आयुष्याच्या खऱ्या रंगमंचावर
वावरताना , असंख्य भूमिका पार पडत असतो आपण..
कोणी आई ची कोणी मुलीची , बायकोची , बहीणीची.
तर कोणी बापाची ,मुलाची ,नवऱ्याची ,भावाची.
कधी गुरु शिष्याची , कधी मित्र मैत्रीणीची.
संवादामुळेच माणूस घडत जातो ,
रोज नवं काही आपसुक शिकतो .
पण प्रत्येक भूमिकेत तो वेगळाच असतो .
वेगळच वागणं असतं ,
कधी कठोर ,कधी मृदु ,
कधी खट्याळ, कधी निरागस.
भाव विश्व कसं खुलुन निघतं,
आयुष्याचे क्षण कधी हसरे होतात ,
सुख दुःखाचे सोबती होतात.
अल्लड मनाच्या भाव विश्वात रमू लागतात.
नात्याची सुंदर पहाट अनुभवतात.
#विद्या


0 comments:
Post a Comment