मुक्त जगणं


आयुष्यातील खूप गोष्टी समाज काय म्हणेल .. घरच्यांना काय वाटेल ... भले स्वत : च्या आयुष्याचे निर्णय घेणं असो .. मनात दुसर्यांना काय वाटेल ..  आपल्या विचारावर दुसर्याच्या विचारांच सावट असतं .दुसर्यांनी थोपवलेले विचार जास्त असतात आणि स्वत : च्या विचारांचं  प्रमाण कमी च असतात अस्तिव हीन जणू .. दुसर्यांच्या जीवावर मन मारून जगणारं निष्क्रिय मन ... मनमोकळं स्वत : साठी जगणारे विरळाच असतात ... निर्मल मन असावं लागतं ... मात्र .. स्वत : ची जबाबदारी स्वत : ला च घ्यावी लागते .पडतो धडपतो आणि एक दिवशी जिंकतो . जिंकण्या आधी चा संघर्ष महत्त्वाचा . स्वत : वर च्या  आत्मविश्वासाची  आणि मनाची पराकाष्टा असते . दुसऱ्यांवर अवलंबून राहायची सवय माणसाला मानसिक , आर्थिक असो वा शारीरिक गुलामच करते . हळव्या भित्र्या मनाला कधीच शक्य नाही स्वत : च्या मना सारखं मुक्त जगणं .

सच और साहस है जिसके मन में अंत में जीत उसीकी होवे .. लगान मधलं गाणं आठवलं
16/5/17

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .