शहरातल्या लहान मुलांपेक्षा गावातील मुलांना अधिक समाजाची जाणीव असतात. गावी सगळ्या वयाची माणसं रहातात . एखादी घटना घडली तर लगेच पसरते! सहावी चा मुलगा सांगत होता क्रिकेट साठी पैसे आम्ही मुलं गोळा करतो का तर मोठी माणसं उल्लू बनवतात!
पैसे गोळा करून हवी ती गोष्ट आणली नाही तर वाद होतात आणि पैसे पुन्हा एकमेकांना वाटले जातात!
यंदा कोरोना काळात मुलं फक्त घरी नाहीतर क्रिकेट खेळत होती . वाट बघत होती शाळा कधी सुरू होतेय त्याची. त्यांना गणेशोत्सव पण बरोबर साजरा करता आला नाही. सगळे बँड बाजे मिरवणूक असायची सांगत होते. मी म्हटलं दोन तीन महिन्यात होईल सगळं ठीक लस येईल आता बातम्या तर येत आहेत tv वर !
सहावी चा मुलगा सांगत होता त्याच्या गावी एक २७ वर्षाचा मुलगा दारू पिऊन वारला. (मृत्यू ची जाणीव आहे त्यांना इतक्या लहान वयात .) मी काही दारू पिणार नाही .( दुसऱ्या च्या चुका मधून शिकला.)वडलां सोबत जातो dj च्या व्यवसाय आहे वडलांचा. मोठी माणसं पितात पण मी नाही कधी पीत . गाणी पण चांगली वाजवतो सांगत होता!
#vidya

0 comments:
Post a Comment