मैत्री
नव्या भेटी नवी नाती मग नात्यांना नाव शोधण्याच्या ..देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा मैत्री नाव देऊन मोकळं व्हावं की ...
विचार
आपल्या मनातील विचारांवर स्वतः च्या विचारांचा प्रभाव हवा की दुसऱ्यांच्या हे आपण च ठरवायचं असतं ! आपल्या आयुष्यातले निर्णय घ्यायला आपण मोकळे मग ..(समर्थ मग )! तेव्हा म्हणू शकतो आपण स्वतंत्र आहोत! नाहीतर आपल्या प्रत्येक कृतीवर समाजाचा प्रभाव दिसतोच मग ते कलेतून व्यक्त होणं असो वा स्वतः साठी चे निर्णय घेणे असो.
#vidyamslife
कागदी पिशव्या ..
आमच्या भागात कागदी पिशव्या देतात .. कोकणात तर आधीच सुरू झालेलं हे ..! जनतेचे आणि सरकारच्या मानसिकतेचा प्रश्न आहे शेवटी!
धर्म आणि स्त्री पुरुष
पुरोगामी(?) स्त्रियांना नातेवाईकांच्या अंत्यविधी करावा इतका अट्टहास का असतो?? सद्गुरू कडून एकच कळलं नकारात्मक उर्जा खूप असते म्हणून ! नशीब पुरुषांनी अट्टहास केला नाही की जन्म स्त्री ने च का द्यावा ! देवळात जाण्यावर बंदी असते तिथेही हे च कारण ! आरोग्यासाठी साठी चांगलं नाही ! काही देवळात स्त्रियांना आणि काही देवळात पुरुषांना बंदी असते !
#vidya
मैत्री आणि social media
खऱ्या आयुष्यात संपर्कात असणाऱ्यांनी fb वर असून नसून काय फरक पडतो .. मग ते नातेवाईक असो शेजारी असो वा मित्र मंडळी ! काही fb वर झालेल्या ओळखी .. भेटी नंतर ही fb चा मोह सुटत नाही! पोस्ट ला like , comment एकमेकांच्या करायला तो काय व्यवहार आहे का ? मदतीच्या वेळी संपर्कात असणं जास्त गरजेचं की fb वर posts ना like comment करून ..काही जण इतकी निरागस असतात मदत मागताना मी कामापूरता मामा बनवलं असं बोलतात खेद व्यक्त करतात #vidya
Being मराठी
Being मराठी .. Proud of मराठी म्हणणारे इंग्रजीचे गुलामच इंग्रजाळलेली माणसं नुसती ! काहींनी fb page सुरू केलय .. ! मिंग्रजी भाषा वापरून! 🤣
शिक्षण आणि माणूस
प्रत्येक पिढी मध्ये संकुचित आणि मोकळ्या विचारांची माणसं असतात. समोरचा चुकतं असला तरी आपण त्याला काही बोलत नाही. मनाने दुखवतील म्हणून नात्यांना किंवा माणसाला स्वीकारलं जातं आणि प्रश्न तसेच राहतात मग. मनाची अंतर वाढली की नातं कसलं टिकून राहणार मग . यावर उपाय म्हणजे वाचन आणि माणसांच्या भेटी गाठी एकमेकांचे विचार कळतात ..स्वतः मध्ये काय बदल करावा कसं वागावं कसं वागू नये हे ही कळतं.. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरूनही. तरीही हे सांगणारं शिक्षण हवंच .. ! निदान शिक्षकांनी तरी दयायला हवं .. जपान का जर्मनी मध्ये तीन चार वर्षे व्यक्तीने चार चौघात कसं वागावं नम्र असावं समान वागणूक द्यावी हे शिकवतात .
वय आणि समजूतदारपणा
वयाचा आणि समजूतदारपणाचा काडीचा संबंध नसतो! तरी कोणाशी कसं वागावं कसं वागू नये बोलू नये ! काय बोलावं काय बोलू नये ! कसं बोलावं इथपासून संवादाची सुरवात व्हावी पण संवादा पेक्षा वयच आडवं येत की आम्ही जास्त पावसाळे बघितले आम्ही जास्त अनुभवी म्हणून फुकटचे सल्ले मत लादयला मोकळे ! सुसंवाद ,माणुसकी चे धडे शाळेपासूनच द्यायला हवेत खरे तर ! माणूस म्हणून घडेल नाहीतर जनावर आणि माणसात काय फरक ! समोरच्या व्यक्ती मग पालक असो वा लहान मुलं माणूस बनायला हव की आधी ! #vidya
संवाद
काय बोलावं पेक्षा काय बोलू नये कसं बोलावं याची जास्त गरज आहे सध्या मग सुसंवाद होऊ शकतो ! नाहीतर नुसती वायफळ बडबड आणि वाद विवाद !
भोंदूगिरी च समर्थन नकोच
आज काल धर्माचा मुखवटा घालून सभ्य माणूस म्हणून मिरवायला मोकळे ना ... कोणाला कळतच मग खरं काय खोटं काय ..गुरु च ऐकल नाही त्यांनी .. शरद उपाध्ये यांनी मोठा लेख लिहिला होता .. जो स्वत ची पूजा करायला सांगतो भोंदुगिरी ला समर्थन आणि अश्या लोकांना सामान्य माणूसच मोठे करतात कि ..राजकारणी होते मग गुन्हेगार असलं तर नवल नाही वाटल त्यांना हि धमक्या उगाच थोडी मिळायच्या अश्या भानगडी केल्या शिवाय ...हिंदी चित्रपट चे अभिनेता लोक कसे गुन्हेगार असतात म्हणून प्रतिमा चांगली करायला नवीन नवीन चांगले चित्रपट काढतात मग सलमान असो वा संजय दत्त ... त्यातले हे मग तर ..मला फक्त सामाजिक काम करायचे एवढच माहिती .. इतर काहीच माहिती नाही ..
बदल
बदल स्वीकारणं कठीण असतं .. सवय आणि आधार वाटतो नात्यांचा मग हरवलं की असुरक्षित वाटतं .. Healing ची म्हणून गरज पडते. व्यक्त होण्यासाठी आणि आपल्याला समजून घेणारी एक तरी व्यक्ती हवी आयुष्यात असं वाटतं मग.
वाईट वृत्ती माणसं असतात
ज्यांना ज्यांना चंगो च यश खुपतय inbox मध्ये जाऊन त्रास देतात त्यांनी इथल्या प्रतिक्रिया सुद्धा जरूर वाचाव्यात शब्दांनी तोंड काळ होईल आणि आरसा ही दिसेल .. ! तुमचं जळण तुमच्यापाशी ठेवा वर्तमानात जगायला शिका आणि वर्तमान पचवायला शिका 😡
न आणि ण
न आणि ण प्रमाण भाषे साठी फक्त वापरतात . https://youtu.be/NVhKSyqGLD4 बोलीभाषेसाठी प्रमाण भाषेचं व्याकरण लागू होत नाही किंवा बोलीभाषेच व्याकरण कोणी लिहिल असेल तर .. चला मालवणी शिकूया fb pageवर आहे मालवणी भाषेच व्याकरण @ https://www.facebook.com/malavanilanguageteaching/
आयुष्य
जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना ! वयाचा आणि जाण्याचा काही संबध नसतो ओ . जितकं क्षण मिळतील त्यांच सोनं करायचं इतकच आपल्या हातात असतं. पालक असो वा कोणी दुसऱ्याचा राग आपल्या मुलांवर .. जवळच्या व्यक्ती वर काढतात हे मात्र खरं. पण त्याचा त्रास होईल हा विचार सुद्धा त्या पालकांना शिवत नाही.म्हणून मुफट असेललं बरं वाटतं. मानसिक खच्चीकरण करण्यात पालक आणि समाज याचा जास्त हात असतो.प्रोत्साहन देण्यापेक्षा .संघर्ष असला की आजूबाजूचे लोकं चौकशी करतात आणि मग काही उत्तर नाही गवसलं तर इथेही तुलना करतात.. राग मुलांवर काढतात. स्वानुभव. काळ बदलला तरी बाप बदलत नसतो. ऐकावे जनाचे करावे मनाचे .आपल्याला योग्य वाटेल तेच करत राहायचं .स्वतः साठी ठाम राहायचा क्षण गवसला की झालं आपण आपल्या वाटेने चालायला मोकळे.तसही स्वतः ची स्वप्न पूर्ण करायला जन्म मिळाला असतो
वय
अजून दोन तीन वर्षे आहेत की ओ साठी ला ! राजकीय नेत्यां सारखं जगायचं कशाला उद्या ची बात ! साठी निवृत्ती हे सगळं त्यांच्या शब्दकोशातच नसतं ! मनाने तरुण असणाऱ्यांनी कवीने वय मोजायच्या भानगडीत पडायचं च कशाला ओ ! 😂






