pisces

जोपर्यंत माणूस कळतं नाही तोपर्यंत चांगलं वागतात !नंतर समोरच्या माणसाला ओळखलं की चांगलं वागायचं की वाईट समोरच्या माणसाच्या वागणुकीवर अवलंबून असते!

वाद विवादात पडणं बिलकुल आवडतं नसतं. सरळ निरोप देतात नाही पटत तर नाही पटत एखाद्या व्यक्ती सोबत.

good bye 2020

#2020 
ह्यावर्षी घडलेल्या गोष्टी

१.  ई अक्षरमन शब्दत्रिवेणी  नावाने YouTube वर दोन साहित्यिक, उपक्रम मैत्रिणींच्या मदतीने राबवले!☺️ ते ही lockdown मध्ये! 
२. नवीन नवीन recipe शिकल्या आणि जमेल तसे video काढले !

social media आणि माणसं

Facebook उत्तम माध्यम आहे  आपली कला सादर करायला , व्यक्त व्हायला. वपू बोलतात तसं कोणी चोवीस तास एका भूमिकेत नसतं. उदाहरण कवी चोवीस तास कवी नसतो किंवा कोणताही कलाकार. कलाकार आवडला म्हणजे त्याच्यातल्या माणसाला आपण ओळखतो असं कुठे असतं. म्हणून ती व्यक्ती कशी आहे हे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ती चांगली आहे का वाईट ह्याचे अंदाज बांधणे योग्य नाही वाटतं. संवाद पेपर देहबोली ८०% बोलकी असते म्हणून भेटीगाठी करून माणूस ओळखणं उत्तम . आपण चांगलं वागलं म्हणजे दुसरी व्यक्ती चांगली वागेल हे गृहीत धरूच नये. चुकातून शिकत जायचं इतकंच माणसांच्या हाती असतं. इथे कोणी वाईट बोललं तर लगेच screenshot घेणार समोरची व्यक्ती. मग बदनामी व्हायला किती वेळ लागतो. चांगल्या पण मोजक्याच व्यक्तीं सोबत मैत्री झाली तर आपलं नशीब समजायचं . जे आपले नाहीत त्यांना सरळ निरोप द्यायचा कायमचा. प्रत्येका सोबत wavelength जुळायलाच हवी असा अट्टहास नसावा.  #vidya

वाटसरू

#वाटसरू

quotes

my quotes

मैत्री

मैत्री साठी एकच अट असते ती म्हणजे  तुम्ही कसे माणूस आहात. पैसा, प्रसिद्धी , शिक्षण सगळं दुय्यम ठरतं.    #vidya

quotes

भेटीगाठी

माणसांच्या भेटीगाठी कराव्या खऱ्या आयुष्यात त्यातून आपण कसं वागायचं कसं नाही हे पण शिकता येतं!
#vidya

1

म्हणून आम्ही बिघडलेलोच आहोत ! कारण स्वतःच्या विचारांनी चालतो 😎😂 तुमच्या आयुष्यात काय दिवे लावायचे ते तुम्ही लावायला स्वतंत्र आहात तसे आम्ही पण स्वतंत्रच आहोत 😀

व्यसनी बायका

सावधान! गोड गोड बोलून फिरायला जाऊया बोलतात बायका आणि इतर स्त्रियांना त्यांचे स्वतःचे फोटो ,video काढायला लावतात! 😡 fb वर मिरवायच असतं! Social media च व्यसन लागलं असतं अश्यांना!
दुसऱ्यांना फसवणाऱ्यांचं ,दुसऱ्या माणसांचा वापर करणाऱ्यांच काही चांगलं होतं नसतं! कर्माची फळं ह्या नाहीतर पुढच्या जन्मात नक्की मिळतात! 

#vidya

पुणेकर

काही वय वर्ष साठ झाली निवृत्त झाली तरी दुपारची झोप नको असते आणि आम्ही पुणेकर नसलो तरी दुपारची झोप मात्र सोडत नाही! 😂 
#vidya

कलाकार

कलाकार त्यातही छान छान लिहिणारी व्यक्ती मध्ये माणुसकी नसेल तर तो माणूस ही नसतो!

#vidya

old post

Whenever you take right decision you gets the peaceful mind as the end result . 
#vidya

आपण कोण

आपण कोण आहोत कळलं की प्रगती खुंटते तशी पण😂😀 आणि सोबत माज येतो तो वेगळा! जो retirement झाली तरी टिकून राहतो नोकरी करणारी व्यक्ती ही अपवाद नाही !#vidy
27 dec

सुख

लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. #vapu

नाही

Be yourself. एखादी गोष्ट मनापासून करावीशी नाही वाटली तर सरळ नाही म्हणावं! 
#vidya

हो

हो बोललो की सगळे चांगले वागतात! नाही बोलल्यावर समोरच्याचे खरे रंग ही कळतात! 😀🤣 मग पालक पण आले त्यात! 
#vidy27 dec

risk

Take risk in life either you win or learn lessons in life.
#vidya

28 December diary

आवाज नुसता चांगला असून चालत नसतं !मन चांगलं असावं लागतं!
#इति माझा भाऊ 😂🤣

social media व्यसन

फिरायला जाताना जर सतत social media वापरणार असाल तर तुम्ही फक्त देहाने फिरत आहात मनाने नाही!
माणसं आजूबाजूला असताना mobile वापरणं त्याला phubbing म्हणतात! मागे आशा भोसले यांनी ही पोस्ट केली होती! सगळे मोबाईल मध्ये घुसलेले त्याच्या सोबत बोलायला कोणी नव्हता! Mobile चा वाटू वापर करणे हे सुद्धा व्यसन आहे! फक्त या व्यसना बद्दल अजून जनजागृती कमी आहे म्हणायला हवं! 

#vidya

quotes

👣
          👣
                      👣
 "If you think you are big, you will become small. If you are willing to become an absolute nothing, you will become larger than creation and Creator."
 - *Sadhguru*

प्रश्न

स्वतः चे प्रश्न स्वतः च सोडवायचे असतात! कारण समोरच्या व्यक्तीला मनाचा कोलाहल तितक्याच तीव्रतेने कळेलच असं नसतं! एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं त्या वेळी नाहीच मिळालं तर शांत राहण्या शिवाय पर्याय नसतो! #vidya

देह बोली

खऱ्या आयुष्यात माणसांच्या भेटीगाठी कराव्या कारण social media वर गोड गोड बोलणारे काही स्वार्थी माणसं ही भेटतात हे भेटल्या शिवाय कळत नसतं! वस्तू पेक्षा माणसांचा वापर करण्यात पटाईत असतात. वाणी बोलत असली तरी देह ८०% बोलतो.
तेच हवं असतं माणसं वाचताना! #vidya

शांत

स्वतः चे प्रश्न स्वतः च सोडवायचे असतात! कारण समोरच्या व्यक्तीला मनाचा कोलाहल तितक्याच तीव्रतेने कळेलच असं नसतं! एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं त्या वेळी नाहीच मिळालं तर शांत राहण्या शिवाय पर्याय नसतो! #vidya

दुष्ट माणसं

खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपाहन्मुखभंगो वा दूरतो वा विसर्जनम्।।

दुष्ट आणि काटा यांचा प्रतिकार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर जोड्याने त्याचे तोंड फोडावे किंवा दूर नेऊन टाकावे.
****

दोन्ही करावंसं वाटतं पण आम्ही दुसरं निवडतो 😂

mobile addiction

फिरायला जाताना जर सतत social media वापरणार असाल तर तुम्ही फक्त देहाने फिरत आहात मनाने नाही!
माणसं आजूबाजूला असताना mobile वापरणं त्याला phubbing म्हणतात! मागे आशा भोसले यांनी ही पोस्ट केली होती! सगळे मोबाईल मध्ये घुसलेले त्याच्या सोबत बोलायला कोणी नव्हता! Mobile चा वाटू वापर करणे हे सुद्धा व्यसन आहे! फक्त या व्यसना बद्दल अजून जनजागृती कमी आहे म्हणायला हवं! 

#vidya

अस्तित्व

शून्यातून स्वतः च अस्तित्व निर्माण करणारी व्यक्ती , स्वतः एकटा संघर्ष करणारी व्यक्ती आपल्या मुळांना घट्ट धरून असते! सामान्य ते असामान्य प्रवास झालेला उत्तम ! माणूस म्हणून सुध्दा ती घडतं असते! ज्याची मूळ मातीला घट्ट धरून असतात ते झाडंच तग धरुन रहात शेवटी! दुसऱ्याच्या अस्तित्वा मुळे ओळख असणाऱ्यांना स्वतःच वेगळं अस्तित्व नसतं आणि त्यांनी शोधलं ही नसतं  किंवा त्यांना गरजही वाटतं नसते! ज्यांना वाटते ते स्वतःच वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी धडपड करतात! आहे त्या अनुकूल जगाचा ही त्याग करतात! #vidya

सामाजिक कार्य

आज काल सामाजिक कार्य सुद्धा दिखावा म्हणून करतात काही लोकं! मान सन्मान मिळावा म्हणून किती तो आटापिटा असतो काहींचा!  #vidya

quotes

If anyone want to be with you sincerely then they will never try to  change you. They will accept you the way you are. Be yourself right people will stay in your life.
#vidya

आदर

तुम्ही कोण आहात ? काय करता? आम्हाला तुमच्या कडून काही भविष्यात मदत होईल का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीतशी मिळाली की समोरच्याला मान , आदर द्यायचा , संपर्कात राहायचं की नाही ठरवतात कलियुगातली लोकं! #vidya

समृद्धी माणूस आणि वाचन

जोपर्यंत माणूस त्याने लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणत नाही तोपर्यंत तो समृद्ध होतं नाही! शेवटी माणूस कसा होता यावरच चर्चा होते त्याने किती कमवल त्याला किती यश मिळालं होतं या पेक्षा माणूस माणूस झाला का याकडे लक्ष असतं इतरांचं !नाहीतर माणूस देव आणि जनावर दोघांच्या मध्ये तारेवरची कसरत करतच असतो! निदान माणुसकीने वागला तर माणूस म्हणून तरी घडेल ! #vidya

सुंदर देह का मन

सुंदर देहापुढे मनाची सुंदरता , निर्मळ मनच वरचढ ठरतं! 
#vidya

गुरू

खरा गुरु स्वानुभवी असतो!आत्म ज्ञानाची अनुभुती झालेला असतो! सर्वांना एक समान वागवतो भेदभाव करत नाही!☺️#vidya

वागणूक

आपल्याला समोरच्याकडून जशी वागणूक हवी तशीच वागणूक त्या व्यक्तीला द्यावी तेव्हा मात्र पद ,प्रतिष्ठा , पैसा , श्रीमंत ,गरीब , वय याचा विचार बाजूला ठेवायचा असतो  ! पण आपण कितीही चांगले वागलो , मदत केली तरी वस्तूं पेक्षा माणसाचा वापर करणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला भेटतातच ! # vidya

माणूस

माणूस ओळखणं आणि चांगली व्यक्ती भेटणं कलियुगात दुर्मिळ झालं असं वाटत अशी माणसं भेटली की !

स्वतंत्र स्त्री

स्वतंत्र विचार करणाऱ्या मुली ना स्त्रियांना झेपतात ना पुरुषांना! कारण लोकांना नाही हा शब्द ऐकायची सवय नसते! #vidya

व्यक्तिमत्त्व कपड्यावरून नसतं ओळखायचं

विमानातून प्रवास करताना सुधा मूर्तीला कपड्यावरुन cattle class म्हणाले आणि नंतर  तीच त्यांना मार्गदर्शक होती. कपड्यावरून कोण काय आहे हे कधीच कळत नसतं . स्वतः ला मेकअप करायला आवडतो म्हणून इतरांना आवडत नसेल तर त्यांना हीनवु तरी नये इतके साधे mannersसुद्धा नसतात काही लोकांमध्ये! #vidya

self respect

Self respect is more important than anything.Never compromise with self respect even you are in trouble situation.  #vidya

गावातली मुलं

शहरातल्या लहान मुलांपेक्षा गावातील मुलांना अधिक समाजाची जाणीव असतात. गावी सगळ्या वयाची माणसं रहातात . एखादी घटना घडली तर लगेच पसरते! सहावी चा मुलगा सांगत होता क्रिकेट साठी पैसे आम्ही मुलं गोळा करतो का तर मोठी माणसं उल्लू बनवतात!

पैसे गोळा करून हवी ती गोष्ट आणली नाही तर वाद होतात आणि पैसे पुन्हा एकमेकांना वाटले जातात!

यंदा कोरोना काळात मुलं फक्त घरी नाहीतर क्रिकेट खेळत होती . वाट बघत होती शाळा कधी सुरू होतेय त्याची.  त्यांना गणेशोत्सव पण बरोबर साजरा करता आला नाही.  सगळे  बँड बाजे मिरवणूक असायची सांगत होते. मी म्हटलं दोन तीन महिन्यात होईल सगळं ठीक लस येईल आता बातम्या तर येत आहेत tv वर !

सहावी चा मुलगा सांगत होता त्याच्या गावी एक २७ वर्षाचा मुलगा दारू पिऊन वारला. (मृत्यू ची जाणीव आहे त्यांना इतक्या लहान वयात .) मी काही दारू पिणार नाही .( दुसऱ्या च्या चुका मधून शिकला.)वडलां सोबत जातो  dj च्या व्यवसाय आहे वडलांचा. मोठी माणसं पितात पण मी नाही कधी पीत . गाणी पण चांगली वाजवतो सांगत होता!
#vidya

सावळी

एक कोकणात सातवीत असणारी मुलगी भेटली! ती सावळी गोरी नाही  अशी ओळख तिनेच स्वतः ची केली! समाजाने बिंबवले होते की गोरा रंग सुंदर! विसाव्या शतकात असली मानसिकता आपल्या देशात अजून ही आहे!😢 मी म्हटलं तिला तू पण सुंदर आहेस लोकं काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नकोस! आपण सुंदर आहोत असं म्हणायचं!☺️ Miss world काmiss universe एक जण झाली ती  सुद्धा सावळी होती असं सांगितलं! #vidya

आयुष्य आणि कोरोना

2020 वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!

 माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 

आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्या वर्तमानात जगायला शिकवतात आणि भविष्य सुद्धा वर्तमानातूनच निर्माण होतं!
#vidya

1

थालीपीठाचे वडे,उकडाम्बा  अप्रतिम लागतो! कोकणात एका सुगरणीच्या हात च खायला मिळालं! 😋

मन

सुंदर देहापुढे मनाची सुंदरता , निर्मळ मन वरचढ ठरतं! 
#vidya

समृद्ध माणूस

जोपर्यंत माणूस त्याने लिहिलेल्या चांगल्या गोष्टी वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणत नाही तोपर्यंत तो समृद्ध होतं नाही! शेवटी माणूस कसा होता यावरच चर्चा होते त्याने किती कमवल त्याला किती यश मिळालं होतं या पेक्षा माणूस माणूस झाला का याकडे लक्ष असतं इतरांचं !नाहीतर माणूस देव आणि जनावर दोघांच्या मध्ये तारेवरची कसरत करतच असतो! निदान माणुसकीने वागला तर माणूस म्हणून तरी घडेल ! #vidya

2020

वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!

माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 

आयुष्यात जे काही घडायला हवं वर्तमानात शिकायला हवं ते ते आयुष्य शिकवत असतं!

#vidya

......

2020 वर्षभर कोरोनाच्या काळात काही सकारात्मक गोष्टी काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या! पूर्वी जेव्हा औषध उपलब्ध नव्हतं तेव्हा रुद्राक्षाची झाडं निर्माण झाली!

 माणूसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे धावपळीच्या जगण्यात माणूस विसरला हेच लक्षात आणून द्यायला निसर्ग आपलं रूप दाखवत असतो की! तो सूक्ष्म कोरोना एवढ्या मोठ्या माणसाला घरात बसवू शकतो ! जिवा पेक्षा काही मोठं नसतं! जीवन पैश्या पेक्षा मूल्यवान आहे ! वेळ आली की आहे त्या परिस्थितिचा सामना करायचा असतो हेच शिकवलं! वयस्कर मंडळीना घरी आराम करायला लावला आणि नव्या पिढीला कौटुंबिक व्यवहार शिकवला!  माणसाने आधी माणूस बना हे काहींना शिकवलं ! Digital Technology येऊन किती वर्षे झाली पण ह्यावेळी उपयोग जास्त झाला online transaction झाली! हळूहळू माणूस प्रगत होईल तसा भ्रष्ट्राचार कमी होईल ol transaction मुळे भारतात अशी अपेक्षा मात्र ठेवायला हवी ! नाहीतर कायदे आहेतच भ्रष्टाचार विरोधात! 

आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत असतात त्या वर्तमानात जगायला शिकवतात आणि भविष्य सुद्धा वर्तमानातूनच निर्माण होतं!

#vidya

मान सन्मान

एखादी उंची गाठली म्हणून  समाजात मान मिळतो ! तरीही सामान्य माणसा मुळे ही मंडळी मोठी झाली असतात ते विसरतात! जी इतरांना कमी लेखतात . मीच मोठा ह्या तोऱ्यात वावरतात ती एक दिवशी एकलकोंडी पडतात!
#vidya

गृहउद्योग

कोकणात देवरुख मध्ये माझी प्रणाली सोबत ओळख झाली , मैत्री झाली !तिने जेवणाची सेवा पुरवण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे! उद्योग सुरू करून एक महिना झाला!   ☺️ तिच्यासाठी business card design बनवून दिलं!

 Vidya

शांत

अनोळखी माणसांनी लेखकांपासून लांब रहावं 😎 कारण ते शांत असले तरी प्रत्येक गोष्टीच , व्यक्तीच्या वागण्याचं सतत निरीक्षण करत असतात ! समाजात काय चालले आहे  हे त्यांना लोकाच्या वागण्यावरून आणि लहान ,मोठ्या वयाच्या व्यक्तीं सोबत संवाद करून कळतं ! ☺️  निरीक्षण करत असताना आपली मत आणि आपलं ज्ञानाचं प्रदर्शन करणं लेखन करणारी व्यक्ती टाळते !वाद विवाद नाहीतर सुरू होतात की विरुद्ध मताची व्यक्ती भेटल्या की! 🤣😎
#vidya

नाती

Maturity कमी असते म्हणून माणसं नात टिकावायचा विफळ प्रयत्न करतात आणि  संवाद संपतो शेवटी टाळी एका हाताने वाजत नसते! दुसरं कारण माणसांची सवय होते मग त्याच्या चुका कडे पण आपण दुर्लक्ष करतो ! :( 

6

कलाकार उत्तम असला तरी माणूस म्हणून चांगला असेलच असं काही नसतं! #vidya

5

आपण दुसऱ्या व्यक्ती सोबत कसे वागतो यावरून आपलं व्यक्तिमत्त्व समोरच्याला कळत असतं! समोरचा वाईट वागला म्हणून आपण पण तेच केलं तर आपल्यात आणि त्याच्यात काय फरक पण दुसऱ्यांना दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखात रहात नाही! #vidya

4

माणूस बदनामी ला घाबरतो ! मग स्त्री असो वा पुरुष ! #vidya

3

दुसऱ्याची लायकी काढणारे स्वतःची च लायकी दाखवत असतात! #vidya

2

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः|
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा||

ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घासून, तुकडा पाडून, तापवून आणि आघात करून- अशा  चार प्रकारांनी करतात; त्याप्रमाणे माणसांची परीक्षा त्याचं शिक्षण, चारित्र्य, गुण आणि कर्म यावरुन करतात.

1

प्रवाहाच्या विरुद्ध जायला धाडस लागतं! आपला स्वभाव , वागणं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व ,वेगळेपण जपणं स्वतःच्याच हातात असतं! आपण आहोत तसं आपण  स्वतःला स्वीकारल की झालं मग इतरांना आपला स्वभाव ,विचार कोणाला आवडो वा न आवडो आपल्याला कशाला फरक पडावा मग!
#vidya

पुस्तक प्रकाशन

जग बदलत आहे म्हणून आपणही बदलायला हवं ! पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर रसिक हवाच आहे त्यासाठी कोणी fb profile वापरत ! बाहेरच्या देशातले साहित्यिक fb page वापरतात ! पूर्वी वर्तमानपत्रात प्रकाशित करायचे मला तर ते पूर्वी च जास्त आवडतं!☺️ कारण तिकडे संपादक असतो उगाच काही ही प्रकाशित करत नाही ! विकास ही होतो लिहिणाऱ्या व्यक्ती चा! Fb वर पोस्ट करून नावीन्य जातं! पण रसिक असतात ते संग्रही हवं म्हणून घेतातच ! #vidya

कर्म

माणसाच्या आयुष्यात सगळं मनासारखं होईलच असं नसतं.आयुष्य क्षणभंगुर आहे! माणूस देव नाही . अति प्रमाणात अपेक्षा करू नये स्वतः कडून किंवा इतरांकडून .आपल्या हातात फक्त कर्म करणं असतं फळाची अपेक्षा करू नये  , भगवद्गीता मध्ये  लिहिलं आहे. इतकं जरी जमलं तरी पुरे.आयुष्यात चांगली माणसं आणि वाईट दोन्ही माणसं असतात . चांगलं काम करत असू तर कोणी ना कोणी मार्गात येणारच की . कोणतंही काम जीवापेक्षा मोठं नसतं. मन शांत ठेवायला म्हणून गुरू लागतो नुसतं degree शिक्षण घेऊन काही होत नसत! 
माणसाने वर्तमानात जगावं! ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत ती वेळेवर नाहीतर देवावर सोपवावीत!

#vidya
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .