quote


Let the flower of life , blossom in the ray of true self. 
~ vidya 

My favorite quotes

कमळपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत, निसटत्या क्षणाला कधी जवळ करायच नसत, आयुष्य असच असत, खुप काही हरवल तरी खुप काही उरलेल असत!!
***********************

Life is so beautiful !! Enjoy Every Moment Of Life!!
***********************
Low aim is crime ....So always DREAM BIG and make it possible.
***********************
मरण दाराशी आल्यावर मी म्हटल तुला शंभर वर्ष आयुष्य आहे.मरणही चाट पडलं,काय हा मनुष्यं आहे.- चंद्रशेखर गोखले
***********************
Life is mysterious; never be smooth.
***********************
My Favorite SMS to relax my mind : Often when we lose hope and think this is the end, GOD smiles from above and says, "Relax, sweetheart, it's just a bend, not the end :)
***********************
Never ever compare yourself with others ; Because You never know what their journey and destination is all about !!
***********************
respect ur self enough to let go of people who underestimate u .. ur feelings n thoughts

***********************
मला पक्क ठाऊक आहे कि प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणुन मी काही बोलत नाही मी अगदी शांत आहे.- चंद्रशेखर गोखले
***********************
My Thoughts:
Expect Less From Others & Be Happy !!-vidya
Enjoy every moment of life..vidya

***********************
ज़िन्दगी में कभी आत्मसम्मान के साथ समझोता नहीं करना चाहिए भले व़ोह काम ही क्यों ना छोड़ ना पड़े ..उससे तो अछा में मर जाना पसंद करुँगी ..

ज़िन्दगी में अन्याय के खिलाफ लड़ना चाहिए भले किसीसे इन्साफ मिले या ना मिले ...

अन्याय सहन करना व़ोह भी काम को बचने के लिए इससे बड़ा पाप दुनिया कुछ भी नहीं है..

जो लोग दूसरो पे अन्याय करते है व़ोह कभी जिंदगी में सुखी नहीं हो पाते..

------------
आयुष्य खूप सुंदर आहे जगुन तरी बघा ..
धावपळीच्या या जीवनात क्षणभर विश्रांती घेऊन तरी बघा --विद्या पालकर
--------------

One who can detach one’s mind from material things will see the effulgent light of Brahman and Its presence in everything.

SWAMI VIJNANANANDA

--------
Sometimes we need to close our eyes, clear our minds, and just go with the flow of life...

-----------
दिलखुलास हसावं, मनमोकळं असावं, प्रतिबिंब ही न रुसावं, जगणं !!

----------
If you don’t like something, change it. If you can’t change it, change your attitude. Don’t complain. :D

-----------
स्वत: मधे केलेले बदलही सुखावह असतात (वेळेनुसार )...Neeta Jaywant
------------
Dr. APJ Abdul Kalam
Money should not be the only reason for you to work.
Please tell me the other reasons for you to work hard.. :)

-----
"Whatever you Wish, Whatever you Dream, ~ Whatever you hope to Achieve, ~Its yours if you only Believe ~" - Oprah Winfrey

--------------
My Fb Page @ https://www.facebook.com/vidya.nurtureoneslife
---------------
इदं न मम ..

जीवन

जीवन


जीवन एक प्रवास सुख ,दुःखाचा !!
नव्या आयुष्याची नवी पहाट !!

जन्म नव्या आयुष्याशी नवी चाहूल !!
जीवन खूप सुंदर आहे मन मोकळेपणाने जगावे !!

या प्रवासात अनेक सोबती मिळतात !!
पण कोणाचीच सोबत कोणाला पूरत नाही !!

आपली वाट आपल्यालाच शोधावी लागते !!
जन्म मृत्यू हे चक्र सदैव चालूच राहते !!
~ विद्या
ज़िंदगी संगीत है
गुणगुणाते रहना
गम हो या ख़ुशी का मौसम
गीत हसीन पलो के
यादों में संजोके रखना
~विद्या

ज़िंदगी संगीत है

ज़िंदगी संगीत है 
गुणगुणाते रहना 
गम हो या ख़ुशी का मौसम 
गीत हसीन पलो के 
यादों में संजोके रखना 
~विद्या

गीत


गीत



गीत

स्पंदनांनी गीत फुलावे !
मनातला स्वर जुळावा !!

मधुर गाणे ओठावरुनी बरसावे !
जणू पावसाच्या रिमझिम धारा !!

स्वर छेडावा हृदयातूनी !
गीत उमलावे मनी !!

फुल पाखरांच्या संगे !  
छंद लागावा जीवा !!

गाण्यात धुंद होऊनी !
हरवून जावे या  जीवनी !!
~ विद्या 

पाऊस

पाऊस 


पाऊस 

बेधुंद पावसात मनसोक्त भिजावं
आनंदी  सारा आसमंत व्हावा ….

ओल्या चिंब पावसाची
पहिली सर तजेला देऊनी जावी

गार वारा अंगी भिनावा
तृप्त ह्या जीवा करावा

मातीचा सुंगध दरवळावा
नद्या ओसंडून वाहू  लागाव्या

निसर्गाचे हे नयन रम्य रूप खुलावे  
मन चिंब भिजुनी जावे
~विद्या 

कोकण

कोकण


कोकण

सुरांच्या मैफिलीत जणू रम्य सकाळ न्हाऊन जावी !
असे कोकणाचे सौदर्य !!

निसर्गाच्या छायेत जणू विसाव्याच्ये क्षण मिळावेत !!
असा आहे माझा कोकण !!

कोकणच्या सफरीची मज्जा लुटताना !!
सफरीच्या वाटे वरती असताना !!.

शहाळ्याचं पाणी पिऊन मन तृप्त करावे !!
मोराचा नाच , माकडांची चेष्टा बघून सुंदर समुद्र किनारी फिरावे!!

वाहत्या झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त भिजावे !!
मंदिराच्या महादेवाच्या देवळात जाऊन नमन करावे!!

सुखाची अनुभूती दिल्या बद्दल आभार व्यक्त करावे !!
चांदण्या राती ताऱ्यांची माळ पसरावी अंगणी !

जणू निसर्गाच्या ह्या रेशीम गाठी !!
शांत निरागस निसर्गात जीवनाचे मोल जाणावे !!

विसाव्याचे चार क्षण अनुभवून मनोमन तृप्त व्हावं !!
रात किड्यांच्या आवाजांनी मन धुंद व्हावे !!
सफरीची मजा लुटुक पुन्हा पुन्हा हय यावे !!

कोकणातले कोबडी वडे आणि
मास्याचो साराची चव घेतल्याशिवाय सफर संपाची नाय !!
कोकणाचो निसर्ग डोळ्यात भरून परतीच्या वाटे वर यावे !!
परत येतंय म्हणान निरोप घेऊन जावे !!

~ विद्या 
============

सुर्योदय

सुर्योदय


रात्र संपली !
सूर्य उगवला ,पहाट झाली!

पक्ष्यांची किलबिल
अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी बसले,

वातावरण कसे ताजे  तवाने झाले  !
सूर्य किरणे झाडाच्या आडोश्याने पसरु लागली ,
सूर्योदय झाला!अन नवा दिवस उगवला !!

~ विद्या

आई



आई

----------------------------------------------


ती गेली तेव्हा दुखा:चा पाऊस कोसळत होता !!
आयुष्याच्या कटू प्रवासाची तो चाहूल देत होता !!

आता फक्त आठवणींचा वारा दुमदुमत होता मनी !!
आणि केविलवाण्या हृदयाला जाऊन भिडत होता !!
ओसंडून वाहणारा डोळ्यातला पाऊस सुद्धा थांबत नव्हता !!

आयुष्यातला हिरव रान कोरडं झालं होतं !!
त्या मायेच्या अस्तित्वाला परकं झालं होतं !!

आता फक्त होता तो आठवणींचा झरा !!
हुंदके देऊन रडणाऱ्या डोळ्यांना
तिच्या प्रेमाचा ओलावा !!



----------विद्या ---------


8/4/2012


(आईच्या स्मरणार्थ मी लिहिलेली कविता )

सारे काही तेच आहे…




सारे काही तेच आहे…




सारे काही तेच आहे…
---------------------
तेच घर …
तेच दार...

तिच माणसं …
तिच आपुलकी...

तोच मायेने फिरवणारा हात ….
तीच सावली ….
तेच जिवलग…

तोच जिव्हाळा …


तिच नाती ….

तोच आपलेपणा …
तोच नात्यामधला ओलावा …

सारे काही तेच आहे…
फक्त बदलली आहे ती वेळ …

आज ह्या घरची मुलगी …
उद्या त्या घरची सून होणार आहे …

---विद्या 

नाती


नाती 
-----------------------------

जशी ओळख वाढत जाते !
तशी नाती नव्याने उलगडतात !!

सूर मनीचे जुळताच !
नात्यांमधले स्वर सापडतात !!
~ विद्या 

चेहरा

चेहरा
-----------
चेहऱ्यावरी चेहरा
न जाणे त्यावर किती मुखवटे

विश्वास अविश्वासाच्या
साऱ्या खुणाचं भासती

कधी हास्यामागे
आक्रंदने लपवती

खळी खुलताच
चेहरे नटती

कधी अभिनयाचे पाढे दिसती
कधी नाटकांचे प्रयोग रंगती

डोळे मात्र बोलके
अंतरीचे भाव सांगती …

~ विद्या 

चं.गो. ~ शब्दरंग


शब्दरंग 
~ चं.गो.




मनतरंग

काळाच्या प्रवाहा सोबत वाहणे आणि मनसोक्त जगणेच योग्य -विद्या

आई




आई
---------------
तू सावली माझ्या जीवनाची ..
तू श्वास माझ्या अंतरीचे ..

कधी अश्रू बनून ओघळणारी तू..
तरीही सदा जवळ वाटणारी तू ..

जीवनात रंग भरुनी जाणारी तू ..
नवी स्वप्ने दाखवणारी तू ..

काळाच्या आघातात हरवलेली तू ...
मात्र मनाच्या कुपीत सदा दडवलेली तू...

- विद्या 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .