माणसातला माणूस हरवला आणि आयुष्य जगायला हि विसरला. माणसां पासून आणि निसर्गापासून तर दूर च होत चालला आहे.आपल्या society मध्ये किती जण बागेत बसतात.१०- १५ मजली च्या वर इमारती झाल्यात .
आताच थोड्या दिवसापूर्वी माझी मैत्रीण esahity team member ( सामाजिक काम करणारी संस्था). त्यांची साहित्याची cd द्यायला वाचकाच्याघरी गेली .साध घरात सुद्धा घेतलं नाही वाचकांनी.विचारपूस सुद्धा नाही. email वर reply thank u चा आला मात्र .
पूर्वी साहित्यिक एकमेकांच्या घरी जात येत असायचे.विचारांची देवाण घेवाण हि व्हायची . आता अति देवो भव हे सुद्धा जुनं होतं चाललं आहे. आपल्याच विश्वात मग्न .समाधान हि नाही . दगदगीच आयुष्य झालायं .मग सुख कसलं.स्वतः लाच भेटायला वेळ नसतो.दुसर्यांना कुठुन देणार.

0 comments:
Post a Comment