांची अशी category च नाही मुळी ... नाही पटतं तर मुक्त व्हावं नात्यातून ... पण मुलां साठी हे हि टाळतात आपल्या इथे ..धर्माच्या नावावर सगळं चालतं ... धर्माने परवानगी दिली की मग झालं वैवाहिक जीवन सुरु करायला ! आपल्या कडे अनोळखी मुलगा चालतो विवाहासाठी .. ह्याच विवाह सोबत काही गोष्टी आल्या त्यातली एक हुंडा पद्धती ..सासु चा छळ वारस पाहिजे म्हणून ... शिवाय कोणी तलाक घेतलं तर छळणारा समाज ... मुलं नाही झालं तर बाई ला दोष देणारा समाज ...ओळखीच्या मुलाशी मैत्री केली तरी खटकणारा समाज आपला ..प्रेम विवाहा ला संमती देणं दूरच !  विद्या

फेसबुक चा वापर

मी तरी वाचन करण्यासाठी वापर करते .. फेसबुक चा ... व्यसन वाटलं कधी तर सरळ कल्टी मारायची ... एकही पोस्ट fb वर share करत नाही मग ... आणि तुमचं विचार ऐकायला आवडतील ?

नाती

एकमेकांच्या भावना समजून घेत नसतील तर ती  असून नसल्या सारखीच ! अस्तित्व शून्य !

मैत्री

मैत्री सर्व वयाच्या माणसांशी करावी प्रत्येका कडे काही ना काही नवीन असतं सांगण्यासारखं आणि आपल्याला शिकण्यासारखं ...  ! मला पण लहान मुलांशी मैत्री करायला जास्त आवडते ... रागावले तरी लवकर रुसवा जातो .. मज्जा असते .. ! जगाला काय वाटेल त्याचा विचार करत नाही ... तेच खऱ्या अर्थाने आयुष्य जगावं कसं शिकवतात ... तेच पाहून निरागसता जपली आहे अजून बालपण अजून जिवंत आहे आपलं ... ! आपल्या पाहिजे ते घ्यायचं ...स्वतंत्र विचार मात्र करायला शिकावं .. पिढी बदलते तसे विचारहि बदलतात ...एखाद्या गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन ही ...
#विद्या 

आदान प्रदान

समविचारी व्यक्तीशी ... विचारांचं आदान प्रदान केलं..मन मोकळं केलं तर मन शांत होतं ..
21.02

quotes

Life reveals its secret on right time. #Vidya

FACEBOOK

माणूस भावना शून्य नसतो म्हणून झुक्या ने आधी पोस्ट आणि आता comment मध्ये भावना व्यक्त करायला पर्याय दिले .


रुठना



खामखा रूठना हमें भी पसंद नहीं
पर क्या करे अपनोसे रुसवाईया शिकायते होती रहती है
#विद्या 
निगाहों से अक्सर
बातें किया करते थे
दुनिया भुलाके
तेरे साये में जीते थे
#Vidya

जीने की आदत तो

Jine ki adat to nahi
magar jiye ja rahe hai
Tere bina wakt bhi
Aaj kal gumsum saa rahta hai..
# विद्या 

शायरी

चित्रकविता


तुमच्या अस्तित्वामुळे जग

तुमच्या अस्तित्वामुळे जग आहे कि जगा मुळे तुमचं अस्तित्व आहे ! मग ठरवायचं समाजाचं काय किती मनावर घ्यायच!

world exist before u or u exist before world..?
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .