अधिकार गाजवावा लागतो ... हक्क आपल्या माणसावर बजावावा लागत नाही ..जेव्हा बजावण्याची वेळ येते तेव्हा नाती कमजोर झालेली असतात . विश्वास आपुलकी जिव्हाळा पेक्षा स्वतः चा विचार जास्त होतो. आपल्या माणसाच्या आनंदात आनंद शोधण मी पणा सोडून एकत्र येणं हे जास्त मह्त्वाचे वाटतं . एकमेंकाच्या चूका दाखवण्यापेक्षा चुका सुधा रण .. एकमेकांना साथ दे ण वेळ पडली कि स्वतः ला बदलणं हे सुद्धा आलंच # विद्या
आयुष्य आणि समाज
==========
#आयुष्य आणि समाज #मनस्वीविद्या
===========
सामान्य माणसाच्या आयुष्यात चारच पडाव असतात.. शिक्षण नोकरी लग्न आणि वृद्धापकाळ ... झालं .. सगळ काही सुरळीत चाललं की म्हणे तुम्ही successful झालात .. साधी व्याख़्या.. ह्या गोष्टी वेळेवर झाल्या कि तुम्ही समाजात जगायला मोकळे …
संघर्षा शिवाय आयुष्याचा विचार तरी होऊ शकतं का..? काहीना कमी असेलही पण … संघर्षच नाही असं नाही ..
समाज काय म्हणेल … ह्याच्यावर अर्ध आयुष्य बांधलं जातं … तर कधी समाजात मिरवायला काही गोष्टी केल्या जातात … उत्तम मार्काचं हवेत हे ओझं घेतं मुल मोठी होतात … नोकरी साठी धडपडतात … इथे मात्र नोकरी करता का विचारतं हा समाज … कधी ऐकलं नाही व्यवसाय करता का कि करायचा विचार आहे का … ? तसही समाजाच्या संकुचित मागासलेल्या विचारांची सवय झाली असते म्हणा इथे प्रत्येकाला … मांजरं आडवी झाली कि माणसं वाट बदलतात .. पण खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसंच आडवी येतात … मुलां मध्ये कलागुण असेल तर प्रोत्साहन देणं सोडाच … सुरवातीला अस्विकारच केलं जातं … इथे मात्र पालकांचा अहम आडवा येतो ..
मुलांनी आपल्या पेक्षा अधिकच कमवायला पाहिजे ह्या अपेक्षा … तसही समाजात मिरवायला ह्याच गोष्टी कामी येतात म्हणा …….आजूबाजूच्या मुलांची तुलना करणं आलचं .. मुलांना कमीपणा दाखवायला .. मुलांचं मानसिक संतुलन ढासळायला … हा समाजच कारणीभूत आहे … ज्यात आत्महत्या करणारी मुलं आलीच …कधी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने … आयुष्य म्हणजे शिक्षण नोकरी लग्न ..एवढचं असतं का ज्या समाजच्या नावाने हे करू नको ते करू नको बोललं जातं …
तो समाज मात्र आयुष्याच्या शेवट आला तरी मागेच राहतो …स्वतः च्या अपेक्षा पूर्ण करण्यात मुलांवर लादण्यात …आयुष्य संपतं एकदाचं …
ह्यालाच म्हणतात का … success ?
काळाने आघात केला कि चार दिवस लोकं दुखी कष्टी होतील आणि लागतील आपल्या मार्गाला … तुम्ही किती कमावता ह्या पेक्षा तुम्ही कार्य काय केलं हे जास्त लक्षात राहणार शेवटी …
खऱ्या अर्थाने जो स्वार्थी जगणं सोडून समाजा साठी जगेल … आपल्या कलेचा विकास करेल ...समाजाला स्व विचारांनी सधन करेल …. तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगला म्हणायचं …
4/4/16
#vidyap
माणसातला माणूस हरवला
कर्म
माणूस कर्माने ओळखला जातो त्याचं नाव नंतर लागतं .. #मनस्वीविद्या
उदा . संगीतकार ,डॉक्टर ,सामाजिक कार्यकर्ता ,RTI Activist ,Businessman or job professional...
आपलं माणूस
ते आपलं माणूस आहे ह्याची जाणीव काहींना होते ... पण कधी काळ सुद्धा पुरत नाही ... कधी ... जेव्हा होते तेव्हा व्यक्ती दूर गेलेली असते...... #मनस्वीविद्या
* चंगो च्या पोस्ट वरून सुचलेलं
मन
ज्या गोष्टी मनापासून करतो त्याचं कधीच ओझं वाटतं नाही..प्रत्येक वेळी गंभीर असण्याची अट नको ना... काही गोष्टी हसत खेळत ही होतात... कामही होतं.. आणि मन आनंदी हि राहतं.......
आता हसणं जास्त बरं नाही ... कारण काहीजणांचा गैरसमज होतो... त्याचं म्हणणं गंभीरतेने घेतलं नाही असं वाटतं... अति वाईट च कोणत्याही गोष्टीची...
#स्वानुभव #मनस्वीविद्या
वक्त वक्त कि बात है
वक्त वक्त कि बात है

अहंकाराचे पंख छाटायला ...
एक वेळच पुरेशी असते!
------------
वक्त वक्त कि बात है
आज किसी का है
कल किसी और का होगा..
#vidya
आयुष्य
inorganic झालय आज कालच आयुष्य ..माणसापासून दूर जातायत माणसं ....पण निसर्गापासून दूर गेलेलं माणसाला तरी परवडेल का ?
मालिका
Zee Marathi वरच्या मालिका .. खुप महिन्यांनी एक भाग बघितला ... पूर्ण भागात सासू सुनेला कशी छळते ... नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं ...तर दुसऱ्या मालिकेत अंधश्रद्धा शिवाय काही नसतं ....ह्या असल्या मालिका चालू का राहतात trp कोण वाढवत असेल .. असंवेदनशील समाजाची लक्षण म्हणायच दुसरं काय
दर्जा
साहित्यिक दर्जा रसिक ठरवतात .. छोटं मोठं काय असतं .. प्र त्येका च भाव विश्व वेगळ अनुभव .. जीवन जगण्याची कला वेगळी ... आपण आहोत तसं स्वतः ला स्वीकारण्यात काहीच हरकत नाही असं वाटतं... निंदकाचे घर असावे शेजारी ... हे पण आलंच....#विद्या
धार्मिक देवस्थान
सुख
राजकारण
स्वभाव
नेहमी पेक्षा सोबतची व्यक्ती अति गोड वागू लागली कि समजायचं (दाल में कुछ काला है) तसही काहीं ना गिरगिटा सारखे रंग मनाचे बदलण्याची अनैसर्गिक सवय जडली असते म्हणा.......मुखवटे बदलायला ह्यांना कसला आसुरी आनंद येतो देव जाने ..... दुसर्यां ना त्रास ... ह्यांना कुठे फरक पडतोय म्हणा ... असंवेदनशील माणसं ही संवादा पेक्षा वाद करण्यात दुसर्यावर हुकुमत गाजवन्या त जास्त रस #विद्या
कला
कलेचा आणि शिक्षणात कमी गुण मिळण्याचा .... काय संबध बरं..... तरी माणसं कले पेक्षा परीक्षेतल्या पोपट पंक्षी गुणांकडे लक्ष देतात....
... कले मध्ये प्राविण्य मिळवायला साधनेची गरज लागते .... कधी विचार बदलणार त्या लोकांचे माहित नाही... ह्या अज्ञाना मुळे ..अविचारा मुळे... काहींना मानसिक त्रास होतो तो वेगळाच....
#विद्या
भावना
ज्यांना भावनेची किंमत असते त्यांच्या समोर व्यक्त होण चांगलं असतं.. नाहीतर नुसतं समोर भावना शुन्य दगड असतात काही... तरी दगडालाही पाझर फुटतो म्हणा..#विद्या
Quotes
अहंकाराचे पंख छाटायला ...
एक वेळच पुरेशी असते!
------------
वक्त वक्त कि बात है
आज किसी का है
कल किसी और का ..
#vidya
quotes
Be positive expect less be happy ! :)
संवाद
Relationship
.........
आज काल च्या जगात office college इतर कुठूनही समविचारी मित्र होतच असतात ... नात्यांना जितकं घट्ट पकडू तितकं ते घुसमट असं माझं मत आहे .. भले ते मुलं पालकांच असो वा नवरा बायकोच ..
.......
#विद्या
प्रवास
=======
Before reaching the goal .. the people who are with u are most importance once than after achieving goal of life journey..
#Vidya
Quotes
प्रवास गाठल्यावर साथ देणारे खूप भेटतील ..पण प्रवासात असताना सोबत असणाऱ्या व्यक्तींची साथ फारच मोलाची असते ।
=======
Before reaching the goal .. the people with u are most importance once than after achieving goal of life journey..
#Vidya
आयुष्याच्या खऱ्या रंगमंचावर
आयुष्याच्या खऱ्या रंगमंचावर
वावरताना , असंख्य भूमिका पार पडत असतो आपण..
कोणी आई ची कोणी मुलीची , बायकोची , बहीणीची.
तर कोणी बापाची ,मुलाची ,नवऱ्याची ,भावाची.
कधी गुरु शिष्याची , कधी मित्र मैत्रीणीची.
संवादामुळेच माणूस घडत जातो ,
रोज नवं काही आपसुक शिकतो .
पण प्रत्येक भूमिकेत तो वेगळाच असतो .
वेगळच वागणं असतं ,
कधी कठोर ,कधी मृदु ,
कधी खट्याळ, कधी निरागस.
भाव विश्व कसं खुलुन निघतं,
आयुष्याचे क्षण कधी हसरे होतात ,
सुख दुःखाचे सोबती होतात.
अल्लड मनाच्या भाव विश्वात रमू लागतात.
नात्याची सुंदर पहाट अनुभवतात.
#विद्या





