post 16
आपल्या इथे मोठ्यांना मान द्या शिकवतात पण वयाने जास्त मोठे झाले की पुढच्या पिढी कडे सत्ता सोपवावी हे काय सुचत नाही. मग राजकारणी असो सासू सुना असो किंवा बाप मुलगा असो . उतारवयात मानहानी होत नाही की मग.
#vidya
Labels:
vidya
post 15
मराठी शाळा वाचवा social media वर अभियान सुरू असत ! मराठी भाषा वाचवण्यासाठी असेल तर उद्देश च चुकीचा आहे. मराठी राजभाषा आहे. आज काल सगळ्या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते हिंदी मिडीयम मध्ये ही!
आताची अमराठी कुटूंबातील लहान मुलं ही मराठी बोलू लागली आहेत.
आमच्या भागात तीन शाळा आहेत एक इंग्रजी माध्यमातली आणि दुसरी सेमी इंग्रजी होती आता त्यातली एक इंग्रजी आणि मराठी मिडीयम दोन्ही झाली. मागणी तसा पुरवठा. एक फक्त मराठी मिडीयम राहिली म्हणून जास्त विद्यार्थी ही नसतात .
चर्च सोबत असणाऱ्या इंग्रजी शाळे पेक्षा ह्या मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बऱ्याच तिथे स्वच्छतागृह ही चांगली असतात आणि आपल्या संस्कृती चे कार्यक्रम ही होतात!
#vidyamslife
Labels:
मराठी शाळा
Subscribe to:
Posts (Atom)
