लेखन

लेखनाचं मूळ कारण अस्वस्थता असते!
#vidya

ओळख

आपलं कोण परकं कोण हेच (ओळखण्यात) जाणून घेण्यात  माणसाचं अर्ध्याहून अधिक जीवन संपत!
#vidya

कलाकृती

कलाकृती  तिथल्या संस्कृतीच दर्शन करणारी असते!
म्हणून इंग्रजी पुस्तकात मांडलेला दिल्ली ची संस्कृतीचा मराठी अनुवाद होतो तेव्हा रुचत नाही!गोष्ट असते एका तरुण मंडळीची जी मुक्तपणे वावरत असतात मद्यपान करतात ..रात्री मैफिली गाजवतात इत्यादी !
#vidya

Politics

संविधान खतरे नहीं होता जब हज सबसिडी दि जाती है! जब धर्म के नाम पर अलग कानून बनाया जाता है !
#CAA आता है तो संविधान खतरे में है कैसे??

CAA NRC

#CAA ने धर्म पीडित लोगो को नागरिकता दि है ना की घुसपैठियों को ! पर लोगों को तो धर्म के नाम पर राजनीति करने में हिंसा फैलाने में अफवा फैलाने में रुचि है !😡  अगर भारतीय हो  तो वो क्यों डर रहे है?? #Nrc से आजादी चाहिए घुसपैठियों को !  और दूसरे तरफ पाकिस्तानी है उसे तो पाकिस्तानी घुसपैठ वापस नहीं चाहिए बोल रहा है 🤣😄 और हमारे भारतीय लोगों को मजब की पड़ी है !

Fb status

#fbstatus

ते फक्त आपलं पोस्ट  असतं! त्याचा like comment  सोबत काहीही संबंध नसतो! Twitter वर पोस्ट करणारे मत मांडून मोकळे होतात! इतरांच्या प्रतिक्रिया हवीच हा फक्त fb users चा अट्टहास असतो ! 🤣😄
#vidya

Social media

Social media वर प्रत्येक गोष्टीवर  व्यक्त करणाऱ्यांना त्या गोष्टी चा पूर्ण अभ्यास असेलच असं नसतं! मग ते मित्र यादीत असो किंवा fb group वर!त्यांची मत फक्त त्यांच्या असलेल्या अर्धवट ज्ञानावर असतात!
सध्याचं ताजं उदाहरण इतरांच्या अज्ञाना मुळे ... #CAA #CAB #NRC  अफवा पसरवण्यात यशस्वी झालेत राजकारणी आणि हिंसा सुरू करणाऱ्यांना काहीही माहिती नसते फक्त गर्दीचा भाग असतात!

आयुष्य

आणि हेच वेड आयुष्य जगायला शिकवत ..

वरना जिंदगी गुजर जाती है ..युही चलते चलते..

वाचन ,लेखन ,मनन ,चिंतन उत्तम पर्याय !
......

वपु वास्तवात जगायला दिशा देतात .. वर्तमान स्वीकारायला शिकवतात! दृष्टीकोन बदलतात एखाद्या गोष्टी कडे बघण्याचा.. किंवा परिस्थितीत अडकणाऱ्या व्यक्तींचा...  वपु ची पत्र वाचावीत भेट झाल्यासारखी वाटेल . #प्लेझरबॉक्स #book

गीतकार

गीतकार एका गीत मुळे सुद्धा प्रसिद्ध होतो!
पण कविता असंख्य लिहून सुद्धा कवी म्हणून ओळख होणारे कमीच असतात!

Mental health

#musictherapy can heal mental health of a person
Old evergreen hindi songs always do the magic

राजनीति

कोंग्रेस,ममता, गांधी नेहरू की राजनीती एकही है !
अल्पसंख्याक जो अब २५%हो गये है उनको खुश रहो !खातीर दारी करो!  फिर  भी कितनो का विकास किया है ?? कोई हिसाब है? सत्तर साल हो गए देश को धर्म के नाम पर बाट रहे है .. आज भी वहीं चालु है! इनकी तो दुकान चालू रहेगी ! जब तक हिन्दू सोया रहेगा!

Politics

Suporters of #CAA practicing  #Democracy 👍👍 in peaceful manner 
लोकशाही ला बळकट करणाऱ्या गोष्टी घडत आहेत ! आज काल Social media मुळे राजकीय मत व्यक्त  करत असतात अधिक प्रमाणात ! पूर्वी तर राजकारण नको .. मतदान केलं की काम झालं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त होती!

चलता है #attitude हळूहळू का होईना बदलत !
चांगलं आहे की देशासाठी !

CAA

जर भारतीय असतील तर त्यांना घाबरण्याच कारणच काय ?? CAA NRC बद्दल अफवाच पसरवत आहेत राजकीय लोकं ते ही त्यांच्या स्वार्था साठी ! काँग्रेस तर अटल जी च्या काळा पासून समर्थन करत होती CAA ला ..आता फक्त राजकारणा साठी गैरसमज  पसरवत आहे ! 😡😡 देशात तर काहींना कायदा च माहिती नाही फक्त गर्दी चा भाग होत आहेत हिंसक आंदोलन करणारे  !

Quotes

Whenever you take right decision you gets the peaceful mind as the end result .
#vidya

राजकारण


उत्तमच कामगिरी केली म्हणून तर भाजपा ला अधिक जागा मिळाल्या ! ☺️ सत्ता काय आज आहे उद्या नाही जनतेचा विश्वास महत्त्वाचा ! जनादेशाचा आदर न करणारे आहेतच की राजकारणात !सत्तेची पोळी भाजण्यात मग्न !

एवढीच हिंमत आहे तर स्व बळावर गैर भाजपा सरकार चालवणार्यांनी निवडणुकांना सामोरं जावं! कळेलच कोणाला कोणाची मत मिळाली आहेत ते! युती करून चूक केली बीजेपी ने!

~ विद्या

CAb

#CAB don't give citizenship to bangladeshi and pakistani muslims. As both belongs too muslim country where muslims are on majority. And partition also done based on religion (muslim).. why indian muslim are opposing. ??? Those indian muslim fighting for outsider muslims ask them is any pakistani or bangladeshi give them their country citizenship just because they are muslim.. ! Most of the CAB opposition people are politician or people who don't have any knowledge about CAB!

Violence is nobody right in Indian democracy.

Why the Indians are in fear??Why opposition spreding lies about CAB?? Congress already support this bill in past during Vajpayee government.. why they are opposing only for their political benefits.. ?? 😡😡

CAB and NRC

#CAB and #NRC
Laws are only for Pakistani and Bangladeshi not for Indians.

If the Pakistani and Bangladeshi majority religion also get citizenship of India then why the partition based on religion in Pakistan and Bangladesh

And why partition ??

Online services

पोलीस स्थानक सामान्य माणसांसाठी नसतातच! आपल्या इथे हद्दीत असून सुद्धा fir सुद्धा घेत नाहीत कंपनी कर्मचाऱ्यांनी तक्रार केली तर! Online हवं सगळं कोणत्या जगात राहतो काय माहिती ! Whatsapp कशाला आहे !

समाज निर्माण

जपान का जर्मनीत पहिली तीन चार परीक्षा नसते शाळेत ! मुलांना कसं वागायचं समाजात याच शिक्षण दिलं जातं! मग कुठे तो माणूस होतो! श्रीमंत ,गरीब भेदभाव नसतो! कोणतंही काम कमी दर्जा च नसतं हे लहानपणी च बिंबवलं जातं! समतेचे ,माणूसकी चे धडे खऱ्या अर्थाने शिकवले जातात तेव्हा कुठे उत्तम समाज निर्माण होतो!
#vidya

मन :शांती आणि कुटुंब

घरातली व्यक्ती चिडचिड करणारी असेल ...अस्वस्थ असेल ..दुसऱ्यांना समजून घेणारी नसेल. सतत वाद घालण्यात पटाईत असेल तर एकच उपाय यावर

दुर्लक्ष करणं! 😀 स्वतःची मन:शांती महत्त्वाची किंवा त्यालाच प्राधान्य द्यावं की! नाहीतर दगडावर डोकं आपटलं की आपल्यालाच लागतं त्यातलाच प्रकार असतात हे!

उतार वयात माणूस अस्वस्थ असेल तर समजून जायचं  आयुष्य जगायची पद्धत चुकली त्याची ! 

#vidya

महाराष्ट्र राजकारण

युती मध्ये हे मतभेद होते म्हणून एकत्र नाहीत!

मेट्रो कार शेड प्रकल्प ला स्थगिती दिली आरे वाचली झाडे  वाचली हे योग्य झालं! औद्योगिकरण आणि विकासात निसर्गाची हानी कशाला ..?

दुसरं बुलेट train प्रकल्प रद्द होणार असेल पुढे तर योग्य च आहे की! गुजरात मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काय उपयोग महाराष्ट्राला !

महाराष्ट्र सरकार

हे नवीन मुख्यमंत्री निवडणूक कोणा विरुद्ध लढले होते ! सत्तेसाठी कायपण ! 😡युतीची मत घेऊन विरोधकांसोबत गेले ! जनतेची फसवणूक करून किती वर्षे टिकवणार आहेत हे सरकार !

मतदान

आपण मतदान केलेले  राजकीय नेते एकतर सत्तेत असतात नाहीतर विरोधक म्हणून भूमिका राबवतात!
दोन्ही बाजू महत्वाच्या! आपलं मतदान वाया गेलं असं नसतं! जनतेची काम करावी इतकी अपेक्षा असते सामान्य माणसांची! सत्ते स्थापने साठी कोणीही गणिते मांडून कधीही सरकार स्थापन करू शकतं!फक्त शपथ घेऊन कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतं नाही बहुमत सिद्ध करावा लागतो नाहीतर ते सरकार पडतं! एकतर राष्ट्रपती राजवट लागते किंवा पुन्हा निवडणूक होते! जनतेचं काम समूहाने एकत्र येऊन आपली काम या लोकां कडून करून घेणं असतं फक्त एक दिवस मतदान करणं नसतं मग ते सत्तेत असो वा विरोधी पक्षात!  #vidya

Diary Nov 19

मतदान करून झालं जनतेचं... आता तरी काम सुरू करा! किती ते सत्ताकारण !
मनोरंजन सुरू आहे नुसतं!
....
ते बहुमत सिद्ध करण्यासाठी सारखं सारखं पत्रकार परिषद घेणं , बातम्या मध्ये झळकत राहणं गरजेचं असतं का?
शास्त्र असतं ते !😂😀
.....
नैतिकतेच्या गोष्टी का करत आहेत हे राजकारणी ??
विरोधी मत असणारे एकत्र यायला तयार होतात त्याच काय! #सत्तेसाठी_कायपण
😁😀🤣
.....

जनतेला पोपट
बनवणाऱ्यांचा 'पोपट 'झाला म्हणायचा ! #महाराष्ट्र सत्ता संघर्ष
घुसळून काढतो आहे सगळ्यांना !
....
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ !
#maharashtrapolitics
......
चाणक्य नीती और स्वातंत्र्यवीर विचारधारा देश की प्रगती.
....
दोघांचं भांडणं तिसऱ्याचा लाभ ☺️
....
आता fb story मध्ये गाणी पण share करू शकतो !☺️
#fb #newfeature
....
समविचारी राजकीय नेत्यांच पटत नाही इतकी वर्षे सोबत राहून ही आणि चालले आहे स्थिर सरकार च स्वप्न बघायला ते ही विरुद्ध विचार करणाऱ्या पक्षा सोबत !
...
कोण खरं बोलतं कोण खोटं माहीत नाही ! पण बीजेपी शिवसेना एकत्र यावेत हा जनादेश होता! त्यांनी मतभेद विसरून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं असं वाटतं ! नाहीतर आहेत पुन्हा निवडणुका !
...
कर्नाटका मध्ये तर एकच कुमार स्वामी होते आणि आपल्या महाराष्ट्रात एका पेक्षा अधिक म्हणायचे.. जिथे प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री व्हावा  स्वप्न आहे !सत्तेसाठी हट्ट करणारे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी तितकेच प्रयत्न केले असते तर अजून मत मिळाली असती की यांना!
....

रोज जनतेचा पोपट करणारे स्वतःचाच पोपट करून घेत आहेत एकमेकांकडून!
....
मला 'मुख्यमंत्री' व्हायचंय ! चित्रपट बनवायचं script तयार होतंय महाराष्ट्रात !(बहुमत नसलं तरी )😄🤣
....
राजकारण ऐसेची नाव 🤣😄 शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं होतं राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री व्हायला तयार होती पण काँग्रेस ने अडवलं ! 🤣😄 सगळे विरोधी मत असणारे एकत्र आले की असच होणार की ! कुमारस्वामी उत्तम उदाहरण काही काळ सत्ता उपभोगतात मग पुन्हा निवडणुका !

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल नाहीतर जनतेची फसवणूक नक्की !

राष्ट्रपती राजवट येवो पुन्हा निवडणूक होवो !
...

निवडणूक आधी युती कशाला केली? एकत्र यायचं नव्हतं तर!  फसवणूक आहे मतदारांची!
.....
राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो ना शत्रू ! सत्तेसाठी कायपण !
....
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
....
देशाचं मोदी सरकार एक एक मोठे निर्णय घेऊन मोकळे होतात मग जम्मू काश्मीर असो अयोध्या मंदिर असो!👏👏👏
...
#अयोध्या
राम मंदिर तयार होणार आता !
...

विकासाचं राजकारण करून मत घेतली अजून सरकार बनवायला भाजपा सेना तयार नाही !  किती तो अहं!अडीच वर्षे दोघांनी सरकार चालवावं की!
.....
बाहेरच्या देशात तर झाडं एका ठिकाणा वरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात लावायला मुळासकट मग तशी व्यवस्था आपल्याकडे कधी येणार! वृक्ष तोड थांबेल आणि वृक्षारोपण होईल की त्याच झाडाचं!
...

बदलतं जग

काल बाजूच्या इमारतीतले पांडुरंग शास्त्री आठवले यांचे स्वाध्यायी घरी आलेले . नवीन उपक्रम होता त्यांचा भगवद्गीता बद्दल माहिती देणे ..निस्वार्थी पणे ओळखीच्या लोकांना भेटणे. नाहीतर आज काल कोणी कोणाकडे कामाशिवाय जात नाही. आधी सारखं काहीच राहिलं नाही.आवडीने माणसं  भेटायची बोलायची. काय काम आहे असं कोणी बोलायचं नाही..निव्वळ गप्पागोष्टी असायच्या. इमारतीत नाहीतर सगळ्यांची दार बंद कोण आहे कोण गेलं ते सुद्धा कळत नाही.
#vidya

विचार

जवळ असो वा दूर आपल्या माणसाचं अस्तित्व पुरेसं असतं! मनाने दिलेली सोबत ..सुसंवाद मन प्रसन्न करतं!

.....

आयुष्यात बदलणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या की जगणं सुखद होतं!

....
बालपणापासूनच माणसं अनुकरण करायला शिकतात. इतरांचं जगणं बघून स्वतः मध्ये ही बदल करतात. चांगले विचार स्वीकारतात. मनाला धीट करतात.मनोबल वाढवतात.
विद्या
   २९.१०.२०१९

आठवणी

भूतकाळातल्या कटू आठवणी
मनात गुंता करत असतील तेव्हा
वर्तमानात जगायला शिकावं मनमोकळं..
नवीन क्षण जगावे..नव्या आठवणी गोंजाराव्या.. पुढे सरकत जावे ..छंद जोपासावे..संवाद साधावे.. कधी सगळं कठीण वाटणार जगणं सुद्धा सोपं व्हावं .. मन गुंतवावं आजच्या क्षणात.. विस्मरण सुद्धा एक शक्ती असते याची जाणीव व्हावी .. ! #vidya

मोक्ष

इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून लोकं आत्महत्या करतात!म्हणजे इच्छा पूर्ण करायला त्यांना पुन्हा जन्म घ्यावाच लागणार! मग मोक्ष कसा मिळणार अश्यांना ?  जोपर्यंत इच्छा संपत नाहीत तो पर्यंत मोक्ष नाही!

स्वास्थ्य

शारीरिक स्वास्थ्य जितकं महत्त्वाचं असतं तितकं मानसिक स्वास्थ सुद्धा !पण आपल्या कडे आजारी माणूस म्हणजे शारीरिक फक्त  आजार असणारच असतो! मनाच्या आजारा कडे कोणाचच लक्ष नसतं!ना स्वतः च ना इतरांचं! माणसाचा सर्वात मोठा शत्रू आणि मित्र कोण असेल तर तो मन आहे! ते स्थिर नसेल तर काहीच स्थिर नाही! अस्वस्थ चित्त ना स्वतः ला आधार देऊ शकत ना इतरांना! जागरूकता कमी असावी की मानसिक स्वास्थ्याकडे इतकं दुर्लक्ष केलं जातं! माणसाने  उंची गाठली की तो एकटा एकाकी जीवन जगतो! संवाद हीन आयुष्यच मग घात करत! दुसऱ्यांना impress करण्याच्या नादात मी सामान्य नाही मी असामान्य आहे ! अपमान सहन न होणे , परिस्थिती न स्वीकारणं, समस्या पेक्षा समाधान काय यावर विचार न करणे! ही सगळी कारण पुढे येतात! जितक्या सहजपणे शारीरिक आजाराकडे लक्ष देतो दूर व्हावा म्हणून डॉक्टर कडे जातो तितक्या सहजपणे मानसोपचार तज्ञा कडे अस्वस्थ व्यक्ती ने जायलाच हवं! नाहीतर चुकीचे विचार घात करतात! एवढं नक्की!

#vidya

Never ignore mental health.

Quotes

It is ok to be not ok sometime.
☺️

स्वप्न

गरजेपेक्षा जास्त मोठी न झेपणारी स्वप्नांची किंमत मोजावी लागते शेवटी! काही भरघोस कर्ज घेऊन नंतर जीव गमवतात! #ccdfounder ताजं उदाहरण

प्रवासी


प्रवासी

प्रवासी

काही प्रवास एकट्यानेच करायचे असतात! वाटेत चालताना सोबती भेटतात प्रत्येक वळणावर नवीन सोबती! जुन्या सोबतीचा निरोप घेतला की जो तो आपापल्या वाटेवर चालायला मोकळा! मुक्त प्रवास अटळ वळण ... एक पल्ला गाठला की दुसरा पल्ला साद घालतो! असाच प्रवास अविरत सुरू राहतो! कोणाच्या सोबतीने तर कधी एकट्याने!पावलं मात्र चालत असतात स्व च्या शोधात !थांबला तो संपला! एक स्तब्ध क्षणच पुरेसा असतो आयुष्याला मिठीत घ्यायला! आनंदाची उधळण करायला ! तृप्त मनाचा झरा कसा मग ओथंबून वाहू लागतो अथांग अविरत! शेवटी प्रवासी मुक्काम गाठतो आणि चैतन्याचा झरा अविरत सुरूच राहतो! अन् तीरावर आनंदाच्या वर्षावात चिंब भिजून जातो!

दिशा

प्रत्येक वेळी शिक्षण घेतो त्याच क्षेत्रात माणूस पुढे जातो असं नसतं ! नव नव्या वाटा आयुष्यात गवसत असतात ! नव्या दिशा दाखवतात! मग कोणी कला क्षेत्र निवडत कोणी इतर आवडीचे क्षेत्र ! जिथे मनाला समाधान मिळेल ! जिथे काम करून माणूस थकणार नाही अशी एखादी passion जपावी! कधी तीच उपजीविकेच साधन होते!किती कमावतो पेक्षा आयुष्य किती मनमुराद पणे जगतो हे महत्त्वाचे! समाधानी मन अंतिम सुख असतं! ज्याला गवसत तो धन्य! आयुष्य घालवण्या पेक्षा जगणं महत्त्वाचं मग सगळे करतात म्हणून त्याच पद्धतीने आयुष्य जगायला हवं अशी अट नसते! #vidya

सुसंवाद

सुसंवाद करणारं घर असेल तर वेळे नुसार निर्णय घेणे किंवा बदलणं ही येतच ! इतकी मोकळीक सगळीकडे कुठे असते मुलांना! आपली मत थोपणारे पालक जास्त असतात! दुसऱ्यांची घर विभक्त होतात म्हणून सगळ्याच घरात असं होईल असं नसतं !

प्रारब्ध

प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं! उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्ट घडली म्हणून आपल्याही आयुष्यात तसं होईल यावर आयुष्य घडत नसतं! प्रत्येकाच्या आयुष्यात नवं नवे रंग , नव्या दिशा, वेगळी वेगळी वळणं असतात कधी चढ कधी उतार ही असतो !प्रत्येकाचं अस्तित्व भिन्न हेच वेगळेपण असतं !

अपचन , गॅस समस्या दूर करण्यासाठी

डाळिंब खाणे
पेज पिणे
मसाला वाटप मालवणी पदार्थ कमी करणे
दही भात खाणे

हिंग कोमट पाणी,लिंबू रस कोमट पाणी सकाळी पिणे
आलं चहा

....
पनीर शिमला मिरची भाजी
पनीर बुरजी,
बटाटा शिमला मिरची ,
फरसबी बटाटा भाजी
टोमॅटो कांदा ,पनीर मसाला,काश्मिरी मसाला घालून केलेली भाजी
...

आरोग्य

सर्दी झाली की  पाण्याची वाफ घ्यायची ।
कोमट पाणी पिणे

गूळ खोबरं

Education

Life science there must be a  subject included grooming , personality development, how take care of own health,other health issue, how to solve mental problem tackle it.. be human .

शिक्षण

समाजात कसं वागावं हे शिक्षण देणं जास्त गरजेचं आहे .. प्राथमिक शिक्षण नुसतं देऊन काय उपयोग ... शाळेतल्या शिक्षकांपासून .. पालकापर्यंत .. कार्यालयातली लोकं असो वा वकील .. सगळे एका माळेचे मनी .. माणुसकी च हरवलेले .

विद्या

April diary 2

माझ्या आजूबाजूची लोकं समाज कार्य करतात! समाज प्रबोधन करतात! म्हणून मलाही हुक्की आलेली माणसांना वळणं लावायची मत मांडायची सल्ले द्यायची ! पण अनुभवा नंतर सोडून दिलं ! माणसाने स्वतःला बदलावं स्वतः मधले  दोष दूर करण जास्त महत्त्वाचं असतं इतरांकडे बोट दाखवणे सोपं असतं हे कळलं ! फुकटचा वेळ वाया जातो  ते वेगळं!
#vidya 7.4.19

राजकारण जिथे  तिथे चिखलफेक होतेच ! काहींना एकमेकांची पूजा करणं अपेक्षित असतं ! मुद्दाच बोला फक्त! इतकी समजूदार लोकं  काही आपल्या देशात  नाही मग जनता असो वा राजकारणी  ! आजही निवडणुका भेदभाव करून च लढल्या जातात! ते राजकीय नेते एकवेळ राजकारण निवडणूक झाल्यावर इतरांची गळाभेट तरी करतात! नाहीतर इतर ठिकाणी होणार राजकारण साहीत्य क्षेत्र असो वा नोकरी मध्ये ! ते जास्तच खालच्या पातळीच असतं!  7.4.19

ज्या घरात स्त्रिला सौख्य लाभत नसतं मग मानसिक का असेना! त्या घरात कधीच सौख्याच वास्तव्य नसतं! 
आपल्या कडे मानसिक छळ करणाऱ्यां विरुद्ध अजून तरी कायदे आले नाहीत ! मग तिचा छळ झाला असो वा त्याचा!  फक्त लग्न झालेल्या बाईसाठी आहे!  जी त्या कायद्याचा वापर जास्त करत नाही !So called कौटुंबिक व्यवस्था ! सोशिक वृत्ती ! Mind strong नसणं ! आत्मनिर्भर नसणं! आर्थिक दृष्टीने सक्षम असूनही काही मन कठोर .. खंबीर नसतात !  Mentally harrase someone is criminal offence!  But law is only few people. 
7.4.19

मला वाचनाचं व्यसन लागलं आहे thanks to my orkut old friends! जे रोज कविता पाठवायचे! आता कोणी शिव्या दिल्या तरी काही फरक पडत नाही किंवा कोणी शहाणपणा चे डोस दिले तरी माझ्यापर्यंत काही पोचत नाही! जे वाचते जे योग्य वाटतं ते घेते ! मनाला वाटत तसं वागून मोकळी होते ! खूप प्रश्नांची उत्तरं वाचना मुळे मिळतात ! काही प्रश्नांची उत्तरं च नसतात ! हे स्वतः वपु नीच मान्य केलं आहे ! सगळ्या भावना व्यक्त करण्यात काही मला दोष वाटतं नाही मग तो टोकाचा राग असो रडणं असो मोठ्याने हसणं असो ! स्वतः चाच वेडेपणा आवडू लागला की  जगणं सहज होतं की ! इतरांनी वागणं  स्वीकारावं किंवा नाही हा अट्टहास ही नसतो ! 
7.4.19

कवी संवेदनशील असतो ! लेखक वास्तविक आयुष्याच चित्रण लिहीत असतो!
....
प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते! जीवन जगण्याची पध्दत आणि दृष्टीकोन ही वेगळा असतो! तरीही ज्यांना स्वतःचे विचारच नसतात ते कितीही बौद्धिक क्षमता असली तरी मानसिक दृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असतात! त्यात काही चूक नाही तरीही  !ज्यांना स्वतःचे विचार असतात ते स्वतः च्या किंवा ऐकावे जनाचे करावे मनाचे ! सगळ्या बाजूने विचार करून जगतात! शेवटी निर्णय स्वतःच घ्यायचे असतात ! काही झालं तरी दुसऱ्यांवर तरी आपण खापर फोडणार नाही!   #vidya 7.4.19
....

आपल्या इथे celebrity ना खूप च महत्त्व दिलं जातं! त्यांनी कसं वागावं कसं वागू नये! गरज काय आहे कोणालाही सुधारण्याची ! उंटावरून शेळया हाकणं! Celebrity खऱ्या आयुष्यात व्यसनी असेल तुम्ही व्यसनी होणार आहात का? आदर्श असं कोणी नसतं ? आपण स्वतः ही नाही आहोत ! Nobody is perfect. प्रत्येकामध्ये सत्त्व ,रज,तम गुण असतात कमी अधिक प्रमाणात!  दुसऱ्याचे दोष दाखवून त्याला बदलण्यात आयुष्य घालण्या पेक्षा स्वतः ला च्या आनंदासाठी झटावं! दुसऱ्याला बदलण्याचा इतका अट्टहास कशाला?
....
आपण जसे आहोत तसे स्वतः ला स्वीकारलं..
इतरांनी स्वीकारलं पाहिजे असा हट्ट नाही ना अट्टहास आहे! मी बोलेन ती पूर्व दिशा इतर जण चुकीचे असं ही काही नाही आहे!
Be yourself .. प्रत्येक व्यक्ति सारख्याच परिस्थितित भिन्न वागू शकतो हेच तर वेगळेपण जपायचं असतं स्वतःच ज्याने त्याने!
दुसऱ्यांना प्रबोधन fb वर करायचं नसतं! खऱ्या आयुष्यात करायचं असतं!
.....

मी माझ्या कर्माची धनी तुम्ही तुमच्या कर्माचे धनी ।

U am not perfect person आणि दुसऱ्यांना perfect करण्यात मला काही च रस नाही आहे!

.....

