शाळा

कांदा भजी

कांदा कापून घ्यावा.त्यात कापलेली मिरची कोथिंबीर आणि आले  घालावे. थोडेसे तेल आणि पाणी बेसन घालून एकजीव करावे.मग तेल गरम करून तेलात तळावे. तयार झाली आता भजी.

चणा चाट

चणे उकडून घ्यावेत चवी नुसार मीठ घालून . पाणी आटवावे.मग त्यात कांदा, मिरची ,टोमॅटो कापलेले घालावेत. लिंबू रस घालून एकजीव करावे. खायला वाढावे.

गझल

असे गजल लिहिणार्यांनी व्याकरणाचे तीन तेरा वाजवले तर रसिकांनी मात्रा मोजत बसायच्या का  म्हणून  गजलच्या थोडा फार अभ्यास असल्याशिवाय वाचकांनी  गजल वाचू नये असं वाटतं ... गजल कशी लिहू नये यावर  थोड्या काळाने पुस्तक प्रकाशित झालं तर नवल वाटणार नाही  ..

आठवणी..

म्हणून आयुष्यात वयस्कर माणसं हवीत ना ..! जगण्याचं बळ देतात नेहमी त्यांच्या अस्तिवाने ,शब्दाने कधी त्यांच्या आठवणीनेही !
#vidya

कश्मीर

काश्मीर मध्ये दगड फेक करणाऱ्या मुलांना काही कामधंदे मिळत नाहीत.. मागे बातम्या मध्ये दाखवलं होतं .. त्यांचे नेते देशद्रोही काम करतात आणि पैसा पाकिस्तान पुरवत .. भयंकर आहे स्थिती ! एकच उपाय तो काश्मीर ला भारतात सामील करणं पूर्णपणे कलम काढून फक्त राष्ट्पती ची सही आणि राजकीय इच्छा शक्ती ची गरज आहे !

बालपण

असंवेदनशील झालाय समाज ..  :(पालक तर शाळा सुरू व्हायच्या आधीच गाणं ,नृत्य कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिकायला पाठवतात .. इतकी कसली घाई असते ... ह्या video मध्ये जिने गाणं गायलंय त्याच भागात ती  कार्यक्रमातून बाहेर गेली .. उगाच सांगतात ते colors marathi वाले  projection  शिक वैगरे ..तिचा आवाज बरोबर वाटतंच नव्हता गाणं गाताना.. #v

Quotes

Reality show

लहान मुलांना युगुल गीत गायला लावतात .. सूर नवा मध्ये ..तसेही मागे पाहुणे मंडळी म्हणून कवी सुद्धा आलेले त्यांनाही काही वाटत नाही .. पालकांना ही काही वाटतं नाही नाहीतर अश्या कार्यक्रमाचा भाग का व्हायला दिल असतं त्यांनी .. ! स्वतःची स्वप्न लादतात  मुलांवर बालपण गेलं म्हणायचं मुलांचं .. !मागे सा रे ग म प मध्ये सत्यजित जिना आलेला त्यांच्या वडलांना कळलं त्यांच्या मुलाला सतत सराव केल्यामुळे त्रास होतोय म्हणून मध्येच कार्यक्रम सोडायचा योग्य निर्णय घेतला .. !

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .