Facebook उत्तम माध्यम आहे आपली कला सादर करायला , व्यक्त व्हायला. वपू बोलतात तसं कोणी चोवीस तास एका भूमिकेत नसतं. उदाहरण कवी चोवीस तास कवी नसतो किंवा कोणताही कलाकार. कलाकार आवडला म्हणजे त्याच्यातल्या माणसाला आपण ओळखतो असं कुठे असतं. म्हणून ती व्यक्ती कशी आहे हे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ती चांगली आहे का वाईट ह्याचे अंदाज बांधणे योग्य नाही वाटतं. संवाद पेपर देहबोली ८०% बोलकी असते म्हणून भेटीगाठी करून माणूस ओळखणं उत्तम . आपण चांगलं वागलं म्हणजे दुसरी व्यक्ती चांगली वागेल हे गृहीत धरूच नये. चुकातून शिकत जायचं इतकंच माणसांच्या हाती असतं. इथे कोणी वाईट बोललं तर लगेच screenshot घेणार समोरची व्यक्ती. मग बदनामी व्हायला किती वेळ लागतो. चांगल्या पण मोजक्याच व्यक्तीं सोबत मैत्री झाली तर आपलं नशीब समजायचं . जे आपले नाहीत त्यांना सरळ निरोप द्यायचा कायमचा. प्रत्येका सोबत wavelength जुळायलाच हवी असा अट्टहास नसावा. #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment