तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकरसंक्रांती ला बोलतो आपली संस्कृती . पण आजकाल लोकं फक्त समोरच्या कडून काम करून घेण्यासाठी गोड गोड बोलतात.मनापासून आदर म्हणून समोरच्या व्यक्ती सोबत निस्वार्थीपणे वागणारे कमीच असतात. सध्या माणसाला माणूस बनवणं ह्याकडे जास्त दिलं पाहिजे शिक्षणात. चांगली माणसं घडली तर समाज सुद्धा चांगलाच घडेल की. मुलांसोबत कसं वागावं पालकांना माहित नसतं . समाजात वावरताना कोणाशी कसं बोलायचं काय बोलायचं काय बोलायचं नाही, कसं वागायचं हे ही शिकवण्याची गरज आहे. जपान मध्ये सुरवातीचे चार वर्षे मुलांना कसं वागावं आणि कोणतंही काम कमी नसतं कोणाला कमी लेखू नये हे शिक्षण देऊन माणूस घडवतात. आपल्या इथे ही नवीन शिक्षण पद्धती मध्ये हे सगळं असेल अशी आशा आहे.
#vidya
माणूस बना
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment