माणूस बना

कलाकाराला समाज सहज स्वीकारत नसतो! प्रत्येकाचं आयुष्य कसं साचेबद्ध असावं अमुक अमुक गोष्टी त्या त्या वेळेनुसार व्हायला हव्यात ह्या साठी आग्रही असतो समाज। मात्र वेगळं काही आयुष्य जगायला कोणाला मार्ग मिळाला तर मात्र ह्याच समाजाला खुपतं ! यांना फक्त पैश्याची गणितं माहिती. आनंद म्हणजे पैसा हे मात्र पक्क गणित झालं असतं त्यांचं . पैसा हवा तो ही गरजेपुरता पुरेसा असतो की. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात की पण स्वीकारणं जड जातं मात्र काही वेगळं ऐकलं बघितलं की असुरक्षितता वाटते कारण ज्याचं त्याच आयुष्य कसं जगायचं त्याने हे ती व्यक्ती ठरवते आणि तो निर्णय घ्यायच स्वातंत्र्य ही त्या व्यक्तीचं असतं . कला मधून सुद्धा आयुष्य जगू शकतो माणूस निदान मशिन सारखं राबवणे नसते. कला हा प्रांत शेवटी मनाचा , बुद्धीचा नाही हृदयाचा असतो.  भावनिक व्यक्तीलाच कलाकारा च मन कळू शकतं . नाती शेवटी मनाने जपली जातात पैश्याने जपली जातात तिथे फक्त व्यवहार असतो. आज काल आजूबाजूला आपण बघतच असतो मना पेक्षा पैश्याला महत्त्व दिलं जातं म्हणून नाती तुटतात.कारण मन कधी जुळलेली च नसतात,  व्यवहार असतो फक्त !  भावना शून्य व्यक्ती माणुस ही नसतात मग!  म्हणून आधी माणूस बना मग आयुष्य जगा मग यशा पेक्षा नाती जपायला शिकणं जास्त महत्वाचं असतं हे भावनिक व्यक्तीलाच कळतं ! शेवटी माणूस कसा होता हे त्याच्या स्वभाव गुणां मुळे इतरांच्या लक्षात राहत त्याने किती कमावले हे दुय्यम ठरतं ! काही स्वतः च्या कुटूंबासाठी आयुष्य वेचतात आणि काही आर्थिक सक्षम असणारे समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित करतात! मरणा अंती समाजासाठी झटणारी माणुसकीने वागणारी माणसंच  इतरांच्या लक्षात राहतात! म्हणून माणुस बनावं आधी मग आयुष्य ही जगावं नुसतं धावधाव फक्त अपेक्षा आणि अति गरजा भागवण्यात आयुष्य वाया घालवणे चूकच! तसंही बाजारपेठ आहेच मोहात पाडायला तुमच्या कडे अमुक गाडी नाही नवा मोबाईल नाही नवं तंत्रज्ञान ,
नाही इत्यादी इत्यादी आठवण करायला! शेवटी वेळेवर कामी येतं नाही कोणाच्या तो माणूस नसतो! मग आर्थिक दृष्टीने मदत करणे असो किंवा भावनिक दृष्टीने ! 


© #vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .