माणसं

माणसं काही पैश्या मागे धावणारी असतात. काही माणसांना जोडणारी असतात. जी माणसं तुमच्या कडे किती पैसा आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे हे बघून वागतात ती एकलकोंडी पडतात.
#vidya

माणसं

माणसं काही प्रेमळ असतात काही कठोर.
प्रेमळ माणसं सर्वांना आहे तसं स्वीकारतात.
वाईट माणसं भेटली की त्याच्या पासून लांब राहतात. समोरचा व्यक्ती कसा आहे त्यावरून
त्याच्या संपर्कात रहायचं नाही ते ठरवतात.
एखादी व्यक्ती वाईट वागत असेल तर ती वाईट आहे. म्हणून वाईट माणसा कडून चांगलं वागायची अपेक्षा ठेवू नये. मग त्रास होत नाही. कठोर माणसं समोरच्याला सतत फुकट सल्ले देत असतात. स्वतः बोलणार तिच योग्य दिशा इतरां सोबत चर्चा सोडून स्वतः ची मत मांडण्यात पुढे असतात. वाईट माणसं दुसऱ्याला कमी लेखतात.  चांगली माणसं सर्वां सोबत समान व्यवहार करतात; एकसारखं वागतात;भेदभाव करत नाही.

Be open minded.आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती नाही मिळाली तर दुसऱ्या गोष्ट निवड करावी. मला हेच पाहिजे हट्ट करू नये.आपल्याला आनंद मिळतो ते करत राहणे.कला असेल तर आर्थिक व्यवहार करणे. फुकट कला सादर करू नये.
©Vidyamslife

 २४ जानेवारी २०२०

सहजच

सहज 
सहज कधी कोणाला फोन करायचा.
सहजच बोलायचं आपल्या माणसा सोबत .
सहजच चौकशी करायची.
सहजच संपर्कात रहायचं.
सहजच मैत्री करायची.
सहजच माणसं ओळखायची.
सहजच माणसं निवडायची.
सहजच नाती निवडायची.
सहजच नाती जपायची.
सहजच आयुष्य जगायचं.


Vidyamslife

स्पर्धा

दोन प्रकारचे माणसे असतात स्वतः सोबत  स्पर्धा करणारे दुसऱ्यां सोबत स्पर्धा करणारे

स्वतःशी स्पर्धा करणारे दुसऱ्या सोबत तुलना करण्यात वेळ घालवत नाहीत. स्वतः च्या चुका शोधतात, त्यातून शिकतात, धडपडतात आणि आपलं निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतात.  ह्या उलट इतरां सोबत स्पर्धा करणारे इतरांसोबत तुलना करण्यात वेळ घालवतात. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी धडपडत असतात.  स्वतः पेक्षा दुसऱ्याच्या चुका कडे लक्ष देतात. दुसऱ्यांना काय वाटेल याचा जास्त विचार करतात. स्वतः सोबत स्पर्धा करणारे स्वतः चे निर्णय स्वतः घेतात. स्वतः ला योग्य वाटेल तेच करतात. समाज काय बोलेल यापेक्षा आपण कुठे आहोत ? आपला विकास कसा होतोय आपण सकारात्मक विचार करतोय का ?  आपण निवडलेली गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो का? आपल्या आयुष्यात काय करायचं आहे आणि ती गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर स्व च्या शोध घेतात  त्यासाठी धैर्य ही असतं. स्वप्न पाहतात कोणाला आपली स्वप्न सांगायची नसतात. इतरांना आपल्या स्वप्नाशी काही देणं घेणं नसतं. आपण कुठे आहोत काय करतोय ह्या कडे समाजाचं जास्त लक्ष असतं. आपल्याला काय करायचं आहे आपण काय करतो आहोत हे आपल्याला माहिती असण हेच पुरेस असतं.
स्वतः सोबत स्पर्धा केली तर आपला विकास अधिक होतो. दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी विकास करण्यात आपल्याला समाधान कधीच मिळतं नसतं. इथे प्रत्येकाच्या आयुष्य वेगळी गोष्ट असते. प्रत्येक जण घडत असतो तो त्याच्या आजूबाजूला घटना , परिस्थिती , भेटणारी माणसं  यावरुन. वाचन करून माणूस अधिक समृद्ध होतो कारण तो नम्र असतो त्याला दुसऱ्या व्यक्तीचे अनुभव जाणून घ्यायचे असतात.ती आयुष्य कसं जगते, आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांना  कसं तोंड देते हे कळतं.
माणूस अनुकरण आणि इतरां कडून प्रोत्साहन घेऊन शिकतो.स्वतः साठी स्पर्धा करणारे स्वतः साठी आयुष्य जगतात. दुसऱ्या सोबत स्पर्धा करणारे आयुष्य घालवतात.
© vidyamslife 2021
#vidyamslife

my quotes

*Bride and groom age matter a lot in India.

*Bride must be younger than groom.
Groom must earn more than bride.

*Being single not easily accepted in society.

*Others opinion matters alot to only open minded people not others.

*People forget living in present because they are living in past or future.

*Do not under estimate one self and others too.

*माणसं प्रेमळ असतात नाहीतर कठोर असतात.

#vidyamslife

विवाह

श्रीकृष्णाने त्याच्या बहिणीचा विवाह अर्जुना सोबत केला. तो पण पळून जाऊन विवाह करायला लावला.😎🤠 तरीही आपल्या इथे दोघांना  एकमेकांच्या संमतीने विवाह करायला कुटुंब तयार होतं नाही . लग्न दोघांना करायचं असतं मग कुटुंबातील लोकांनी ठरवलेल्या व्यक्ती नसेल तर काय बिघडतं. संकुचित विचार नुसते. संसार दोघांना करायचा असतो कुटुंबातील लोकांना सांगून ही ते तयार होत नाही. पण मुलं झाली की लगेच रक्ताची नाती आठवतात आणि एकत्र होतात. 
#vidya

कविता

20.1.2018
======

वळणावर एका भेटलो
मनसोक्त बोललो 
व्यक्त झालो 
थोडे अव्यक्त
भाव मनीचे
चेहऱ्याने मात्र टिपले
तू मात्र ते सहज वेचलेस 
नातं मैत्रीचं अगदी घट्ट राहीलं
आजही तुझ्या सोबत मोकळं केलं मी स्वतः ला
आजही तितकीच सुरक्षित मी तुझ्या सावलीत
मनाने अगदी जवळ
देहाची अंतर ...मनीचे भाव थोडी बदलतात
तोच जिव्हाळा 
तीच आपुलकी 
तोच ओलावा
आयुष्यभर पुरतो की
#विद्या


timelesss christmas

Charles Whitley travels from 1903 to 2020 where he meets Megan Turner and experiences a 21st Century Christmas.

Movie wow👌👌

flowers



nice movie

माणूस बना

तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकरसंक्रांती ला बोलतो आपली संस्कृती . पण आजकाल लोकं फक्त समोरच्या कडून काम करून घेण्यासाठी गोड गोड बोलतात.मनापासून आदर म्हणून समोरच्या व्यक्ती सोबत निस्वार्थीपणे वागणारे कमीच असतात. सध्या माणसाला माणूस बनवणं ह्याकडे जास्त दिलं पाहिजे शिक्षणात. चांगली माणसं घडली तर समाज सुद्धा चांगलाच घडेल की. मुलांसोबत कसं वागावं पालकांना माहित नसतं . समाजात वावरताना कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं नाही, कसं वागायचं हे ही शिकवण्याची गरज आहे.  जपान मध्ये सुरवातीचे चार वर्षे मुलांना कसं वागावं आणि कोणतंही काम कमी नसतं कोणाला कमी लेखू नये हे शिक्षण देऊन माणूस घडवतात. आपल्या इथे ही नवीन शिक्षण पद्धती मध्ये हे सगळं असेल अशी आशा आहे.
#vidya

Believe in yourself

Guys who are on social media and facing trolls & abuses.

Guys who are facing taunts & negative comments from their so called friends, colleagues, relatives etc.

All of us need to learn from today's cricket match of India Vs Australia .

A match of patience & silent power where you are playing a game on a field which is called gentleman's ground.

You are injured and also facing frustration of opponents who are mocking you, taunting you, they want to distract your focus, your goal and want to drag you down like Time Paine tried to distract Ashwin.

But you have to keep patience, don't respond, don't react just do your work, let them bark.

Audience means people in your life like relatives, colleagues, some known people who make fun of yours, tease you, give negative & bad comments or racial comments like Jasprit Bumrah and Mohammed Siraj faced racial abuse from Australian fans on ground.

But you have to believe in yourself, don't loose your confidence, you are injured but your Willpower is still strong.

Then they will try to remove your path, your goal like Steve Smith cleverly removes Rishabh Pant’s guard marks.

But you are aware of everything. You are prepared for challenges. You are an artist of your silent power and finally they will came to know that an injured lion is more dangerous than a hungry one, he runs after his prey not to satisfy his hunger but to gratify his anger.

Regards
Ansh.

सुभाषित

रविरपि न दहति तादृग् यादृक् सन्दहति वालुकानिकरः।
अन्यस्माल्लब्धपदो नीचः प्रायेण दुःसहो भवति॥

सूर्य सुद्धा जितका ताप देत नाही, तितका याच्यामुळे तापलेली वाळू देते. दुसऱ्याकडून पद मिळालेला दुष्ट बहुतेक वेळा दुःसह होतो.

वय आणि बायका

डोक्यावर जरासं टक्कल आलेल्या पन्नाशी उलटलेल्या बायका स्वतःला ताई म्हणा म्हणून आग्रही असतात !  आम्ही ताई म्हणो किंवा काकी वय थोडी बदलणार आहे! पण ताई म्हणायला लागतो तेव्हा मात्र typical बायकां सारखे टोमणे मारतात ह्यावेळी त्या विसरलेल्या असतात की बहीण बहीण खेळ खेळतोय !  सासु ,सुना खेळ नाही खेळत आहोत! बायकांना वय झाल्यावर टोमणे मारण्याचा आजार च असतो असं काही बायकांना  भेटल्यावर कळलं! (काही चांगल्या बायका ही असतात त्या अपवाद ) भाषा ,लेखन चांगलं असतं पण जिथेला कुठे हाड यांच्या !  शरीर आहे म्हणजे वय वाढणारच आहे की स्वीकार करावा की खुल्या मनाने!इतरांना फुकट सल्ले देण्यापेक्षा स्वतः मध्ये बदल करावा की! दुसऱ्यांच्या त्रुटी ओळखणे सोपं असतं पण स्वतः मध्ये त्रुटी ओळखायला सवड कुठे असते तर कधी आपण संपूर्ण आहोत हाच अहं मिरवतात !

#vidya

count your blessing

Count your blessing 👌

जाने वो कैसे

जाने वो कैसे लोग थे जिनके
प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियाँ माँगी
काँटों का हार मिला
जाने वो ...

खुशियों की मंज़िल ढूँढी तो
ग़म की गर्द मिली
चाहत के नग़मे चाहे तो
आँहें सर्द मिली
दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मखार मिला 
हमने तो जब ...

बिछड़ गया... बिछड़ गया हर साथी देकर 
पल दो पल का साथ
किसको फ़ुरसत है जो थामे दीवानों का हाथ
हमको अपना साया तक अक़सर बेज़ार मिला
हमने तो जब ...

इसको ही जीना कहते हैं तो 
यूँही जी लेंगे
उफ़ न करेंगे लब सी लेंगे
आँसू पी लेंगे
ग़म से अब घबराना कैसा, ग़म सौ बार मिला
हमने तो जब ...
#fav song 

गीतकार / Lyricist: साहिर लुधियानवी-(Sahir Ludhianvi)

एकांतप्रिय

एकांतप्रिय माणूस सुखी माणूस ☺️ आमच्या इथे समोर जागा आहे तिथे कधी निवांत झोपतात ;  कधी कोडी सोडवत बसतात ; तर कधी झोपून पेपर वाचतात ! 🤣 
कधी कधी बायको ,मुलं येतात भेटायला ! 
आम्ही गावी असताना असेच झाडा खाली बसायचो ,पत्ते खेळायचो त्याची आठवण होते रोज ! 
#vidya

nice movie



“Despite a horrific childhood filled with abuse and abandonment, Jackie Turner persevered and created a life of achievement and dedication to community service,” said Barbara Fisher, SVP, original programming, UP. “While the holidays still remind her of her struggles, they also remind her of how far she has come. My One Christmas Wish is the ultimate uplifting Christmas story, showing the true meaning of the holidays, the importance of family and the joys of giving back.”
Story  Source: internet 

लव जेहाद

आज काल काहीही अभ्यास न करता आपली मत ठामपणे मांडत असतात 😎 आणि स्वतः कितीला ज्ञान आहे किंवा नाही हे दुसऱ्यांना कळतात मग त्यात हिंदी ,मराठी कलाकार सुद्धा मागे नाही .एखाद्या कले मध्ये प्राविण्य मिळालं म्हणजे सगळ्या विषयाच आपल्याला ज्ञान असतं असं थोडी असतं. एका जुन्या अभिनेत्री ची मुलाखत बघितली .लव जिहाद कायद्याचा हिंदू असून विरोध करत होत्या . धर्म प्रेमाचा काय संबध असं त्यांचं मत.मुळात कायदा हिंदू मुलींना स्वतः चा धर्म लपवून त्यांच्या सोबत लग्न करून त्यांना एक तर सोडून देण्यासाठी आहे . कायदा  जबरदस्ती धर्म परिवर्तन करण्याऱ्यां विरुद्ध आहे हे सुद्धा ज्ञान नाही तरी विरोध मात्र दर्शवायचा 🤠 एखाद्या विषयावर अभ्यास न करता मत मांडायची !
#vidya

मोह

मोहाच्या जाळ्यात अडकलेल्या मनाला विवेक बुद्धी चा विसर पडलेला असतो!
#विद्या

विचार

समान अधिकार आपल्या देशात कुठे आहेत? कधी जाती वर कायदे होतात कधी न्यायव्यवस्था फक्त काही धर्मासाठी असते! एक न्यायव्यवस्था अजून तरी झाली नाही!

मालिका लेखन

आज काल मालिका लिहिणाऱ्या लेखकांना low budget लेखन करायला लावतात! सुरवातीला तीन चार ठिकाणी होणार shooting नंतर हळूहळू एका घरा पुरतं मर्यादित होत अश्याच मालिका असतात सध्या तरी !

मराठी उद्योजक

मराठी माणूस धंदा करतो पण सुरवात जबरदस्त असते ती म्हणजे brand name ठरवून! 
मग चहा असो किंवा भेळपुरी चा स्टॉल , केक च दुकान! एकदा चालू झालं की franchise द्यायला तयार! 😎😎  नुसतं चायनीज ने दुकान काढलं होतं एकाने पण हवंतसं चाललं नाही म्हणून नवीन नवीन उद्योग करून बघितले! आता चहा पण पंढरपुरी चहा नामकरण करून विकत आहे सोबत वडा पाव आणि वरच्या माळ्यावर चायनीज च दुकान सुरू केलं! 👍👍 
ह्याला म्हणतात जागरूक उद्योजक !
#vidya

दान धर्म

दानधर्म करण्यासाठी crowd funding best! मंदिर मधल्या दानपेटी असून नसून सारखीच!
मुंबई मध्ये डब्बा वाले मराठी व्यवसायिक त्यांना कोणत्या मंदिराने मदत केली? आता पर्यंत rss मदत करतेय गरजूंना इतकं च ऐकिवात आलं आणि कोणी croud funding ने! 
#vidya

रिश्ते

सहजता से निभें, वे ही रिश्ते सुखद हैं..
जिन्हें निभाना पड़े... वो दुनियादारी है ।
#मीनलसबनीस

sadguru

प्रेम

कोणतीही गोष्ट  जिव्हाळा ,प्रेमाने केली तर तिचं ओझं होतं नसतं! मग स्वयंपाक पण आला त्यात!
#vidya

sadguru quotes 2

👣
          👣
                      👣                                   
 "If human beings become conscious, the need for domination and conflict will dissolve". #SadhguruQuotes

graffity

दुसऱ्यांनी कसं वागायचं हे पक्क माहिती असतं स्वतःसाठी मात्र मोठं ?? असतं !
#vidya

पत्र माणुसकी नसलेला माणूस नसतोच

तुमच्या तिघींसाठी आभार प्रदर्शन करायचं राहूनच गेलं की माझं! अतिथी देवो भव फक्त पुस्तकात असतं एवढं मात्र कळलं! माणूस जास्त शिकला म्हणून त्याच्यात माणुसकी असेलच असं कुठे असतं!  धन्यवाद मला टोमणे मारल्या बद्दल , माझ्यावर हसल्याबद्दल! समाजात बदनामी होईल म्हणून मला एकटीला टाकून नाही दिलं ना st ने पाठवलं ठाण्यात म्हणून धन्यवाद! तुमच्या तिघांचे खूप आभारी आहे! 🙏 समोरच्या व्यक्ती चा काही फायदा होणार नाही कळलं तर त्याच्या सोबत चांगलं तरी कशाला वागायला हवं ना! तसही कलियुग आहे इथे वस्तू पेक्षा माणसांचा वापर जास्त करतात! त्या बाई च शिबीर होतं तिला माझी सोबत हवी होती म्हणून मी आली होती! तिला मी मोफत graphics design event साठी बनवून देत होते ! मला आवडत मदत करायला म्हणून! Blog सुद्धा बनवून दिला मोफतच!
मला तिची गरज नव्हती तिला गरज होती म्हणून मी आली ! माझ्या जेवणाची  ,राहायची सोय माझ ओझं झालं तुम्हा तिघाना एवढं कळलं मला! घरच्याना माझ्या त्रास नको म्हणून शांत राहिले मी ! नाहीतर त्या बाईने मला तर पैसे न देता assistant च काम करायला लावलं ! टोमणे सतत मारले , मानसिक त्रास दिला ! ठाण्यात बस मध्ये बसणार येताना पण ठण्यातच येणार तरी चेंबूर ने तिकीट काढली नाही तरी हट्ट केला ! आधी सांगितलं असतं तर आलीच नसती मी! मला कुठे गरज होती! 
असो त्या बाईला block केलं आहे मी माझा आणि तिचा संबध तेवढाच ! माणुसकीने वागता येत नाही समोरच्याला आहे तसं देवाने घडवलं तसं व्यक्तीला स्वीकारता येत नाही असली माणसं शेवटी एकटीच राहतात! स्वतःच्याच मी पणा मीरवतात! आयुष्य क्षणभंगुर आहे आज भेटणारी व्यक्ती उद्या जिवंत असेल का याची खात्री सुद्धा नसते तरी माणसाचा अहंकार जात नाही ना दुसऱ्या ला माणुसकी वागवायची बुद्धी असते! 

धन्यवाद वाचल्याबद्दल 
पुढच्या वेळी माझ्या सारख्या सामान्य माणसाला तुमच्या घरी बोलवू नका ना तिला भेटू ही नका ! नाहीतर मानसिक त्रास च व्हायचा! आणि काही झालं तरी माझ्या वेळी दोष माझी आई नाही आहे याला दिला!

माझ्या वडिलांचे मित्र कोरोना मुळे गेले अचानक म्हणून आठवण आली त्यांची म्हणून धडधड होत होती मला आई नाही म्हणून नाही! 

तब्बेत बरी नाही ICU मध्ये होती हवाबदल करायला आली आणि तुमचे टोमणे आणि हसणं घेऊन आली! 
असो ज्याच्या त्याच्या कर्माचा तो धनी!
दुसऱ्याला दुःख देऊन त्याला त्रास देऊन कोणी सुखी राहू शकत नाही एवढं मात्र विसरू नका!

धन्यवाद ! कलियुगात अशी ही माणसं असतात त्याच दर्शन घडले तुमच्या मुळे म्हणून आभार ! 🙏🙏🙏

movie

Molly hurries to boyfriend Jackson's birthday party with some big news to deliver: She's got an offer for a new job, 800 miles away. Jackson says of course he'll follow her anywhere and, because it's also Valentine's Day, he gives her a diamond pendant. Molly surprises him with a puppy. The romance is soon interrupted with the worst kind of Valentine's gift: Jackson's ex, Vanessa, shows up with a DNA test proving he's the true father of her baby. Jackson insists that Vanessa was a one-night stand before he and Molly got serious, but Molly is livid. She leaves puppy, pendant, and Jackson in San Francisco and heads for New Mexico.
—ION Network

https://youtu.be/HlntBzqSv_A

शंख शिंपले



लहानपणी शंख शिंपले बाजूच्या इमारती च काम सुरू असताना रेती मध्ये सापडायचे !☺️

quotes

माणुसकी

माणसाने  माणसाशी माणुसकीत जर वागले !निसर्गाला देव मानलं तर एका देवळातून दुसऱ्या देवळात सुद्धा जायची गरज भासतं नसते! शेवटी देव कर्माचा लेखाजोखा ठेवतो! 🤠 नुसतं देवळात जाऊन ,गंगेत स्नान करून काही होत नसतं!   #vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .