पाऊस
पाऊस
बेधुंद पावसात मनसोक्त भिजावं
आनंदी सारा आसमंत व्हावा ….
ओल्या चिंब पावसाची
पहिली सर तजेला देऊनी जावी
गार वारा अंगी भिनावा
तृप्त ह्या जीवा करावा
मातीचा सुंगध दरवळावा
नद्या ओसंडून वाहू लागाव्या
निसर्गाचे हे नयन रम्य रूप खुलावे
मन चिंब भिजुनी जावे
~विद्या
0 comments:
Post a Comment