वर्तमानात जगणं चुकीच नाही ! ज्यांना जमत ते जगतात मग सुखात जगो किंवा दुःखात ! आपण एखादी गोष्ट स्वीकारली की त्रास होत नाही! जगी सर्वसुखी असा कोण आहे !  7.4.19

स्त्रीचा जन्म पुरुषाचा  भोग घेऊन प्रजनन करायला झाला असतो का फक्त? तिला लग्न करावं की नाही करावं हे सुद्धा स्वातंत्र्य नाही का?  7.4.19

जगात फक्त सांसारिक सुख नसतात इतरही सुख असतात ! मग ती आत्मिक सुख असो किंवा मानसिक!  7.4.19

आपण आहोत तसे आपल्याला स्वीकारलं की झालं इतरांनी स्वीकारलं पाहिजे असा अट्टहास कशा साठी !  7.4.19

स्त्री ने पुरुष होण्याचा अट्टहास का करावा ?? स्त्री ला स्त्री राहण्यात कमीपणा वाटतो का? Vidya 6.4.19

स्त्री भावनिक ही असते आणि कुटूंबाला धरून ही असते !  हे सगळं नाकारणं स्वतः साठी जगणं म्हणजे पुरुषा सारखं वागणं ..  ती पुरुषाला follow  करायला लागली म्हणू शकतो आपण ! आजूबाजूला कधी पुरुषां सारखं वागणाऱ्या बायका ही दिसतात की !

..

...

कोणत्याही भूमिकेत माणूस चोवीस तास नसतो ।## वपु
....

April Diary 1

सापाने कात टाकली तर त्याला नवीन कात मिळते! माणसाने मरणाआधी कात टाकली तर त्याला जिवंतपणी च मुक्ती मिळते ! #vidya 5.4.2019
...

स्वभाव कुठे बदलतो .. कोण किती वेळ सावध राहणार... येणारी माणसं च शिकवतात आणि बदलत जातो माणूस थोडाफार का होईना ..
4.4.2019

जब तक जिंदगी में तुम्हारे  ठहराव नहीं आता तबतक तुम यश के शिखर पर नहीं पोहोचे!

21.4.19

आज जे जे राज यांच्यावर टीका करत आहेत ते खरं तर त्यांच्याकडून आपल्या असलेल्या अपेक्षे मुळे च! आमच्या घरी तर पूर्वी सगळे हातातली काम बाजूला ठेवून भाषण ऐकायचे पण आता भाषण आणि कृती या मध्ये खूप अंतर झालंय म्हणून आता टीका करणं साहजिकच आहे मराठी माणसां कडून  ! ह्यावेळी स्वतःच्या पक्षा साठी लढत सुद्धा नाहीत मग अजून टीका होणारच की ! निवडणूक लढणं महत्त्वाचं मग जिंको किंवा न जिंको! व्यक्तिगत टीका कोण करतंय तसही सध्याचं राजकारण ज्यांना  पटलं  नाहीत तेच करत आहेत ! 20.4.19

आयुष्याची खरी सुरवात शाळा कॉलेज संपल्यावर होते । ! 15.4.19

हिंदुस्थान जिंदाबाद 🙏 How the Josh high sir!  मनोहर पर्रिकर कायम स्मरणात राहणार!

14.4.19

Being in relationship but feeling complete with or without anyone that's Sadguru want to say.
14.4.19

Sadguru also have married life. Be yourself that's the true life!
14.4.19

वयाने मोठे असण्याचा maturity चा काहीच संबंध नाही ! हे लक्षात आलय भेटलेल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांमुळे!
14.4.19

काही सत्य घटना ,  खरी माणसं  असतात !  त्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थानच नसतं !म्हणून नंतर तीच वादग्रस्त होतात ! हा पण राजकारणाचाच एक भाग असतो !  खरा इतिहास पुस्तकात नसतोच की ! 14.4.19

स्वातंत्र्या नंतर च्या काळात जम्मू काश्मीर मध्ये साफ सफाई कामगार लोकांनी जेव्हा हडताळ केला तेव्हा  दिल्लीच्या आसपासच्या निवासी लोकांना भंगी च काम करण्यासाठी जम्मू मध्ये घेऊन  गेले! पण त्यांना तिथलं नागरिकत्व दिलं नाही! काश्मीर 35 Aकलमा नुसार ! ना काश्मीर पंडितांचे अजून प्रश्न सुटले आहेत ना तिथल्या तरुण पिढी चे! म्हणून काश्मीर चा विशेष राज्य चा अधिकार काढलाच पाहिजे ! शिवाय काम न मिळाल्या मुळे कोणी दगडफेक करणारे होतात कोणी आतंकवादी ! 14.4.19

वास्तवाचं चित्रण ! असते वेळी किंमत नसते नसते वेळी उणीव भासते ! पैसा माणुसकी पेक्षा वरचढच ठरतो आजच्या काळात!
14.4.19

माझ्या बालपणी  असा काळ नव्हता! माणुसकी होती ! पैसा कमी होता आणि माणसं सुखी होती ! नात्यांना किमंत होती !
.....

नाती जपली जायची।
नात्यांमध्ये ओलावा होता
.....
माझ्या बालपणी  असा काळ नव्हता! माणुसकी होती ! पैसा कमी होता आणि माणसं सुखी होती ! नात्यांना किमंत होती !

14.4.19

काही सत्य घटना ,  माणसं खरी असतात !  त्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थानच नसतं !म्हणून नंतर तीच वादग्रस्त होतात ! हा पण राजकारणाचाच एक भाग असतो !  खरा इतिहास पुस्तकात नसतोच की ! 14.4.19

आभाळ बरसलं की निरभ्र होत तसं  मन ही मोकळं होतं मनसोक्त भावना व्यक्त केल्यावर..मग रडणं असो वा हसणं 

14.4.19

...

घर दोघांच असतं मग जबाबदारी सगळ्याच दोघांच्या हव्यात ! 14.4.19
.....
तिथली सकाळ किती प्रसन्न वाटते!चैतन्यमय कोकण 14.4.19
....
घरात एक माणूस अस्वस्थ असेल तो पूर्ण घराला अस्वस्थ करतो! ते ठीक पण आपल्या इथे शारीरिक आजार असलाकीच डॉक्टर कडे जातात! मानसिक आजार असला की स्वतः हुन सुद्धा जावंसं वाटत नाही किंवा इतर
ही घेऊन जात नाही हे अज्ञान की! मुळात जागरूकता कमीच ! मन स्वास्थ्य ह्याला आपल्या इथे प्राथमिक ता दिली जात नाही!
....

असते वेळी किंमत नसते नसते वेळी उणीव भासते ! पैसा माणुसकी पेक्षा वरचढच ठरतो आजच्या काळात!
14.4.19

जिंदगी से मुझे प्यार है आज भी । 14.4.19

आत्मारामों मत्
पिता भालचंद्रो
भ्राता गणेशम्
पार्वती नंदन
!

13.4.19

निवडणूक पंतप्रधान कोण हे सांगून सुद्धा लढली जाते किंवा काही आम्ही जिंकलो तर पंतप्रधान कोण हे ही ठरवत नाही । प्रत्येकाच राजकारण वेगळं असतं।
13.4.19

The people can't tolerate you go from you life.  Those tolerate you will stay. 13.4.19

निवडून आलेले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री, नगरसेवक ,खासदार सगळ्यांचे असतात मग तुम्ही त्यांना मत दिलं किंवा नाही दिलं तरी तुमचा ही तितकाच हक्क असतो त्यांच्यावर आपलं काम करून घेण्यासाठी !  12.4.19
....
The people who don't have knowledge are more confident than people who have knowledge. Unknown

Commonsense is not so common now a days. Unknown
....

Most Problem in country have Education is the first solution... Then remaining solutions may apply to solve the problem.

11.4.19
.....
आपल्या  देशात  प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे त्याचा जाती ,धर्म  ,आर्थिक गोष्टीं शी काहीही संबंध नाही ! भारतीय म्हणजे भारतात जन्म झालेली व्यक्ती !  फक्त एकच अट असते ! तरीही लोकं आणि राजकारणी भारतीय म्हणून कमी मतदान करतात आणि पक्षा साठी अधिक करतात! आपल्या भागात तरी दर पाच वर्षाने नगरसेवक बदलतो मग तो कोणत्याही पक्षाचा असो ! 😐 मतदान स्वतःचा विचार करून देतात नाहीतर देशासाठी जे योग्य आहे ते बघून ! कारणे वेगळी असतात प्रत्येकाची ! अजूनही मत विकत घेतली जातात एवढं मात्र नक्की मग ते शहर असो वा गाव ! त्या विरोधात कठोर कायदे आलेले नाहीत अजून तरी!   11.4.19

....
Life is All About Love and Kindness..
....

Kindness and Love always wins the heart.!
11.4.19
....

दोन व्यक्तींचे विचार जुळायला हवेत'च ' असा अट्टहास कशाला ! आपण आपलं मत मांडून मोकळं व्हावं की ! इतरांवर मत लादायची गरजच का भासते  !  #vidya 10.4.19

राजकारणी निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी फक्त राजकारण करतात ! नंतर एकत्र येतात ! नाहीतर इतर लोकं  मग त्यात नातेवाईक ही आलेत जे आयुष्यभर दुसऱ्याला पाडण्यासाठी राजकारण करत असतात !  10.4.19

Fb वरच्या लोकांचं प्रबोधन करायला सुरु केलं तर आयुष्य कमी पडेल!म्हणून आपण काही असल्या भानगडीत पडत नाही!पटलं तर घ्यायचं नाहितर सोडून द्यायचं! सगळ्या पोस्ट गर्भितार्थ काढायला आधी त्या व्यक्तीचा follower किंवा निदकाची भूमिका राबवावी लागते की ! वपु बोलतात आपण वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य ... असं दुसऱ्याच ऐकायला लागले असते लोकं तर ज्ञानेश्वर संत महात्मे पण बनले असते की ! आपल्या देशात आदर्श लोकांची तशीही कमी नाही आहे !  खऱ्या आयुष्यात खूप आहेत fb च्या आभासी जगापेक्षा!  10.4.19

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .