candles

आकार बदलला तरी ह्याला candles म्हणतात पणत्या नाही! 
आज काल दिवाळीत नवीन fashion आली आहे wax candle लावायची!

किंमत

एखाद्या गोष्टीला किती किमंत द्यायची ते आपणच ठरवतो मग समाजा बद्दल , कोणा बद्दल काहीही तक्रार असली तरी आपण भाव कमी दिला की त्रास कमी होता त्या त्या खटकणाऱ्या गोष्टींचा ! 
#vidyamsblog

गोष्टीला किती महत्त्व

एखाद्या गोष्टीला किती किमंत द्यायची ते आपणच ठरवतो मग समाजा बद्दल , कोणा बद्दल काहीही तक्रार असली तरी आपण भाव कमी दिला की त्रास कमी होता त्या त्या खटकणाऱ्या गोष्टींचा ! 
#vidyamsblog
31 Oct 

नाती

आयुष्यात नाती भेटतात. दोन अनोळखी व्यक्ती एका वळणावर भेटतात काही आवडी निवडी मुळे तर कधी समाजात वावरताना. कोण कोणाच्या आयुष्यात किती दिवस राहणार हे मात्र कधी नियती ठरवते तर कधी त्या दोन व्यक्तींचा स्वभाव ; तर कधी परिस्थिती!प्रत्येक नात्याचं अस्तित्व असतं ज्यात जीवन असतं!कोणी आयुष्यात येतात आणि कायमचे मैत्र जुळते मन जुळतात एकमेकांना आहे तसं स्वीकारलं जातं तेव्हाच कुठे नाती पूर्ण होतात! कोणीच परिपूर्ण म्हणून जन्माला येत नसतं!पण स्वभाव जुळले, आवडी ,निवडी, एकमेकां बद्दलचा आदर , जिव्हाळा, आपुलकी आणि मनमोकळं पणाने व्यक्त होण्यासाठी ची हक्काची जागा मिळाली की नाती जपली जातात! नात्याचं पण आयुष्य असतं कोणी आपल्याला आठवणी देतात तर कोणी आपल्याला धडे गिरवायला लावतात! कोणी त्यांच्या वागणुकीतून आपल्याला प्रौढ करतात! बालपणीचा निरागसपणा कधी जपला जातो कधी वय वाढत जातं तस माणूस समजूतदार होतो विवेक बुद्धी जागरूक झाली की कसे वागावे पेक्षा कसं वागू नये हे शिकतो! आयुष्याच्या प्रवासात माणसाचं येणं जाणं सुरूच असतं पण मनाने दूर  गेलेली नाती पुन्हा जुळता जुळत नसतात! कोणाचं वागणं तर कधी कोणी एकमेकांना समजून घेतलं नसलं की वियोग अटळ ! नात्यांचा गुंता झाला की सोडून देणं उत्तम असतं ते ही दोघांसाठी ! 
मग एक नात्याचा प्रवास संपतो मग नाती मात्र काहीतरी शिकवून जातात तर कधी कसं वागावं कसं वागू नये हे ही शिकवतात! स्वभाव आणि आवडी निवडी, आदर भावना ह्यामुळे फक्त नाती टिकतात!


© Vidyamslife
29 oct 2024

Post 7 आयुष्य

आयुष्य जगताना चे पडावं येतात एक बालपण मग शिक्षण, कामधंदे , कुंटुब संसार , वृद्धाश्रम , विश्रांती ! 
मृत्यूच कारण जन्म असतो! आपलं कर्म झालं की आपला इथला संसार संपला ! जो पर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा संसार गाडा सुरूच! 
एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरु होतो आपण उगाच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून !

#vidyamsblog

post 6

सुखाचा सदरा बघितला का ? 🤣
एक माणूस रोज दुपारी वडाच्या झाडाखाली छानसं अंथरूण घालून झोपतो किंवा पाठ टेकवून पेपर वाचत बसतो! समोरच्या चाळीत राहतो!
कोणी घरचे  बोलवायला आले की घर गाठतो! ☺️

असे निवांत क्षण लाभण्यासाठी भाग्य लागतं तर कधी स्वतः साठी वेळ स्वतः साठी एकांत ;  तर कधी समाधान !

#vidyamsblog

post 5

भारतात दिवाळी सण सुरु होणार आहे ! पण दिवाळीची तोरण मात्र चायनीज 🤣 चायनीज खायला आवडतं म्हणून तोरण सुद्धा चायनीज ... Make in India mission कुठे असतं अश्या वेळी ?

post 4

Brand च खूळ परदेशातून आलं आहे! 
नशीब आमच्या शिक्षण काळात असलं काही नव्हतं.
ठाण्यात कुंजविहार चा वडा पाव , टीप टॉप Brand असला तरी कमी दरात वस्तु द्यायचा खास करून chat 😋 शेवपुरी ... ठाण्यात
जूस center पण आहे cocktail juice ठरलेला. कॉलेज नंतर क्लास म्हणून कुंजविहार चा वडा पाव चालत चालत खायचा आणि क्लास च स्थळ गाठायचं.
मधली सुट्टी असली की दुर्गा चा समोसा !

लहानपणी २.३० रु  वडा पाव मिळायचा! समोसा होता दोन प्रकारचा !
चव पण होती आणि दर्जा ही!  शाळेत तर 
बाहेर आईस्क्रीम ची दुकान , पाणीपुरी ची दुकान असायची..
Bread Pattice .. 

पोळी भाजी केंद्रात मिळायचं! 

दुसऱ्या शाळेत वडा पाव जवळपासच्या दुकानात मिळायचा!

संध्याकाळी class ला तेच !  
वाढदिवस असला की वडा पाव ची पार्टी ! 

आज काल प्रशांत कॉर्नर पाणीपुरी वाला आला ७० का ८०  रु 

पाणीपुरी का शेवपुरी केली आहे त्याने 😡
मैद्याच्या पुऱ्या वापरतो का सोन्याचं वर्ख लावलेल्या 😎

Technology , shirt , Agriculture organic product कोणत्याही गोष्टीत brand च्या नावावर लूट सुरु आहे ग्राहकांची ... 😡

नफा  दुप्पट तिप्पट कसला खूप पटीने घेतात तरी यांची पोट भरत नाहीत!

#vidyamsblog

post 3

YouTube vlogger घराची दारं बंद पण social media वर पैसे कमवण्यासाठी २४*७ camera लावून रोज काय काय करतो ते दाखवणं मात्र सुरू असत! गायक असो वा पाककृती करणारी .. कला सादर नाही करत फक्त प्रवास , घरच्या गोष्टी सगळं recording सुरु...
No privacy .. इतकं प्रसिद्ध होऊन काय मिळवायचं असतं काय माहिती!
Celebrity कधी तरी दिसले तर अर्थ असतो रोज रोज दिसले तर त्यांना celebrity म्हणत नसतं!  
अति तिथे माती शेवटी!

#vidyamsblog

post 1

आमच्या भागात वडाच झाड आहे. 
कोणी वटपौर्णिमा असेल तेव्हा पूजा करत तर काही जण असे मध्ये मध्ये पूजा करतात..? 
मग  तरुण स्त्री असो वा  पुरुष ! कोणी सांगितलं म्हणून करतात का ही मंडळी पूजा??


post 2



वट पौर्णिमा दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देणं. पितृ पक्षात किंवा पितरांसाठी पिंपळ असतो. तुळशी ने विष्णू ची पूजा करतात. बेल पत्र ने शिव शंकराची. 
सगळं कसं माणूस आणि झाड निसर्गाला एकत्र करण्यासाठी हिंदू संस्कृती असते.
Hindu Dharma  is not a religion it's lifestyle.

#vidyamsblog

Book to Read

Must read 
Life of Ratan Tata and Shantanu Friendship and professional life , adventure, trips, ethics ..

बिश्नोई समाज

बिश्नोई समाज मधले काही जण news channel वर आले होते. त्यांचा समाज वन्य जीव आणि जंगलाचं झाडाचं रक्षण करत.पंतप्रधान मोदी सुद्धा त्यांच्या समाजाला मान देतात. मग tv news channel वाले  बिश्नोई गॅंग म्हणून कशाला बदनाम करतात असं बोलत होते.

मोफत राजकीय योजना , सरकार वर कर्ज

लाकडी बहीण योजना , लाडका भाऊ योजना , मोफत लॅपटॉप किंवा काहीही योजना काढतात हे राज्य सरकार मग कोणतंही असो. राज्यावरचा कर वाढतो अश्याने त्यापेक्षा महिला आयोग मध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करायला काय जात यांना, skill development मध्ये सुद्धा किती काम आहेत .सुतार काम , plumber , घर बांधकाम करणारे काम इत्यादी इत्यादी. Electricity ची काम, कोण फ्रीज repair करत ,कोण tv कोणी मोबाईल repair करत की..

कलेचं शिक्षण पण आहे की... नृत्य कला , गायन , वाद्य शिक्षण नंतर हीच मंडळी पुढे कलेचं शिक्षण देणारे वर्ग ही घेऊ शकतात की..
आरक्षण खूळ कमी झालं आणि आता freebie च खूळ सुरु झालं म्हणायचं.. कोणी वीज मोफत देतो कोणी काम न करता खात्यात पैसे घालतो...

उत्तरप्रदेश मध्ये खटाखट चा कार्यक्रम उरकला आणि मत ही मिळाली...फुटकची ...

राज्यांना कर्जबाजारी करणाऱ्याचे उद्योग आहेत.

#vidyamsblog #Politics

संस्कृती

Flat ची संस्कृती , चाळ संस्कृती असा वापर केला जातो. पण आज काल फ्लॅट मध्ये संस्कृती कुठे राहिली.. विकृती म्हणायला हवी की..
 दरवाजे बंद असतात.. कोणाकडे किती पैसा .. कोणाच्या आयुष्याच्या पायऱ्या कश्या आहेत.. यावरून थोडाफार संवाद होतो .. गिरगीट बदलत नसतील इतकी ही माणसं रंग बदलतात..!

कोणाच्या संपर्कात राहायचं तर दुसरा कसा आहे पेक्षा काय काय चालू आहे ह्या चांभार चौकश्या करण्यात जास्त रस.. एक पिढी गेली की पुढची पिढी तर त्याहून वाईट..  शिकून काही शहाणपण , किंवा माणुसकी येत नाही हेच खरं !

#vidyamsblog

जन्म मृत्यु

दोस्त

हर उम्र में दोस्त की जरूरत होती है ; जरूरत  मानसिक भी होती है। पैसा सब कुछ नहीं होता या किसी रिश्ते से बड़ा तो कभी नहीं होता या पैसा रिश्तों की जगह भी कभी नहीं ले सकता। 

बातमी

ठाणे ते बोरिवली भुयार मार्ग सुरू करण्याच काम सुरू झालं आहे.👍

मराठी भाषा post 134

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला . 
निवडणूक जवळ येतेय बाकी काही नाही.
तसही मराठी भाषेला दर्जा मिळो किंवा न मिळो घरात मराठी किती जण बोलतात हे महत्त्वाचं. अति शिक्षण घेतलेले असो किंवा शहरात अनोळखी सोबत बोलताना किंवा व्यवहारात वापरतात मराठी पेक्षा हिंदी , इंग्रजी चा वापर आजही जास्त होतो.

#vidyamsblog
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .