चारोळी

वाऱ्याची मंद झुळूक तू



वाऱ्याची मंद झुळूक तू
खळखळ वाहणारा झरा तू

सर सर  वाहणाऱ्या सरी तू
बासरीच संगीत तू

हिरवीगार वनराई तू
अंतर्मनीचा ध्यास तू

टप टप पडणारे
पावसाचे थेंब तू

मनाला चैतन्य देणारा
सखा तू

~ विद्या 

Quotes

Quotes





A new friend is a new wine; when it grows old, you will enjoy drinking it. ~ Alan Kay


Life is beautiful.

Life is beautiful.. Stay blessed... Be in gratitude...#quotes #Turning30 successfully 

Quotes

मालिका लेखन

भावना शून्य लेखन ...तोच तोच पणा .. नवीन संवाद प्रसंग हि नसतात .. सहजता हरवली
.... चांगले कलाकार असले तरी  कला सादर करायला वाव हि मिळत नाही ... मना वर ताबा घेणार लेखन हवं चं गो च्या कथेतली पात्र डोळ्यासमोर उभी राहतात ....शेवटी भावना वरचढ ठरते ...रंगरंगोटी करणारे चेहरे नाही ...

प्रश्न

प्रश्न विचारणं उत्तर जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती  बालपणा पासूनच असते ...  जेवढं ध्यास घेऊ तेवढं उत्तर लवकर मिळतं ... स्व चा शोध घेणं ... इथूनच सुरु होतं असावं ... #विद्या

दिवाळी शुभेच्छापत्रे



गम्मत

एक wrong number ची गंम्मत ... Up bihar वरून call ... मराठी English मध्ये बोललेलं समजलं नाही बायकांना त्या ... मग right number वर बोलतो तसं बोलायला सुरवात केली कैसन वा हो ... सब ठीक बा .. हा हा हा ... बबलू कैसा है ... (उनके घर में  हो या ना हो .. ) ... असल्या संवादाने phone वरच्या बाई ची बोलती च बंद करून टाकली हा वडीलांनी ... नाहीतर सारखा सारखा Call करून दोन दुपारच्या झोप मोडल्या ना ह्या wrong number वाल्या बाईने ...

Relax

Relax योग्य शब्द ... ज्या कामात जीव ओतून काम करावंसं वाटतं ते क्षेत्र योग्यच ... पण कलाकार ... रसिक प्रेम ... सारी अनुभूती ...सुख ... आणि त्याहून महत्वाचं स्वतः काळजी घेणं नाही का ? जे थकतं ते शरीर ... मन मात्र कधीच थकतं नसतं म्हणून त्याला मरण नाही ... #विद्या

राजकारण

राजकारणी मतासाठी वाद विवाद टोकाला जाऊन करतात मात्र जनतेचे प्रश्न सोडवायला  वाद विवाद कधीच करताना दिसत नाही ... मतदाराची आठवण निवडणूक जिंके पर्यंत ...

वाढदिवस

जे जे आपल्या वाढ दिवसाला केक कापतात त्यांच्या साठी .... आणि उरलेला केक तोंडाला फासतात त्यांच्यासाठी ....अन्नाचा अपमान  तो..
घर की मुर्गी दाल बराबर तसं स्वतः च्या संस्कृती पेक्षा इतरांच्या संस्कृती च अनुसरण करण्यात रस ...

सैराट बघितला ? मग ही कथा जरूर वाचा ....

सैराट बघितला? मग ही कथा जरूर वाचा:
.... आई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.
पुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या तर कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार? तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.
‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार? आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’
‘मग तू असे किती दिवस काढणार?’
‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’
पूर्ण कथा पुढील लिंकवर वाचा:
http://mahaakatha.blogspot.in/2015/07/blog-post.html

आरक्षण

खालील लेखावर मत
----------------
#आरक्षण  आर्थिक आधारावर  आणि ठराविक काळासाठी असावं
---------
आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले  दलित स्वतः ला दलित म्हणून आरक्षणाच्या कुबड्यावर जगता आहेत ... तेही  बहूसंख्य कर देतात त्यावर ...ब्राह्मण या समाजाने आंदोलन काढलं तर जाती वर आरक्षण मुक्त भारत साठी असेल ... तेव्हा करतील का हे दलित समर्थन । # विद्या 
--------------
#लेख
*वाचा ब्राम्हण समाजाविषयी एका दलित अभ्यासकाचे जाहीर निरीक्षण*
मला ब्राह्मण बांधवांचे नेहमी कौतुक वाटते !!
- देशातील ब्राह्मण समाज.
लोकसंख्या दोन-अडीच टक्के. तरीही जगातील सर्व क्षेत्र त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर काबीज केले आहेत. त्यांना ना कुठले आरक्षण आहे ना कुठल्या विशेष सवलती. पण साक्षरता ९९.९९ %. जन्मजात धार्मिक संरक्षणामुळे त्यांच्यावर युगानुयुगे टीका होत आली आहे, होते आहे पण या टीकेची परवा न करता ब्राह्मण मंडळींनी आपली चौफेर वाटचाल सुरूच ठेवली. त्यांच्यापैकी अनेकांनी पौरोहित्य सोडले आणि उद्योग धंद्यांची कास धरली. कधी काळी विदेश गमन पाप आहे असे सांगणा-यांनी अवघे जग पादाक्रांत केले.
-कोणतेही घोषित आरक्षण नसताना खुल्या संवर्गातील ९० % जागा त्यांनी आपल्या गुणवत्तेने काबीज केल्या आणि काही लोक त्यांच्याशी खुली स्पर्धा करण्यापेक्षा मागास वर्गावर कुढू लागले. पण आरक्षणाच्या विरोधात ब्राह्मणांनी आपले मोर्चे कधीच काढले नाही ना कधी आंदोलन केले.
त्यांना मी रडताना पहिले नाही. प्रत्येक आंदोलनात ब्राह्मण माणूस पुढे आहे. मग ते अंध श्रद्धेचे आंदोलन असो कि अंधश्रद्धा विरोधाचे, सुधारणेचे असो कि सुधारणेला विरोध करण्याचे !! आंतर जातीय विवाहातही त्यांनी कधीच खडखड केली नाही. पण अविचारी लोकांच्या लक्षात या गोष्टी कधीच येणार नाहीत.
-विशेष म्हणजे या देशात ब्राह्मणांना इतके बडवले जात असतानाही आज देशाची कमांड त्यांच्याच हातात आहे. खरेच मला या समाजाच्या वाटचालीचे नेहमीच कौतुक वाटते.
----बाबा गाढे
अभ्यासक, पत्रकार, व दलित चळवळीचे एक प्रणेते

भारतीय राजकारण

#राजकारण #politics
#जनता #भारतीय आहे का #नेता ...
कर भरतेवेळी सगळे भारतीय असतो ... जनतेला सवलती ,न्याय ,हक्क  देताना मात्र #जात धर्म का आड येतो ... पंतप्रधान देशाचे असतात .. मुख्यमंत्री राज्याचा  असतो .. विशिष्ट जाती भाषेचे नाही .. कोण आहेत  दलित नेते ..कोण obc  नेते  ...कोण मराठा ..ब्राह्मण नेते ... ही विभागणी जनतेनेच केली .. कर जनता भरते  मग विशिष्ट जातीचा नेता कसा असू शकतो ..  ते काय त्यांच्या स्व खर्चातून कोणाला सवलती देतात  का मदत करतात ? असं असतं कराडोची संपत्ती झाली कशी असती .... कोणी सत्तेचा लाभ घेऊन आणि कोणी भ्रष्टाचार करून   धनाढ्य झालेत ..तरी यांची  पोट भरली नाही म्हणून  वेतन वाढ सुरूच ... #विद्या

जबाबदारी

स्वतः ची जबाबदारी स्वतः च घ्यायला शिकलेली बरी काही जण वेळे आधी mature होतात आणि काहींना परिस्थिती शिकवते कसं जगायचं।

आरक्षण

#Reservation In INDIA  #मराठाक्रांतीमोर्चा
आता भारतात जातीवर आरक्षण आहे तर जातीवर च आरक्षण मागणार ना समाज ...  आरक्षणाच्या नावाखाली राजकारण नुसतं ... जातीवरून कोण गरीब कोण श्रीमंत कळत नाही.. काही ठरविक काळासाठी केलेलं आरक्षणाचा कायदा ...  कायदाच रद्द व्हावा किंवा आर्थिक निकषांवर आरक्षण असावं ..
जातीवरून  आणि आर्थिक आधारावर जनगणना व्हायला हवी ... पण राजकारणी पोळी कसे भाजणार... असं झालं तर..
#विद्या

आचार विचार

माणूस वाईट नसतो परिस्थिती वाईट असते आणि ज्या वातावरणात राहणार तशीच व्यक्ती घडते । आपण कोण तरी समाज मात्र ठरवतं असतो चांगलं वाईट । स्वैराचार आणि  swachdi  जगणं ह्यात अंतर असतं आणि ज्याच त्याला माहिती च असतं काय योग्य काय चूक । शेवटी स्वतः च्या कर्माचे स्वतः धनी  । दुसऱ्यानी कसं वागायचं आपल्या हातात नसलं तरी आपण कसं वागावं हे मात्र आपल्याच हातात असतं । 
#विद्या

Atrocity कायदा गैरवापर

atrocity  कायद्याचा गैरवापर म्हणतात ह्याला...
धर्म जाती वर राजकारण नुसतं... आरक्षण आर्थिक आधारावर मिळावं किंवा प्रत्येक जाती साठी टक्के ठरवलेले बरे...#विद्या 
---------------------
कर्जत  - अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हत्येनंतर कोपर्डी येथील आरोपींबाबतच्या अनेक घटना पुढे येत आहेत. डिसेंबर २०१५ मधील धनराज सुद्रिक मृत्यूची फाइल राज्य शासन पुन्हा उघडणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाची चौकशी सुरू होणार आहे.

कोपर्डी येथील बालिकेच्या अत्याचार हत्या प्रकरणामुळे आता धनंजय सुद्रिक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केला, तर कदाचित बालिकेच्या हत्येचे प्रकरण घडले नसते, असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. १५ डिसेंबर २०१५ रोजी कोपर्डी येथील धनंजय जयवंत सुद्रिक, त्यांचे सहकारी अक्षय गोरख सुद्रिक, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र बाबालाल शिंदेचा चुलतभाऊ शांतीलाल शिंदे विजय शिंदे हे चौघे धनंजयच्या नेटकेवाडी येथील मेहुण्याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यावेळी हे सर्वजण खूप दारू प्यायले होते. रात्री ११ वाजता हे चौघे धनंजयच्या सासूरवाडीला घराच्या छतावर झोपले होते.
धनंजय पहाटे साडेचार वाजता कोपर्डीला आपल्या घरी जाणार होता. धनंजयची बायको नंदा घराच्या छतावर गेली, तेव्हा तो तेथे नव्हता. तिने तेथे झोपलेल्या शांतीलालला विचारले असता धनंजय खाली गेल्याचे त्याने सांगितले. मात्र, धनंजय खालीही नव्हता. घराच्या पाठीमागे आवाज येत असल्याने नंदाने वरून खाली पाहिले असता धनंजय खाली पडला असल्याचे दिसले.
शांतीलाल शिंदे विजय शिंदे यांनी मागील भांडणाचा राग मनात ठेवून धनंजयला छतावरून खाली टाकल्याचा आरोप नंदाने केला. धनंजयला खासगी रुग्णालयात तेथून पुढे बारामतीला उपचारांसाठी नेण्यात आले. उपचारांदरम्यान धनंजयचा तेथे मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू जबर मारामुळे झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आला. मात्र, पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद कशी काय केली गेली याचे गौडबंगाल कायम आहे. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शांतीलाल विजय शिंदे यांची गावात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजावत नव्हते.
पोलिसात तक्रार करू नको, असा दम शांतीलालने दिल्याचे नंदा सांगते. पोलिसांनीही आरोपींना पाठीशी घालून नंदाची तक्रार एेकून घेता आरोपींची बाजू घेतली. आरोपी शिंदे याचे नाव घेतल्यास ते दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा वापर करून तुला कायमचे अडकवतील, अशी धमकी दिली गेल्याचा आरोप नंदा करत आहे.
मोकाट सुटल्याने आरोपी आणखी उन्मत्त झाले. नंतर हे आरोपी नंदाला तिच्या घरच्यांना सांगू लागले की, आम्हीच तुमच्या धनंजयला मारले. आपल्या मुलांच्या जीवाला काही धोका होऊ नये, म्हणून आपण गप्प बसून सगळे दुःख बाजूला सारले. मात्र, शिंदे बंधूंचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. याची दखल पोलिसांसह कोणीच घेतली नसल्याची तक्रार नंदा हिने केली आहे.
नंदाला दोन मुली एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत शिकते, तर दुसरी सातवीत आहे. मुलगा पाचवीत शिकतो. कुळधरण येथे शाळेत ते जातात. त्यांचे रस्त्यात बरे-वाईट केले जाऊ शकते. आपणही रानात मजुरीसाठी एकटे जातो. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आपले पती जाऊन सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होऊन गेला, तरीही न्याय मिळालेला नाही, असे नंदाचे म्हणणे आहे.
#अनामिक #बातमी 

Facebook व्यक्ती आणि प्रवृत्ती

वास्तविक जीवनात ना आंदोलन .. ना tv  किंवा वर्तमान पत्रात जन जागृती केलेले लिखाण ... fb वर चार दहा ओळी लिहायच्या  comment वर चर्चा किती ही गंभीर मुद्दे असले तरी .. like मिळवायचं की झालं.. एवढया वर समाधानी हा मात्र .. ही मंडळी .. 
#विद्या

गणपती

देव्हाऱ्यातल्या गणपतीला पाया पडलो काय लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांग लावावी लागते म्हणून इतर मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतलं काय.. सगळ सारखंच ... पण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मिरवणारे जास्त... देऊळ चित्रपटात अगदी वास्तव दाखवलं आहे..

#विद्या

किसी के खयालों



किसी के खयालों में
इतना भी खो मत जाना
की खुद को ही भुला दो
 #विद्या 

नाती

झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए .. नात्याच्या बाबतीत मात्र वेगळं असतं ..नातं टिकवायचं असेल ... एकाला नमतं घ्यावं लागतं... व्यक्त होण्याने प्रश्न सुटतातही .. कारण तरी कळतं ..रुसव्या फुगव्याच ..  आपण आपला प्रयत्न करावा नाही जमलं तर लांब राहिलेलं बरं ...तसही प्रत्येक नात्या ची किंमत ज्याला त्याला माहिती च असते आणि एकमेकांच्या आवडी निवडी मत आणि विचार ही...समोरच्या व्यक्ती च वागणं ही..
#विद्या

Be as u r

R u perfect ? No then why should one expect others to be perfect.
Be As You are .. !
आपण आहोत तसेच स्वतः ला स्विकारलं तर इतरही स्विकारतात कि .. !
अपूर्णतेही पूर्णते कडे जायचा ध्यास असतो की।
#विद्या

विश्वास

स्वतः वर स्वतःच्या वागण्यावर विश्वास असेल .. ऐकावे जनाचे करावे मनाचे .. ह्या प्रमाणे वागायला ..कोणत्याही गोष्टीवर विचार करून अंतिम निर्णय घ्यायला स्वतंत्र्य असतो .. निर्णय हि स्वतः चा मग परिणामाची जबाबदारी हि स्वतः ची । #विद्या

नातं

कोणतं हि नातं असो टाळी एका हाताने वाजत नाही ...नाती टिकवण्याची जबाबदारी दोघांवर असते ... समज गैरसमज प्रत्यक्ष बोलल्या शिवाय सुसंवाद साधल्या शिवाय दूर होत नाहीत ...असं  माझं मत .

Origami art Butterfly


प्रस्तावना

तुमच्या लेखन शैली त ताकद असेल तर प्रस्तावनेची काय गरज  ...मानधनाच्या नावाखाली लुटतात नव साहित्यिकांना hardcopy book प्रकाशित करताना #विद्या

Quotes


Before reaching the goal people
 who are with u r most important 
once than after achieving goal of life.
#vidya

मैत्रबन

शाळा कॉलेज सण उत्सवा निम्मित होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये समाज आणि  पालक प्रबोधनाची गरज आहे ।
आज काल वाद झाले तरी सणा पुरतं एकत्र येतात कि  । मुलं नवीन संसार थाटतात पण पालकांची जबाबदारी हि उचलतात लांब राहिले तरी ।
वृद्धाश्रम म्हणजे मुलं आपली जबाबदारी झटकून देतात यातला प्रकार आहे।  मैत्रबन नागपूर छान उपक्रम राबवतात । सुवर्णमध्य काढला म्हणीन।

प्रबोधन

शाळा कॉलेज सण उत्सवा निम्मित होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये समाज आणि  पालक प्रबोधनाची गरज आहे ।
देशातले प्रश्न सोडवण्यासाठी। संस्कार , संस्कृती साठी। वृद्ध आश्रम का हवेत । मुलं आणि पालकां मधले सुसंवाद होण्या साठी । राजकारणात सक्रिय भाग घेण्यासाठी । जागरूक नागरिक होण्यासाठी ।

भारत विकसनशील देश

भारतामध्ये  अमेरिका किंवा इतर विकसित देशा मधल्या सुख सोयी हव्यात आशा  चांगली आहे पण लोकसंख्या अफाट आहे  , राजकारण , भौगोलिक परिस्थिती , इथले प्रश्न हि  वेगळे  आहेत .... आर्थिक दृष्टया समर्थ व्हायला  व्यवहारिक शिक्षणाचा दर्जा .  शेती प्रधान देश आहे शेती  तंत्रज्ञान आणि शेतकरी यांचा विकास हि गरजेचा.

~ विद्या

मराठी शाळा

मराठी शाळेची संख्या वाढवायची आहे तर साधाच उपाय मुलांना मराठी शाळेत पाठवायचं आणि बाहेर इंग्रजी व्यवहारिक भाषा आहे म्हणून त्या भाषेत पारंगत होण्या साठी वर्ग (क्लास )  लावायचा ! माझं मत।
#विद्या

दहीहंडी

दहीहंडी जवळ येतेय आणि धर्मावरून राजकारण सूरु  नेहमी सारखं। सण उत्सव पूर्वी हि  साजरे व्हायचे अगदी साधे पद्धतीने गुण्या गोविंदाने ।  सणा चा खेळ झालाय   कोणी किती थर लावतं कोण किती कमवत .. किती पैश्याची हंडी त्यावर बातमी (media footage) किती द्यायच ते ठरवणार वार्ताहार ।
    लहान असो वा मोठे
अपघात होतात काही दगावतात त्यांच्या हातात चार पैसे देऊन माणूस परत येणार आहे का ?  एवढी किंमत ठरवली का माणसाच्या आयुष्याची ?  असे खेळा च्या नावावर साजरे होणारे सण सुरूच राहतात राहणार राजकीय आशीर्वादाने ..पण ज्यांची  माणसं दगावली त्या आठवणीं काही पाठ सोडणार नाही त्यांच्या परिवाराच्या ...कोणी अपंग हि होतात कि ..पण  त्याची पर्वा कोणाला ।

मराठी भाषा

कोणी कितीही बोललं मराठी बोला तरी इंग्रजी  व्यवहारात वापरली जाणारी भाषा आहे . मुलाखत घेतली तरी ती इंग्रजी मधून च घेतली जाते हि वस्तुस्थिती आहे हे कोणी विसरू नका म्हणजे झालं.  तेवढी इंग्रजी तर येतेच यायलाच हवी.

बाकी समाजात वावरताना शुद्ध मराठी बोलणं  शिकणं गरजेच.

बाहेरच्या राज्यातली माणसं  महाराष्ट्रात आली तरी त्यांच्या मुलांना मातृभाषा शिकण्या साठी  special class लावतात आणि  शाळेत  English medium मध्ये पाठवतात .. आपण तर आपल्याच राज्यात राहतो तरी मातृभाषे पेक्षा इंग्रजी भाषेचा अभिमान जास्त ... मराठी शाळेत शिकून हि मराठी आणि इतर भाषा शिकू शकतात कि विद्यार्थी ...पण पालकांचा कल जास्त इंग्रजी भाषे कडेच .. खर्च किती हि झाला तरी English medium पाहिजे ..

हो ना English medium  च्या शिक्षणाचा खर्च हि जास्त आणि तिथले शिक्षक मराठी शाळेतले संस्कार तरी देतील का . पालकांना मातृभाषेचा कमीपणा .. माझ्या ऐकण्यात आलेलं मागे उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर स्वतः हुन सांगायचे अभिमाने मुलांना त्यांनी मराठी शाळेत घातलं म्हणून ...

#विद्या

Olympics final

Whoever watch Olympics final other opponent is too much aggressive , eagerly hungry to win and sustain her championship records.. self motivating by talking with own self.. omg

This much needed to win .. But our Sindu is best as sports player and good sensitive human being too... <3

#विद्या

Player

Player give her 100 % no matter who support or not

खेळ

खेळ म्हटलं कि हार जीत आलीच ।
आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडू ला पाठिंबा द्यायला किती आनंद होतो . खेळाडू देशाने काय दिलं काय नाही हा विचार न करता  ध्येय चिकाटी जिद्दीने कष्टाने देशासाठी जिंकायचं ह्याच एका भावनेने खेळत असतात.  ओलीम्पिक पदक विजेत्यांचे आभार.

साहित्यिक

विसरलोच की साहित्यिक म्हणजे नजरेतून टिपलेल्या  घटना शब्दात मांडणारे छायाचित्रकार  नाही का ? 
#विद्या


शब्दांगण


शब्दांगण


राजकीय मत

राजकारणी सोडले तर प्रसिद्ध व्यक्ती ही राजकीय पध्दतीने आपले विचार रसिकांसमोर मांडतात एक तर मतभेद होतं नाहीत बातमी साठी विषय मिळत नाही वार्ताहर लोकांना आणि सर्व खुश ।

Other than politicians celebrity are those who gives political answer to avoid controversy or to make everyone happy with their views.

#vidya

साहित्यिक

विसरलोच की साहित्यिक म्हणजे नजरेतून टिपलेल्या  घटना शब्दात मांडणारे छायाचित्रकार  नाही का ? 
#विद्या

Quotes

Photography

Photography  language  of emotions.
Photography captures the moments.
Photography shares the memory.
Photography is life.
Photography is passion.
Photography is adventure.
~vidya

शब्दांगण


नाती

सर्वांशी  जुळवून  घेता  येतच  नाही  मुळी... प्रत्येकाच्या  आवड निवडी  विचार मत    वेगळी ... स्वभाव वेगळे ... जी  नाती  जुळतात  तिला  एक  भेट हि  पुरेशी  असते ..
विद्या

ये आसू भी ना

========
ये आसू भी ना
हर जज्बात बया कर देते है
जब रोते है
तभी दर्द हलका करते है
जब ख़ुशी से झुम उठते है
तभी आनंद से अपनी झोली भर देते है ।

शब्दांगण


Never underestimate

Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.

तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि  जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं  जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya

Quotes

When there is I there is problem when there is no I there is peace and happiness... <3

Life

Never underestimate anyone in life. Let go of ego and jealousy. Success doesn't have limit. Always be competitor to own self.

तुम्ही कोणी नाही म्हणून लोक विचारणार काय करताय
आणि  जेव्हा स्वतः ची ओळख कराल तेव्हा हि चं माणसं  जळतील....धन्य म्हणायचं आणि बाजूला सरायचं.
#vidya

Possessiveness

Possessiveness

possessiveness not good behaviour for any relationship  when someone starts too much possessive about u as a friend or partner its sign of insecurity ,fear and losing other , jealousy. Sometimes possessiveness is because of less confidence on own self. Trust is best in any relationship. 
  Accepting others as relation family ,friend or partner that doesnt mean one has given all his control  to others. If one truly care for other that person will accept u as u r with positive negative points. No one perfect anyways.
#vidya

रक्षाबंधन

उद्या रक्षाबंधन
रक्ताच्या नात्यानंसाठी  असो वा मानलेल्या भाऊ बहिणी साठी खास च दिवस ! मानलेल्या नात्याला शेवट पर्यन्त टिकवणारे कितीसे। काही मुली तर एकाच्या नावाने चिडवतात म्हणून  राखी चा  आधार घेतात आता हे मुलांना कुठे माहिती असतं साधी असली तर। नव्याचे नऊ दिवस यांचे !  मैत्री वर अविश्वास असेल तर राखी चा आधार घेणाऱ्या काही जणि असतात। मानलेल्या भाऊ बहीण च नातं कधी मनापासून नसेल तर पुढे लग्नाचं नातं होत कि ।  समाज काय म्हणेल म्हणून असली राखी ची बंधन या आधार  कशाला लागतो यांना ।
~विद्या

भक्ती

प्रसाद वाटता येतो पण भक्ती आणि श्रद्धा नाही वाटता येतं. श्रद्धा आत मनात भक्तांच्या खोल रुजते तेव्हा होते ति खरी अनुभूती . अनुभूती शब्दात मांडता येत नाही ती अनुभवावीच लागते . प्रत्येक कर्माची फळं असतात . निस्वार्थी भक्ती केली तरी देव किंवा गुरू आशीर्वाद देत असतात आयुष्य सुकर होतं मात्र श्रध्येने 
~#विद्या

एक अथांग समुद्र

एक अथांग समुद्र मना बाहेरचा 
एक अथांग समुद्र अंतरीचा !
~विद्या

तुम्हाला तुमचा स्व सापडला ना

तुम्हाला तुमचा स्व सापडला नामग झालं की
इतरांना मनावर
छाप पाडण्याच्या
फंदात न पडलेलं बरं मग
~ विद्या

आयुष्यात ढवळाढवळ

दुसऱ्याच्या कौटूंबिक असो वा व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करण्यात काहींना कसला आनंद मिळतो देव जाणे .. स्वतः च स्वतः ला matured म्हणणाऱ्या व्यक्तीनं मध्ये हे गणले जातात . काय तर घरी चार पैसे आणून आर्थिक भार उचलतात . ह्या अश्या समाजमुळे घरात वाद होतात ते वेगळेच ! आई गेली तेव्हा एक सुद्धा जण विचारपूस करायला आला नव्हता आणि वाटेत अनोळखी सार खे वागणारे हे शेजारी। आता मात्र मुलं काय करतात विचारून हैराण करतात वडीलां ना ।
चं गो चारोळी आठवली
इथे प्रत्येकाला वाटतं
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सगळं शांत पणे पाहाणे.
‪#‎chango‬

एकांत

एकांता चे प्रकार असतात  ..  पहिल्यांदा ऐकतेय ...माझ्या साठी एकांत एकांत च असतो ..   तेव्हा व्यक्तीला कोणाची सोबत नको असते ती व्यक्ती स्वतःच्या सोबतीत समाधानी  असते ..
खरा एकांत फक्त संतांना लाभतो .. जीवन मुक्त असणाऱ्याना  म्हणु शकतो ।

#विद्या 

स्वातंत्र्य दिन

आज सकाळी ८ च्या सुमारास  आमच्या भागात शाळेतल्या मुलांना घेऊन शिक्षकांनी  प्रभात फेऱ्या काढल्या होत्या. . मोठ्यांनी फक्त आजचा दिवस साजरा न करता जागरूक नागरिक व्हावं नाही का ... राजकारणात रस घेतला जरा पोस्ट केल्या तर म्हणतात feeling राजकारणी हम्म ...

पैश्याची किंमत

जेव्हा हातात काही नसतं त्यालाच पैश्याची किंमत कळते ..   अचानक आलेल्या वैभवाने स्वभाव संस्कार बदलत नाही तेच खरं ।  श्रद्धा असणारी व्यक्ती आधीच भोळी असते  आणि म्हणून विश्वासू! नाहीतर  मराठी  माणसं गरिबी न पाहिलेली मध्यम वर्गाची श्रीमंत झालेली .. पैसा आला की हुरळून जातात नाती विसरतात आणि पैश्याच्या नादा पायी अजून पैश्याची भुकेली होतात  ..  काही तर वेळ आली तेव्हा उपकार केलेले सुद्धा लक्षात न ठेवणारी ही वेळ आल्यावर खरे चेहरे दिसतात यांचे ।
#vidya

अनुवाद

कोणत्याही भाषेच्या पुस्तकाचे अनुवाद केले तरी प्रत्येक भाषा तिच्या संस्कृतीशी  जोडली गेलेली असते . मागे एक पुस्तक वाचनात आलं दिल्ली मधलं राहणीमान अति स्वातंत्र मद्यपान सारं  असभ्य भाषा यांवर कथा होती . मराठी अनुवाद असल्याने वाचण्यात रस कमी वाटू लागला संस्कृती मधली तफावत  ! ~ विद्या

महागाई

महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या आहेत भरमसाठ..असमाधानी मनाचं लक्षण.. नाहीतर पूर्वी उदरनिर्वाहासाठी काय करता हे विचारलं जायचं आणि आता चार घास जास्त गेले चार पैसे जास्त लागले तर चिडचिड. वेळेला खर्च करता येऊ शकत नाही असल्या साठवणीचा पैसा काय कामाचा. पूर्वी दूरच्या नात्यांचा पाहुणचार शेजार्यांची विचारपूस येणं जाणं असायचं ... खरचं तेव्हाची माणसं समाधानी म्हणून सुखी आणि माणूसपण जपणारी होती. ~ विद्या

स्वातंत्र्य दिन तर खासच

राजकारण्यांचे वाढदिवस आठवडाभर साजरे होतात मग आपणही इतर दिन साजरे करावेत ह्यातच मज्जा आहे नाहीका .... स्वातंत्र्य दिन तर खासच जरा देशभक्ती भाव वाढेल राजकारणी आणि जनतेचा हि ... ह्या निम्मिताने ... जागरूक नागरिक होण्यात देशाचं आणि स्व हित समाजाचं भलं आहे. ~ विद्या

महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या

महागाई नाही लोकांच्या गरजा वाढल्या आहेत भरमसाठ..असमाधानी मनाचं लक्षण.. नाहीतर पूर्वी उदरनिर्वाहासाठी काय करता हे विचारलं जायचं आणि आता चार घास जास्त गेले चार पैसे जास्त लागले तर चिडचिड. वेळेला खर्च करता येऊ शकत नाही असल्या साठवणीचा पैसा काय कामाचा. पूर्वी दूरच्या नात्यांचा पाहुणचार शेजार्यांची विचारपूस येणं जाणं असायचं ... खरचं तेव्हाची माणसं समाधानी म्हणून सुखी आणि माणूसपण जपणारी होती. ~ विद्या

Life risk

Take risk while living life it helps us to grow both mentally and spiritually. Good or bad times nothing stays permanent. Change is blessing most of the time i feel which makes the mind strong than before ~ vidya

तू

कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन

कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन !
आपल्याशी कोणी कटू वाईट वागलं तर राग न धरता ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ती व्यक्ती आज ना उद्या भोगेलच असं म्हणून अलिप्त राहावं. विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही असचं वाटतं.

 ~ विद्या



श्रद्धा तिथे भक्ती

नाती

इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला  धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... रक्ताची नाती असली तरी ...आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी  राहून  जगण्याचा  अधिकार  नाकारणाऱ्या लोकां कडे  दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या

जय महाराष्ट्र

जय  महाराष्ट्र ! राजकारणी नुसते राजकारण करतात.... विदर्भ राज्य केलं तरी हेच राज्य करणार आहेत... प्रश्न सोडवायला काय झालं विदर्भाची... एक तर महाराष्ट्राचा विकास हि चांगलाच आहे इतर राज्याच्या मानाने... अजूनही खूप झाला असता ती गोष्ट वेगळी... मग ह्याचं घोडं अडलं कुठे...वेगळ्या विदर्भाची मागणी कशासाठी ?  #विद्या

अति चांगुलपणा

इतरांचा विचार करता करता आत्म सम्मानाला  धाब्यावर ठेवणं .. सर्व सहन करणं चूकच
.... आपल्याला पाहिजे तसं योग्य समाधानी  राहून  जगण्याचा  अधिकार  नाकारणाऱ्या लोकां कडे  दुर्लक्ष करण ... स्व ची ओळख न विसरण हे च उत्तम ... #विद्या

मानसिक आजार

शारीरिक आजार दिसतो पण मानसिक आजार असून नसल्यासारखा ...शारीरिक आजरापेक्षा तीव्रता जास्त असते तरी  ज्याला होतो त्यालाच भोगावं लागतं.आपण काहीच केलं नाही ह्या अविर्भावात सगळे आजूबाजूचे वावरत असतात. ~ विद्या

पुरुष प्रधान संस्कृती

पुरुष प्रधान संस्कृती आहे ना... म्हणून नाव बदलणं स्वीकारतात मुली .. मी बदलंल fb वर तेव्हा आलं होतं मनात ... लग्न झाल्यावर चालतं मग आधी का नाही... संस्कृती शेवटी... सहजच असतं मुलीनं साठी ...मुलं वारस ना .. त्या ओझ्या खाली झेपेल णार नाव बदलणं..

शब्दांगण


शब्दांगण


मन

तू


शब्दांगण


तेरी राह में

तेरी  राह  में 
नजरे झुका  के  रक्खी  है
पल्के बिछा दि 
वक्त  है  कि  बस्स 
गुजरता  हि  नही 
इंतजार  में
#विद्या 

शब्दांगण


नाती

नाती




अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं हे जास्त मह्त्वाचे वाटतं . एकमेंकाच्या चूका दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं हे सुद्धा आलंच # विद्या

Mind

Now fb is asking what's in ur mind there is nothing .. bcoz i never keep anything in mind..  मन मोकळं केलेलं व्यक्त झालेलं चांगलं असतं ...ढगाळलेलं आभाळ मोकळं होतं बरसलं की निरभ्र  होतं तसं मन निर्मळ होतं 
~ विद्या

कर्म

माणूस चांगला किंवा वाईट वागण्या मध्ये संगत सुद्धा कारणीभूत असते .. आता घरच्यानी चांगले संस्कार केले आणि वाईट मित्रांची संगती लागली तर ती व्यक्ती बिघडणार ना ...  काय चांगलं काय वाईट ह्याला विवेक बुद्धी लागते ...  सकारात्मक विचार करणारी माणसं परीस्थिती कशीही असली तरी  उंची गाठतात ..  तरी शेवटी स्वतः काय करायचं हे तीच व्यक्ती ठरवते ...  ज्याच्या मनावर  इतरांचा ताबा असतो सारासार विचार बुद्धी नसते ते वाईट मार्ग स्वीकारतात .. त्याची फळं त्याला च भोगावी लागतात .. कुटुंब चांगलं असो वा वाईट .. ज्याच्या त्याच्या कर्माचा तो धनी ..

आपलं माणूस

अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर  झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं  हे जास्त मह्त्वाचे वाटतं .  एकमेंकाच्या चूका  दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं  हे सुद्धा आलंच # विद्या

आयुष्य आणि समाज

#success #life #society
पहिला लेख 
==========
#आयुष्य  आणि  समाज #मनस्वीविद्या
===========
आयुष्य  आणि  समाज  एकाच नाण्याच्या दोन बाजू बालपणाच्या काळात फक्त समाज नावाची गोष्ट ठाऊक नसते आणि  त्याच काळात  माणूस  खरया अर्थाने  जीवन  जगत  असतो  ..मनमोकळे पणा  निरागसता  जीवनाची खरी व्याख्या बालपणीच्या क्षणात सापडते .पुढे वय  वाढत जातं  तश्या  जबाबदाऱ्याही …
सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या  गोष्टी वेळेवर झाल्या  कि तुम्ही  समाजात  जगायला  मोकळे …
संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ  शकतं  का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..
समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी  केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं  हा समाज … कधी ऐकलं  नाही  व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का  … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या  विचारांची  सवय झाली  असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..
मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे  ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला  ह्याच गोष्टी  कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने …  आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं …
तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं …
ह्यालाच म्हणतात का … success ?
काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा  तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी …
खऱ्या  अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं …
4/4/16
#vidyap

माणसातला माणूस हरवला

माणसातला माणूस हरवला आणि आयुष्य जगायला हि विसरला. माणसां  पासून  आणि  निसर्गापासून तर दूर च होत चालला आहे.आपल्या society मध्ये किती जण बागेत बसतात.१०- १५ मजली च्या वर इमारती झाल्यात .
आताच थोड्या दिवसापूर्वी माझी मैत्रीण esahity team member ( सामाजिक काम करणारी संस्था). त्यांची साहित्याची cd द्यायला वाचकाच्याघरी गेली .साध घरात सुद्धा घेतलं नाही वाचकांनी.विचारपूस सुद्धा नाही. email वर reply thank u चा आला  मात्र .

पूर्वी साहित्यिक एकमेकांच्या घरी जात येत असायचे.विचारांची देवाण घेवाण हि व्हायची . आता अति देवो भव हे सुद्धा जुनं होतं चाललं आहे. आपल्याच विश्वात मग्न .समाधान हि नाही . दगदगीच आयुष्य झालायं .मग सुख कसलं.स्वतः लाच भेटायला वेळ नसतो.दुसर्यांना कुठुन देणार.

कर्म

माणूस कर्माने ओळखला जातो त्याचं नाव नंतर लागतं .. #मनस्वीविद्या

उदा . संगीतकार ,डॉक्टर ,सामाजिक कार्यकर्ता ,RTI Activist  ,Businessman or job professional...

आपलं माणूस

ते आपलं माणूस आहे ह्याची जाणीव काहींना होते ... पण कधी काळ सुद्धा पुरत नाही ... कधी ... जेव्हा होते तेव्हा व्यक्ती दूर गेलेली असते...... #मनस्वीविद्या

* चंगो च्या पोस्ट वरून सुचलेलं

मन

ज्या गोष्टी मनापासून करतो त्याचं कधीच ओझं वाटतं नाही..प्रत्येक वेळी गंभीर असण्याची अट नको ना... काही गोष्टी हसत खेळत ही होतात... कामही होतं.. आणि मन आनंदी हि राहतं.......

आता हसणं जास्त बरं नाही ... कारण काहीजणांचा गैरसमज होतो... त्याचं  म्हणणं गंभीरतेने घेतलं नाही असं वाटतं... अति वाईट च कोणत्याही गोष्टीची...
#स्वानुभव #मनस्वीविद्या

वक्त वक्त कि बात है


वक्त वक्त कि बात है 


अहंकाराचे पंख छाटायला ... 
एक वेळच पुरेशी असते!
------------
वक्त वक्त कि बात है 
आज किसी का है 
कल किसी और का होगा..
#vidya

आयुष्य

inorganic झालय आज कालच  आयुष्य  ..माणसापासून  दूर जातायत  माणसं ....पण  निसर्गापासून  दूर गेलेलं  माणसाला  तरी  परवडेल का ?

मालिका

Zee Marathi वरच्या मालिका .. खुप महिन्यांनी एक भाग बघितला ... पूर्ण भागात सासू सुनेला कशी छळते ... नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं ...तर दुसऱ्या मालिकेत अंधश्रद्धा शिवाय काही नसतं ....ह्या असल्या मालिका चालू का राहतात trp कोण वाढवत असेल ..  असंवेदनशील समाजाची लक्षण म्हणायच दुसरं काय

दर्जा

साहित्यिक दर्जा रसिक ठरवतात .. छोटं मोठं काय असतं .. प्र त्येका च भाव विश्व वेगळ अनुभव .. जीवन जगण्याची कला वेगळी ... आपण आहोत तसं स्वतः ला स्वीकारण्यात काहीच हरकत नाही असं वाटतं... निंदकाचे घर असावे शेजारी ... हे पण आलंच....#विद्या

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .