आज काल महिलांवर होणारे



आज काल महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत .. हे थांबवण्यासाठी कोण कोण प्रयत्न
करत आहे त्या पेक्षा प्रत्येक महिलाने आपली रक्षा स्वतः करण्यासाठी ... स्वतः सक्षम व्हावं . स्व रक्षणाला जास्त प्राधान्य द्यावं . महिलांची  संख्या कमी होत आहे ह्याचं मूळ कारण सामाजिक मानसिकता आहे जी स्त्री जन्म नाकारते ... अजूनही स्त्री भृण हत्येचं प्रमाण कमी झालेलं नाही .... प्रत्येक स्त्री ने अश्या कु प्रथांचा विरोध करणं खूप गरजेचं  झालं  आहे ... अजूनही हुंडा पद्धतीला पाठींबा दिला जातो ही तर शोकांतिका आहे .. ह्या स्वतंत्र भारत देशाची जिथे स्त्रीला अजूनही कमी लेखले जाते ..
हीच समाजाची मानसिकता बदलण्याची अत्यंत गरज आहे ... त्या मुळे खऱ्या  अर्थाने स्त्री स्वतंत्र होईल ... आणि  महिलांना समाजात मान सुद्धा मिळू शकेल .
स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार खर तर आई वडलांनी  बाल मनावर बिंबवण्याचे   प्राथमिक कर्तव्य आहे ... त्या मुळेच समाज सुदृढ होईल आणि महिला सबलीकरण होण्यास मदत होईल ...
#विद्या 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .