अगं ऐकलस का


' अगं  ऐकलस का.. '
'सुधा च्या सुनेला मुलगी झाली ..'
'हो ना तिसरी मुलगीच झाली ..'
(शेजारच्या  बायकां मधला संवाद असाच सुरू राहिला..)
किती तो रुक्षपणा  तिच्या बोलण्यात..आवाजात..
हृदयावर तीष्ण वार करून गेला..
का बर एकविसाव्या शतकातल हेच चित्र..
म्हणे समाज बदलला आहे..
बुरसटलेल्या चालीरिती सोडून प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करू लागलाय..
काय तर म्हणे घराण्याला वारस नको का?

#विद्या

9/4/2014

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .