एक सारखी गोष्ट असली तरीही त्या परिस्थितीत व्यक्ती कसा वागेल हे त्याच्या त्याच्या स्वभावावर , पूर्व संस्कारांवर , समाज विचारांवर अवलंबून असते. शेवटी व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती #vidya
23 sept 18
संस्कार
गणेशोत्सव
ढोल पथक चांगलं सणाच्या वेळी त्या dj पेक्षा नाहीतर कोंबडी पळाली आणि बघतोय रिक्षा वाला सारखी फालतू गाणी लावतात ते dj वाले !
23 sept 18
मानसिक आजार
मानसिक आजारांचं मूळ कारण संवाद कमी झालाय दुसरं माणूस म्हणून माणसा सोबत माणसा सारखं वागणं संवाद करणं विसरलेत ...
#Vidya
24 Sept 18
प्रश्न उत्तरं
कधी आयुष्यातले प्रश्न उत्तरं शोधल्याने सुटतात तर कधी स्वतः ला आहोत तसं स्वीकारल्याने आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केल्याने .. मन कधीच वर्तमानात जगू देत नसतं म्हणून.. Meditation सर्वांत उत्तम पर्याय असतो .. वर्तमानातही जगता येतं आणि मन : शांती ही मिळते #vidya
25 sept 18
खाणं आणि जगणं
आपण फक्त खाण्यासाठी आणि पोटासाठी पदार्थ बनवायला शिकतो 😂🤣तसही दुसऱ्या कोणी बनवून खाण्यात जास्त आनंद असतो ना आणि सुगरण कोणाला बनायचंय..
25 sept 18
आयुष्य जगतात
काही मजेत दिवस घालवतात तर काही चिंतेत इतकाच काय तो फरक ..काही आयुष्य जगतात तर काही नुसतंच घालवतात .. ! #vidya
26 sept 18
मांसाहार
🤣😂😀 मांसाहार कोनाकोणाक आवडता ...
कोकणातल्यांचो जीव की प्राण आसा ह्यो ..
मागे एकदा हॉटेलमध्ये गेलेलो तर बाजुच्या टेबलावर मुली बघायचा कार्यक्रम होता .. त्यांच्या बोलण्यावरून कळलं आपल्याच गावचे मुलगी शिकली नोकरी करणारी असली तरी पहिला प्रश्न मांसाहारी जेवण येतं का ? 😂 बाबा आणि मी हसा होतव मग .. डोसा खाई पर्यंत मनोरंजनच झाला 😀
26 sept 18
पितृपक्ष
🤣😂 जिंवतपणी मरणयातना देणारे पितृपक्षात न चुकता अन्न देतात कावळा शिवावा इतका हेतू ..
27 sept 18
Civil offense
497 कायदा रद्द .. Supreme court says it's not a crime but civil offense .. कोणी व्यभिचार केला तर ती व्यक्ती काडीमोड घेऊ शकते ..
