मराठी माणूस

मराठी माणसाला जितकं मराठी येतं आणि इंग्रजी त्यापेक्षा सहज बोलायला जमत नाही तसं इंग्रजी मातृभाषा असणाऱ्यांना तितकंच मराठी सहज बोलता येत नाही ! परकीय लोकांमध्ये फक्त एक फरक असतो ते सरळ सरळ स्वीकारतात भाषा येत नाही मोजकेच शब्द माहिती आहेत म्हणून आणि याउलट मराठी माणूस न्यूनगंड बाळगतो इंग्रजी येत नाही म्हणून ! #vidya

नातं

काही माणसं कधी समोरचा व्यक्ती कामाला येऊ शकतो म्हणून नाती (?) जपतात! समोर एक मनात एक असतं! पाठीमागे शिव्या द्यायच्या आणि तोंडावर गोड गोड बोलणारी !एकमेकांना पुरक असतात मात्र ती!  दोघेही कामासाठी नात(?) स्वार्थासाठी च टिकवणारी! 
खरं बोललं तर किती नाती टिकतील ना यांची? 
खऱ्या आयुष्यात असतात अशी स्वार्थी लोकं!

वारस

सामाजिक कार्य करण्याचा सुद्धा वारस असतात! मग त्या पुढच्या पिढीत वाद झाले की एक जण आत्महत्या करणारी टोकाची भूमिका घेतो! 
समाजाची काळजी करताना स्वतः च्याच  माणसांची मानसिक स्थिती चांगली नसताना त्या व्यक्तीची काळजी घेणं समजून घेणे गरजेचे असतं पण कोणीच नसतं अश्यावेळी  सोबत :( 

कोणताही वारसा असो सामाजिक , राजकीय  मतभेद असले तर विभक्त होऊन आपापली काम करावी ! 
एका म्यानात दोन तलवारी रहात नसतात! 
नेतृत्व एका कडेच सोपवायचं असतं! एका पेक्षा अधिक जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती सोबत नेतृत्व शैली असणाऱ्या  कश्या एकत्र राहतील! 

बाबा आमटे यांच्या नातीचा दुःखद अंत झाला !
भावपूर्ण श्रद्धांजली  💐 

 #vidya

कोरोना काळ

कोरोनाच्या काळात खूप नुकसान झालं व्यवसाय करणाऱ्यांच त्यातला एक हॉटेल व्यवसायिक सोळा लाख नुकसान झालं असं steel च्या दुकान दाराला सांगत होता आणि पाव कापायची सुरू दहा रु द्या बोलत होता! माणुसकी दाखवायचे दिवस आहेत त्या दुकानदाराने मग मोफतच दिली सुरू! नव्याने पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभं करणार होता व्यवसायिक ! 🙏 चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटतात म्हणायचं!

पालक

आपल्या इथे पालक मुलांना जन्म दिल्यावर त्यांचे मालक च असल्या सारखे वागतात! भारतात तर गुंतवणूक म्हणून ही वारस हवा असतो! वय झाल्यावर आपल्याला मुलांनी  सांभाळण्यासाठी ची तरतूद ! जपान मध्ये स्वतंत्र असतात इकडच्या सारखं कुटूंब संस्था नसते! मुलं स्वतः ला आवडेल ते ते शिक्षण घेतात हव तिथे काम करतात ! लहान पणी च कोणतंही काम छोटं नसतं हे शिकवलं जातं! इतर कोणी छोटी मोठी काम करत असेल त्यांना ही समानतेची वागणूक द्यावी हे ही शिकवतात!

#vidya


२४.११.२०२०

मराठी माणूस आणि मराठी भाषा

दोन मराठी माणसं भेटली की फक्त मराठी बोलू शकत नाही इंग्रजी ,हिंदी भाषेची सरमिसळ असते ! याला मराठी माणूस च कारणीभूत आहे! मग कलाकार असो किंवा सामान्य माणूस इतर भारतीय भाषेच्या लोकांसारखा अभिमान नाही ना ते कट्टर असतात ही मराठी भाषेसाठी शोकांतिका ! नवीन शिक्षण पद्धती इंग्रज गेले तरी इंग्रजी राहिली कळलं म्हणून भारतीय भाषेला प्राधान्य देणारी आहे ही एकच सकारात्मक गोष्ट !

जागा

जीवनात एखादी व्यक्ती दूर झाली म्हणून पुन्हा त्याच व्यक्ती ला शोधत असतं मन पण हा शोध कधीच पूर्ण होत नसतो! प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून च त्याचं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व वेगळेपण च घेऊन येत! कोणाची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही !  #vidya

एकांत

ज्याला एकांत सहन होत नसतो त्याला कोणत्या तरी कामात गुंतून घ्यावस वाटतं व्यस्त राहणं एवढं हवं असतं नाहीतर संगत हवी असते! एकांत सहन न होणाऱ्या व्यक्तीलाच कंटाळा येतो ! एकांतात स्वतः ची ओळख होत असते ! मन कधी शांत बसायला तयारच नसतं! शरीर थकत पण मन कधीच थकत नसतं! जेव्हा थकत तेव्हा खरी निवृत्ती म्हणायची!  #vidya

how to use Google drive

How to save photos or videos in google drive..

1. Go to gallery 
2. Select share button 
3. Select google drive logo 
4 . Share files 


Second option
1. Go to google drive app ( chitra kathi gmail id login)
2. Click on + button 
3.  Click on Upload 
(Or create new folder then add + button  )
4 . Done .

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .