मराठी भाषा दिन


अगं ऐकलस का


' अगं  ऐकलस का.. '
'सुधा च्या सुनेला मुलगी झाली ..'
'हो ना तिसरी मुलगीच झाली ..'
(शेजारच्या  बायकां मधला संवाद असाच सुरू राहिला..)
किती तो रुक्षपणा  तिच्या बोलण्यात..आवाजात..
हृदयावर तीष्ण वार करून गेला..
का बर एकविसाव्या शतकातल हेच चित्र..
म्हणे समाज बदलला आहे..
बुरसटलेल्या चालीरिती सोडून प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करू लागलाय..
काय तर म्हणे घराण्याला वारस नको का?

#विद्या

9/4/2014

शब्दांगण 7


ये जो दिल के

प्रश्न

प्रश्नांची उत्तरं समाज काय म्हणेल ह्या वरच ठरलेली असतात..... स्वतः ला पटेल असं वागणारे कमीच असतात... विद्या

शब्दांगण 6


अस्तित्व

प्रेम म्हणजे

काही चित्रपट सारखे बघावेसे वाटतात ... वैचारिक पाश्वभूमीच भक्कम असली की रासिकांच्या मनावर राज्य करणं आपसुकच आलं... त्यातलच हा  .. प्रेम म्हणजे ... आपल्या इथे समाज नावाच्या गोष्टीला अति महत्व आहे .... जरा प्रवाहा विरुद्ध वारे वाहु लागले की ..  बोलायला हाच समाज पुढे .. पण अपघात वगैरे वाटेत दिसले कि हाच समाज बघ्या ची भूमिका राबवायला मोकळा ...  माणूस कसा जगला हे महत्वाचं ... प्रत्येक जण सुखासाठी च शेवटी धडपडत असतो .. ह्या चित्रपटातली मुख्य पात्र स्व तः च आयुष्य जगताना सोबतीला गृहीत धरणारी... मनाला वाटेल तेव्हा परत सोबतीच्या आयुष्यात येऊन घालमेल करणारी ... नाती किती सहज तोड़ता येतात पण जोडणं कठीण च शेवटी ... विश्वास च नसेल तिथे नाती तरी कशी टिकणार ... वेळे नुसार माणसं परिस्थिती  शी एकरूप होतात ...काळाच्या प्रवाहत वाहतात ... जुनी माणसं गेली तरी नवीन माणसं जीवन सुसहय करायला मदत करतात ... #विद्या

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .