माणसं

माणसं काही प्रेमळ असतात काही कठोर.
प्रेमळ माणसं सर्वांना आहे तसं स्वीकारतात.
वाईट माणसं भेटली की त्याच्या पासून लांब राहतात. समोरचा व्यक्ती कसा आहे त्यावरून
त्याच्या संपर्कात रहायचं नाही ते ठरवतात.
एखादी व्यक्ती वाईट वागत असेल तर ती वाईट आहे. म्हणून वाईट माणसा कडून चांगलं वागायची अपेक्षा ठेवू नये. मग त्रास होत नाही. कठोर माणसं समोरच्याला सतत फुकट सल्ले देत असतात. स्वतः बोलणार तिच योग्य दिशा इतरां सोबत चर्चा सोडून स्वतः ची मत मांडण्यात पुढे असतात. वाईट माणसं दुसऱ्याला कमी लेखतात.  चांगली माणसं सर्वां सोबत समान व्यवहार करतात; एकसारखं वागतात;भेदभाव करत नाही.

Be open minded.आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती नाही मिळाली तर दुसऱ्या गोष्ट निवड करावी. मला हेच पाहिजे हट्ट करू नये.आपल्याला आनंद मिळतो ते करत राहणे.कला असेल तर आर्थिक व्यवहार करणे. फुकट कला सादर करू नये.
©Vidyamslife

 २४ जानेवारी २०२०

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .