घरच्यांनी नाही समजावलं तर समाज सरळ करतो आणि समाजाने नाही सरळ केलं तर पोलीस सरळ करतात!
***
धृतराष्ट्र ची संख्या वाढली की दुर्योधनाचीही संख्या वाढते!
***
कायद्याचे रक्षकच कायदा तोडण्यात अग्रेसर असतात!
****
जसा पाळीव कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधतात तसा कायद्याचा पट्टा घालावा लागतो गुंड प्रवृत्ती च्या व्यक्तीच्या गळ्यात नाहीतर ते मोकाट सुटतात!
****
काही सोसायटी मध्ये मेलेली माणसं राहतात. घर भलं की आपण. सोसायटी च्या स्त्रियाना उठसुठ कोणीही धमकी देऊन जात आणि समाज म्हणून सोसायटी मध्ये राहणाऱ्या व्यक्तींची मध्यस्ती शून्य! मेलाय हिंदू समाज.संस्कार संस्कृती चा आणि यांचा काही संबंध नाही.
यांना फक्त पैसे कमवणे माहिती.
सोसायटी च्या स्त्रियांना सुरक्षित वाटणे या सोसायटी च्या लोकांची जबाबदारी नाही.
पोलीस ठाण्यात जा बोलून मोकळे होतात.
#vidyamslife
****
काही जण हिंसा करणारे असतात . काही जण अन्यायाविरुद्ध लढतात . काही जण बघ्याची भूमिका घेणारे असतात आणि काही जण दुसऱ्याची हिंसा सहन करणारे!
ह्याहून वेगळी माणसं नसतात. आपण कोणत्या प्रकारात मोडतो ज्याचं त्याला माहिती असतं
स्वतः रक्षण करायला आपण स्वतः किंवा घरचे असमर्थ असतील तेव्हा पोलीस मदत घ्यावी.
गुंड प्रवृत्ती ला वेळेच ठेचून नाही काढलं तर उरलेलं आयुष्य भीती मध्ये जातं. भीती मध्ये जगण्या पेक्षा मरण स्वीकारणं योग्य.
स्त्रियां वर हिंसा करणाऱ्यां विरोधात कायदे आहेत वापर करावा.
पोलीस ठाण्यात गेल्यावर पहिलं वाक्य असतं हे बिहार नाही महाराष्ट्र आहे.
#vidyamslife
*****
आपण जेव्हा समर्थ नसतो तेव्हा इतरांची किंवा समाजाची मदत घ्यावी. आपलं कर्म आपण करावे . दहा जणांना विचारलं की एक जण तरी मदत करेल की हिंसा धमकी सहन करण्या पेक्षा मदत मागणे योग्य !
*****
काही जण विसरतात कायदा उंबरठ्या बाहेर सुरू होतो . दुसऱ्याला हिंसा करणं किंवा धमकी देणं सुद्धा गुन्हा आहे.
डर डर के जिने से अच्छा मर ही जाना बेहतर है!
क्यों डरना किसी से
जब अपना सिक्का खरा हो.
झूठे का तो मुह काला ही होना है!
******
स्त्रियांना घरात किंवा घरा बाहेर कुठेही कोणी धमकी दिली मारण्याची किंवा हिंसा केली तर जवळपास च्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी एकतर ज्याने त्रास दिला त्याला पोलीस समज देतात नाहीतर केस झाली की अटक करतात !
हिंसा सहन करणारा त्याहून दोषी असतो.
हर हर महादेव !
*****

0 comments:
Post a Comment