post 53
सज्जन मूग गिळून गप्प बसतात म्हणून दुर्जनांच फावतं मग भले सज्जनांची संख्या जास्त का असेना काही उपयोग नाही!
Labels:
विचार
post 51
भारतात शिक्षण घेतलेली माणसं माणूस कमी बनतात आणि पैसे कमवण्याची मशीन बनतात. हेच शिक्षण समाजाला असंवेदनशील बनवतो.
Labels:
विचार
post 50
मतदान केल्याचा selfie काढणं चांगली गोष्ट आहे.फोटो काढण्यासाठी तरी काही जण मतदान करतील.नाहीतर इतरांनी केलं मतदान म्हणून मी कशाला मागे राहू म्हणून पण मतदान करतील.
विद्या
Labels:
विचार
post 49
आमच्या सोसायटी ची माणसं इतकी असंवेदनशील आहेत की माणसं बघून अंतिम यात्रेला जायचं किंवा निदान इमारती खाली तरी उभं राहायचं हे ही नाही. आज काल अंत्यविधी सगळे स्मशानभूमीत होतात! शहरात काय चार पाच पाहुणे असतात नाही तर मित्रमंडळी !
फक्त सेक्रेटरी खाली बसले होते कोणी आलं नाही म्हणून ते ही घरी गेले!
जिवंतपणी सुध्दा मोजक्याच लोकांशी बोलतात किंवा कोणाशीच बोलत नाही.
इथे तर स्त्रियांना धमकी दिली तरी समाज म्हणून सुध्दा एकत्र येत नाही.
ह्याला म्हणतात मेलेला समाज.
स्वतः च घर भलं की आपण!
ज्याच्या कडे जितके नातेवाईक , जितका पैसा त्यावरून स्वतःच वागणं ठरवणार!
Labels:
विचार
post 48
Real life मध्ये death बघितली सोसायटी च्या व्यक्ती ची आणि facebook वर गडकरी च्या नाती चा वाढदिवस!
ह्याला म्हणतात आयुष्य!
मागे सरकारी ऑफिस मध्ये एकाला अनुभव आला एक जण death certificate घ्यायला गेले होते आणि दुसरे birth certificate!
विद्या
Labels:
विचार
post 47
समाजाचा रंग आई नसताना होतो मग वडील नसताना होतो आणि नंतर कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे काय नाही कसं सुरू आहे यावरून ही होतो..
#vidyamslife
Labels:
विचार
post 46
काही गाई च बाळंतपण करायला डॉ आणि खूप जणांना बोलवतात. आमच्या गावी काका शेतकरी आहेत तेच करायचे आणि आम्ही लपून बघायचो. नारळाच्या झाडाने झाकलेला असायचा गोठा.
Labels:
आठवणी
post 45
Some people take decision practically and some people take decision take decision emotionally. Both are right.
#vidyamslife
Labels:
विचार
post 44
There is law for home violence. But just because people live under one roof never complain.
The only solution is dharma education.
Vidya
Labels:
विचार
post 43
Housewife
One woman who do everything at house .
But just because she didn't get paid that doesn't mean one has to disrespect housewife.
घरात बाई ठेवली तरी हजारो रुपये लागतात ते पण जेवण करणारी वेगळी , घराची साफ सफाई करणारी वेगळी.
बाई चा जन्म फक्त पैसे कमवायला झाला नाही आहे.
घर सांभाळणं ह्याला ही मान द्यायला हवा की.
पैसे न कमवणाऱ्या व्यक्तीला मान नाही.
नवीन fad.
#vidyamslife
Labels:
विचार
post 41
वारस म्हणून आपल्याला फक्त संपत्ती नाही तर शत्रू आणि मित्र ही मिळतात.. भेटतात..
#vidyamslife
Labels:
विचार
post 40
राजकीय नेते फक्त निवडणूक असताना आपापली मत मांडतात. नंतर किती विरुद्ध मत असली तरी निवडणूक झाल्यावर एकत्र बसतात.
आणि सामान्य माणूस
जरा काही कोणाला मत नाही पटली तर लगेच नात तोडायची भाषा . दुसऱ्याचे विचार वेगळे असू शकतात हे स्वीकारलं की वाद कशाला होतील. आज काल सगळे सल्ले देतात. आपण सल्ला दिला की त्रास होतो.
ऐकावे जनाचे करावे मनाचे. पटलं तर घ्यायचं असं बोलून मोकळं व्हायचं.
#vidyamslife
Labels:
विचार
post 39
ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं . दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ फुकटचे सल्ले द्यायचे नाहीत . आपण च दोषी ठरतो.
घरातली हिंसा स्त्रिया का सहन करतात?
याचं उत्तर त्या आर्थिक किंवा मानसिक दृष्टीने सक्षम नसतात.
Labels:
vidyamslife,
विचार
post 38
स्त्रियां मध्ये सहनशक्ती खूप असते.
आमच्या सारख्या काही अपवाद.
पोलीस स्टेशन फक्त fir केस साठी असत असा काहींचा गैरसमज.
पोलिसांकडे ही अधिकार असतात शांतता समाजात राखण्यासाठी.
दुसऱ्यांना त्रास देणं हिंसेच्या गोष्टी करणं हा सुद्धा गुन्हा असतो.
ज्याला राग आवरता येत नाही तो पुढे जाऊन गुन्हेगार च बनतो.
गुंड प्रवृत्ती ला सहन करणाऱ्यांची कमी नाही आपल्या समाजात.
सहन करतो दबून राहील की अजून यांना बळ मिळतं.
आम्ही कायद्याचा वापर स्वतः च रक्षण करण्यासाठी करतो आणि यापुढे ही करणार.
ज्याला सहन करायचं आहे तो सहन च करत राहणार.
आपण आपला मार्ग निवडावा.
#vidyamslife
Labels:
vidyamslife,
विचार
post 37
मत मांडणं गुन्हा आहे. हो ला हो म्हणायचं की वाद टळतात.
एकदा कळलं समोरच्या व्यक्ती चे आपले विचार पटत नाहीत तर चार हात लांब राहायचं. नकार पचत नसतो कोणाला.
दुसऱ्यांचे विचार स्वीकारायची काहीं मध्ये सहन शक्ती नसते.
मग social media असो किंवा खरं आयुष्य किंवा नातेवाईक , मित्र परिवार.
Silence is best solution .
#vidyamslife
Labels:
विचार
post 36
People react same situation either own or others differently based on their maturity level or knowledge whatever they have.
#vidyamslife
Labels:
my blog,
vidyamslife,
विचार
post 35
Who is lucky person the one who has good mother or good father .
#vidyamslife
Labels:
fb post,
vidyamslife,
विचार
post 34
आज कालच्या बायकां मध्ये न्यूनगंड आला आहे नवरा कमावतो आणि त्या घर सांभाळतात..इतकं शिकून पैसे कमवता येत नाहीत. स्वतः साठी वेळ मिळत नाही.. स्वतः चीच मुलं सांभाळावी लागतात म्हणून चिडचिड..
ह्यालाच संसार म्हणतात . संसार म्हणजे जबाबदारी हे सुद्धा लक्षात येत नसतं का यांना.
#vidyamslife
post 33
जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सगळे सोबत असतात! जेव्हा वेळ चांगली नसते तेव्हा आपलेच सोबत असतात!
#vidyamslife
post 32
आमच्या वेळी कडधान्य वापरून रांगोळी काढायला सांगितली होती. abroidary रंगीबेरंगी दोरा वापरून विविध प्रकारचे टाके मारणे , सुई दोरा , भोंडला , चमचा गोटी , रक्षाबंधन जिथे मेंदी कोन मिळालेला , जो नंतर हरवला ..
परीक्षेचा एक पेपर पण आई च्या बाजुला बसून लिहिला होता ..
आजारी होती तेव्हा .. चव्हाण सर नि परवानगी दिली..
ब्राह्मण शाळा आठवणी ...
Labels:
आठवणी
Subscribe to:
Posts (Atom)