27 sept 18
Husband is not master
Husband is not a master ..पत्नी पुरुषाची मालमत्ता नाही .. ह्या विचाराच समर्थन करून #497 कायदा #रद्द करण्यात आला आहे.. स्वतःच्या नात्याची जबाबदारी स्वतः घ्यायची असते कायद्यावर ढकलून नाती टिकत नसतात .. एखाद्या नात्यात सुखच नसेल .. कुढत जगण्यात .. नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ..बाहेरच्या देशात नातं तुटणार म्हणून सरळ एकमेकांच्या सहमतीने वेगळं होतात कोणी मानसिक त्रास देत नाही.. नातं टिकवण्यासाठी हट्ट नसतो ना तोडतेवेळी दुसऱ्याला त्रास. .. दोघात तिसरी व्यक्ती येण्याची वेळ च येत नाही मग.. #vidya
27 sept 18
माणूस
माणूस सामाजिक प्राणी आहे त्याला व्यक्त व्हायला नातं हवंच असतं .. संवाद करण्यासाठी कधी समजुन घेणारं .. काहींना घरीच भेटतात तर काही मैत्री साठी नवी नाती जोडतात..तरीही स्वतःला पूर्णतः कोणी समजून घेईल आपले प्रश्न समोरची व्यक्ती सोडवेल म्हणून दुसऱ्या व्यक्ती कडून अपेक्षा करू नयेच मुळी..त्याच्या वर मानसिक दृष्टीने अवलंबून राहू नये ..आयुष्यात कधीही कोणी येतं आणि प्रारब्धात असतं तेच घडतं काही नाती आयुष्यभर साथ देणारी असतात काही वळण आली की आपापल्या मार्गाने जाणारी ही भेटतात..मोह टाळता आला वपु च्या भाषेत एकटेपणा एकांत वेगळे असतात ..एकांताचा कोणी अंत करू नये ..एकटेपणा पेक्षा एकांतात आयुष्य जगावं कोणी सोबत असो वा नसो त्रास होणार नाही .. #vidya
27 sept 18
Pop गणपती
Pop चे गणपती बनवण्या मागे फक्त पैसा कमवण असतं ..मोठे मोठे कारखाने बनवायचे .. पुढे हे मंडळ मोठे का ते मंडळ मोठं .. गणपती मातीच्या मूर्ती ने बनवणं त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली की झालं .. ज्यांना जमतं नाही त्यांनी तरी छोट्या प्रति मूर्ती लहान मूर्ती बनवून त्यांचं विसर्जन करावं की नाहीतर रोजचचं आहे pop मूर्ती चे कुठे हात कुठे पाय समुद्र किनारी दिसणार त्यात काही जण तर विसर्जन करायला विसरलेत वाटतं .. मूर्ती विटंबना करताना काही कसं वाटतं नाही यांना :( पोस्ट बघितली की कळेल .. असे सण साजरे केले जातील टिळकांनी सुद्धा कल्पना केली नसणार .. साधं सोपं नकोच असतं म्हणा .. #विद्या
27 sept 18
Truth
One can postpone his bodily existence on the earth but can't escape from truth of mortal body..#vidya
जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना गीत आठवलं .
28 sept 18
आयुष्य आणि मरण
असंच होतं नेहमीच ज्याला जगायचं असतं त्या व्यक्तीला आयुष्यातून जावं लागतं :( ज्यांना रस नसतो त्यांना मात्र न चुकता जगावंच लागतं .. उसके मर्जी के आगे किसकी चली है वैसे भी #vidya
28 sept 18
मुलांना जेवण करता येणं
मुलांना जेवण करता येणं हा ही आई वडिलांचा संस्कार नाहीतर काही ठिकाणी ताट सुद्धा उचलायच नाही हेच शिकवलं जातं काही घरात अजुनही अमेरिकेत नवरा बायको दोघंही मदत करतात तिकडे कामवाली बाई इथल्या सारख्या झटपट मिळत नसतात किंवा संख्या कमी नाही तर इथे मुलांनी जरा काही घरचं काम केलं तर स्तुती सुमन उधळण होते #vidya
28 sept 18
यश आणि समाधान
ज्याचं त्याने ठरवायचं असतं यश आणि समाधान तुझ्या स्वतःसाठी हवं आहे की लोकांच्या डोळ्यात आपलं यश भरावं म्हणून..प्रत्येकाच्या यशाची व्याख्या वेगळी असते ..माणूस कशात समाधानी आनंदी होईल हे ही त्याच्या स्वभावावर अवलंबून असते..
#vidya
वाचक
वाचकांना लेखन मात्र वाचायचं असतं पण तुम्ही काम काय करता म्हणून विचारपूस केली जाते .. साहित्यिक साहित्यिक म्हणून समाधानाने त्याच्या मर्जी प्रमाणे आयुष्य जगू शकत नाही का ? ह्यांना पुस्तक बरी वाचायला आवडतात एक एक पण त्या लेखन करणाऱ्या व्यक्तीला आहे तसा स्वीकारण्याची कुवत मात्र नसते .. वाचन झालं की स्तुती सुमन उधळायला हे मोकळे #vidya
स्तुती
माणूस गेल्यावर जितकी स्तुती करतात तितकी तो असताना किती जण करतात.. अटल जी गेले तेव्हा विचार आला ..व्यक्ती असताना योग्य त्या व्यक्तीं कडून योग्य तो मान त्या त्या वेळी दिला तर इथेच स्वर्ग होईल नाही का? पण अहं आडवा येतो ना..
वाद संवाद
एकदा समोरचा माणूस मनातून उतरला की त्याचा आणि आपला संबंध संपलाच .. राग वैगरे नाही .. विचार मन जुळली नाही तिथे संवादाची ही अपेक्षा नसते .. समोरचा माणूस आपण कसे ही वागलो तर काय बोलेल हे आधीच कळतं.... टोकाची मतं असणाऱ्या सोबत संवाद न केलेला उत्तम .. आहे तस त्या व्यक्तीला स्वीकारणं .. शांत राहणं उत्तम .. स्वतः च्या मन शांती साठी #vidya
कायदा आणि स्त्री
एक कायदा रद्द झाला म्हणून कविता आणि नको ते विचार मांडतात काही group वर.. स्त्री अत्याचार विरोधात कायदा आहे .. हुंडा , भ्रूणहत्या विरोधात कायदे आहेत तरी इथल्या स्त्रिया काही सुरक्षित नाही .. कायदे बदलून नाही तर मानसिकता बदलून समाज बदलतो .. एक कायदा गेला की दुसरा कायदा येतो .. कायद्याचा वापर करणाऱ्याची संख्या कमीच .. न्याय मिळणं तर दूरची गोष्ट इथे #vidya
पुरुष प्रधान संस्कृती
आपल्या कडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि स्त्रिया समर्थन करण्यात अग्रेसर असतात याच अन्याय झाला तरी सहन करतात मग दोष दोघांचाही आहे एकट्याचा नाही ..
पत्नी पुरुषाची मालमत्ता नाही..
Husband is not a master ..पत्नी पुरुषाची मालमत्ता नाही .. ह्या विचाराच समर्थन करून #497 कायदा #रद्द करण्यात आला आहे.. स्वतःच्या नात्याची जबाबदारी स्वतः घ्यायची असते कायद्यावर ढकलून नाती टिकत नसतात .. एखाद्या नात्यात सुखच नसेल .. कुढत जगण्यात .. नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ..बाहेरच्या देशात नातं तुटणार म्हणून सरळ एकमेकांच्या सहमतीने वेगळं होतात कोणी मानसिक त्रास देत नाही.. नातं टिकवण्यासाठी हट्ट नसतो ना तोडतेवेळी दुसऱ्याला त्रास. .. दोघात तिसरी व्यक्ती येण्याची वेळ च येत नाही मग.. #vidya
497 कायदा रद्द
#497 #रद्द
आपल्या कडे पुरुष किंवा स्त्री प्रधान #कायद्यांची कमी नाही आणि इंग्रजांनी लादलेले कायदे स्वातंत्र्य मिळाल्या वरही रद्द केले नाही हे नवल .. नवरा आरोप पत्र दाखल करणार.. स्त्री ने गुन्हा केला तर पुरुषाला शिक्षा .. त्या स्त्रीला नाही ... नवऱ्याने गुन्हा केला तर ह्या कायद्यात स्त्री ला आरोप पत्र दाखल करण्याची तरतूद नाही .. स्त्री पुरुष समानता न मानणारा कायदा होता .. आता इतिहास जमा झाला .. गुन्हा धरला जाणार नसला तरीही civil offense नक्कीच ठरणार आहे .. सरकार नवीन कायद्या आणण्यासाठी नवीन संशोधन ही करणार हे बातम्या मध्ये ऐकलं म्हणून उगाच विवाह संस्थेला धोका असं काही नाही .. मुळात नाती तुटण्यात जमा असतात त्यांनी वेगळं राहावं की कायदा नात टिकवण्यात काही हातभार लावत नाही ती जबाबदारी नात्याची असते #vidya
September Diary 18
14 September 2018 16:49
बालपणी चा काळ खऱ्या अर्थाने सुखाचा होता तो 👌👌 आमच्या वेळी वडील गणपती दाखवायचे आणि नवरात्रोत्सव आली देवीचं ही दर्शन आणि देखावे बघायला मिळायचे . तेव्हा जत्रा हि असायची . साखरेचं पाक , कधी साखरेची गुलाबी गोड वस्तू खायला मिळायची. आमच्या वेळी वडा पाव फक्त दोन रुपये पन्नास पैसे ला मिळायचा .मज्जा होती .
14 September 2018 14:47
वास्तवाची जाणीव झाली आणि स्वीकार केला की माणूस मृगजळा चा ध्यास ही सोडतो मग .#vidya
14 September 2018 14:20
#BhagwadGeeta
Path for realization
Surrender to God
Bhakti Yoga : Devotion
Karma yoga : I am not doer. Self or God is doer.
Gyan Yoga : one Self alone is reality.' I am ' is truth.
12 September 2018 23:18
सिंधुदुर्गात ईमान ईला ..zee 24 तास वर तर मालवणीत वृत्त दाखवत होतो ☺️
12 September 2018 21:17
चोर चोर मौसेरे भाई म्हणून माल्या लंडन ला पळालाय आणि news reporter समोर बोलत बोलत मजेत सिगारेट ओढतोय हा.
12 September 2018 19:50
ह्या माणसांचा पुनर्जन्म म्हणजे ती व्यक्ती आहे असं म्हणणाऱ्यांनी जाणाऱ्याचा आणि येणाऱ्या चा मृत्यू आणि दुसऱ्या चा जन्म तरी बघायचा की.abp majha पुनर्जन्म वर चर्चा सुरू होती बुद्धी गहाण ठेवून :D
12 September 2018 13:46
कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय, प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावुन घेते. माणूस स्वत:चं व्यक्तीमत्त्व स्वत: घडवीत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते. स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुस-याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वत:चं अस्तित्त्व, निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवुन बसतो .#vapu
मी तरी ऐकावे जनाचे करावे मनाचे या प्रमाणे वागते. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते. काही वर्षे वडलांना वाटतं तसं जगून पाहिलं नंतर आपल्या मना प्रमाणे जगायचं ठरवलं. ☺️
आणि जो माणूस स्वतः ची जबाबदारी स्वतः च घ्यायला घाबरतो तो कधीच इतरांच्या मनाप्रमाणे जगत असतो . एक होती ओळखीची वय वर्ष तीस च्या वर गेली तरी आई च हवी प्रत्येक वेळी. स्वतः चे विचार च नव्हते तिला.
12 September 2018 19:50
ह्या माणसांचा पुनर्जन्म म्हणजे ती व्यक्ती आहे असं म्हणणाऱ्यांनी जाणाऱ्याचा आणि येणाऱ्या चा मृत्यू आणि दुसऱ्या चा जन्म तरी बघायचा की.abp majha पुनर्जन्म वर चर्चा सुरू होती बुद्धी गहाण ठेवून :D
12 September 2018 00:43
वेड लागलंय यांना सगळे celebrity पूर्वी कोण होते सांगत आहेत ... संदीप खरे, कौशल इनामदार यांना ही सोडलं नाही.... धार्मिक गोष्टी वर विश्वास ठेवायला यांना विज्ञान हवं....
11 September 2018 13:58
पेट्रोल डिझेल चा मूळ दर पन्नास टक्क्यां पेक्षा कमी असतो हे सरकार कर खूप घेत . कर कमी करा म्हणावं . वरूण गांधी बोललेले स्वतः चा पगार स्वतः नेते मंडळी ठरवतात . हे बदलायला हवं. आधी महागाई वाढवायची मग स्वतः च वेतन.
11 September 2018 12:12
मन कठोर नसेल तर ऐकायचं नसताना ही ऐकतो इतरांचं जेव्हा कळत स्वतः ला त्रास होतो तेव्हा इतरांनी सांगितल्या प्रमाणे वागणं किंवा त्यांना आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याची संमती देणं टाळणं योग्य . #vidya
10 September 2018 13:40
होय अगदी . इकडे अनुभवलं आहे . आवड सारखी असली तरी काही च नातं अहो जाओ पर्यंत राहतं . मोकळेपणा गवसतो तेव्हा मैत्रीचा सोहळा होतो ☺️
10 September 2018 11:04
Social media गुन्हे गारीचा अड्डा झालाय । शाळेतूनच या माध्यमाबद्दल जागरूकता पसरवायला हवी ।गुन्हेगारी आणि व्यसन दोन्ही गोष्टीवर माहिती द्यावी । नुसतं हातात mobile , internet देऊन पालकांची जबाबदारी संपतं नसते । एकवेळ खेळणी तरी बरी । #vidya
9 September 2018 23:40
काही गोष्टी वाचन केल्यावर कळतात मग इतरांची मानसिकते बद्दल चे प्रश्न का आसेना ।
9 September 2018 23:34
जे नैसर्गिक नसतं ते अनैसर्गिक असतं ।
दुसऱ्या बद्दल भीती आणि टोकाचा दु: स्वास याचा परिणाम असतो । कायदे किती ही आले तरी ही । #vidya
9 September 2018 23:23
असे म्हणतात की देवाची सर्वात महान(?🤔?) रचना म्हणजे मनुष्य प्राणी....त्यास सुधारण्यासाठी साक्षात देवालाही खुप जन्म घ्यावे लागले तरीही मनुष्य सुधारला नाही.
याचा अर्थ असा की देवाच्या हातून देखील चूक होते मग आपण तर सामान्य मनुष्य प्राणी
लगे रहो😂😂😂
9 September 2018 23:18
because of fear and hate for other ..they are transgender people. Osho
9 September 2018 20:25
आता मुलगी अल्प संख्याक नाही ना दिल्ली मध्ये राहणारी । ना ती लहान। ना तिची हत्या केली कोणी । इतर वेळी पोस्ट च्या मागे पोस्ट करणारे आता कुठे जातात त्यांच त्यांनाच माहिती । निव्वळ controversy topic वर बोलतील ।
9 September 2018 19:33
aakhe bhi hoti hai dil ki jabaan.. Song
9 September 2018 19:30
emotion dont Need verbal langauge...emotional ones have beautiful heart..
9 September 2018 17:41
काही माणसांच्या वृत्ती खेकडया सारख्या असतात । त्याच अर्थाचा शेर ना ।
*****
इक परिंदा अभी उड़ान में है
तीर हर शख़्स की कमान में है
#AMEER #QAZALBASH
9 September 2018 17:32
जुने चित्रपट यांची गाणी पण चांगली होती आणि विषय ही नात्यावर भाष्य करणारे असायचे । नाही तर आज काल एक तर romantic movie बनवतात नाही तर सामाजिक प्रश्नांवर ।
9 September 2018 16:00
गुंतलेली नाती .. नात्यांमधला गुंता कधीच सुटत नसतो ।
9 September 2018 15:27
मला वाटत देवाचा दर्शन घ्यायला देवळात जायची गरज नसते ! देवाच फ़क्त मनापासून नामस्मरण केल तरी दर्शन घडतं!
गणेश उत्सव ..जन्म आणि मृत्यु च चक्र असाच सुरु राहणार हेच मला दर्शवता.
9 September 2018 14:46
जाणूनबुजून दुसऱ्याला त्रास द्यायला असं वागतात । असुरी आनंद मिळत असावा त्यांना । दुसऱ्या च्या यशावर जळणारी लोकं आहेत ही ।
9 September 2018 11:37
निस्वार्थी पणाचं दुसरं नाव आई असतं !
9 September 2018 00:38
आयुष्यात चढ उतार येणारच । संघर्ष कोणाला चुकलाय । वाट आपली चालत राहायची । ध्येय माहिती असलं की झालं । #vidya
8 September 2018 20:42
आयुष्यात कोणाशी काय बोलावं काय नाही । कसं वागावं कसं नाही । संवाद कसा करावा इथून सुरवात ।
8 September 2018 20:39
लग्न एकमेव महत्वाची गोष्ट नाही आहे आयुष्यात ।
8 September 2018 20:35
अत्याचार स्त्री वर होतो । रात्री दोन वाजता जरी पुरुष भटकला तरी त्याला कोणी काही त्रास देत नाही । दारू पिऊन बोंब मारली । बायकोला छळलं तरी रोजच सुरूच ।
8 September 2018 19:34
आपल्या इथे मुलांना कसं वागावं कसं नाही हे साधे संस्कार केले जात नाही शाळे पासून । पालक आणि समाजा कडूनही । स्त्री वर अत्याचार झाला की बोलता स्वतः च रक्षण करायला शिकायच ।
8 September 2018 16:52 Social media गुन्हेगारी चा नवा अड्डा च झालाय । गुन्हा करणारी व्यक्ती मुस्लिम आहे बरं का । आज काल धर्म आधी येतो मग गुन्हा आणि गुन्हेगारी । त्यानंतर त्या स्त्री ला न्याय मिळाला तर मिळाला ।
8 September 2018 15:01
कायदा बदलला काहींना न्याय मिळाला । कलाकार मंडळींनी त्या लोकांना सहज स्वीकारलं तस इतर समाजाने ही स्वीकारावं इतकंच । थट्टेचा विषय झालाय काहीं साठी इतकी मानसिकता खालावली आहे काहींची । बाहेरच्या देशात कधीची मान्यता मिळाली आहे ।#vidya
8 September 2018 14:56
आता तिला पत्नी असेल किंवा त्याला पती असेल तेव्हा ही हाच बरा का प्रश्न । तुमचं काय गेलं ??
.
.
.
.
.
कायदा बदलेल पण दुसऱ्याचे स्वातंत्र्य त्यांचा न्याया साठी त्यांनी लढा दिला । इतरांना का त्रास होतोय त्यांचा । नाही का ? चघळायला एका विषयाची भर पडली पण मानसिकता घसरली इतकंच। #vidya
8 September 2018 12:32
आमटे परिवार @ kbc । यांच्या सोबत काल खरी ओळख झाली म्हणायची । साधं राहणीमान उच्च विचारसरणी । आदिवासी बद्दल सांगितलं । तिथे गुन्हेगारी शून्य । माणसाची सुरवात इथूनच निसर्गाच्या सानिध्यात च झालेली असते की । फक्त विकास म्हणून मागे पडलेला समाज । तरीही विचारांनी पुढारलेला समाज आहे । #vidya
8 September 2018 00:09
सत्य परिस्थिती ... एक तरी असावं कोणी खऱ्या आयुष्यात ज्याच्यापेशी व्यक्त व्हावं ... नाहीतर एकांत आणि एकटेपणा ह्यातलं अंतर तरी जाणावं ..एकांतात जगणं शिकावं.
7 September 2018 11:03
पुरोगामी विचारवंत (so called ) ह्याची साधी व्याख्या हिंदु विरोधी विचारसरणी ।
7 September 2018 11:03
काही जण स्वत : ची मत मांडण्यापेक्षा लादण्यात अग्रेसर असतात :D
7 September 2018 11:03
One Woman Killed in Karnataka Noticed by all media and politician but People Killed in kerala including RSS ,Congress members no media gives coverage. #politics#kerala
6 September 2018 23:30
देशामध्ये जितका विरोध सनातनचा,संघाचा होत आहे तितका विरोध रोहिंग्या, बांगलादेशी घुसपैठी चा का नाही होत ?
काय कारण असेल ?
https://www.facebook.com/groups/287309018054859/permalink/1753077121478034/
6 September 2018 17:10
ज्या राज्यातून कमाई करता तिथली भाषा सुध्दा शिकावी वाटतं नाही पर प्रांतियांना कारण हिंदी बोलायला मराठी माणसच सुरुवात करतात म्हणून एवढया वर्ष फावलं त्यांचं ।
6 September 2018 22:24
लाड कमी करायला हवेत मुलांचे । मनावर संस्कार करायला प्राधान्य दिलं पाहिजे । मूल्यशिक्षण विषय आमच्या वेळी होता।
6 September 2018 13:03
आयुष्यात एका विषयात साधना करावी । सगळ्या गोष्टी शिकून काही होत नसतं । एकाच विषयात प्राविण्य मिळवणं खरं तर पुरेसं असत ।कोणी क्रिकेट च्या खेळासाठी साधना करतं तर कोणी गाण्याच्या विषयात नाव कमवतं । कोणी विज्ञान क्षेत्रात । माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या विचारांमुळे घडत असतं । #विद्या
6 September 2018 11:48
इतिहास विषय इतिहास जमा व्हायला हवा होता । जाम boring विषय आणि त्यात शाळेतले शिक्षक धडा नुसता वाचून काढायचे । काही मुलं झोपा काढायची तर काही गप्पा मारत बसायची l पास झाल्याचं श्रेय मात्र क्लास च्या शिक्षकाला जायचं । अश्या विषयांना गुण पेक्षा grade ठेवायला हव्या होत्या की ।
5 September 2018 23:22
कधी कधी पोस्ट सोबत तिथल्या प्रतिक्रिया ही वाचनीय असतात बरं का। ☺️
5 September 2018 00:05
ने*रु काळा इंग्रज होय । त्यांच्या सारखं वागायचा। त्या इंग्रजांच्या पुढे पुढे करायचे गांधी नेहरू । तिथली संस्कृती तर भिनलीच असणार की। इतकं दुसऱ्यांच्या संस्कृतीच समर्थन करताय आई वडिलां सोबत आणि समाजात असे च वागता का ? की नुसती बोलाची कडी बोलाचा भात ।
4 September 2018 21:41
वेड लागलंय ह्याला ।डोक्यावर पडला की काय । की जास्त bollywood movie बघतो । राजकीय नेता म्हणून काहीही वक्तव्य करतात ही लोक । कायदा खिशात घेऊन फिरतात ही लोक ।
4 September 2018 16:43
विषय काहीही असो मोदी ना विरुद्ध करायला काहीही कोणताही विषय चालतो । मग ती गांधी नेहरू खान ची पोस्ट असो।
4 September 2018 15:30
रांगोळी असावी तर अशी। 👌👌
4 September 2018 14:37
आपल्याला इथल्या प्रतिक्रिया वाचून कळलं की मामा भाची इतकी जवळीक असणं म्हणजे modern विचार बरं का । ह्या नेहरू ने सत्ता मिळवण्यासाठी किती हट्ट केला आणि सत्ता मिळवून ही सत्ता उपभोगली किती हे ही माहिती आहे । देशासाठी काम केलं त्यांनी बोलतात । जसे काय स्वतः च्या तिजोरी तले पैसे काढून देशाचा उद्धार केला । पगार मिळतो बरं का नेत्यांना । फुकट काम करत नाही कोणी । आणि सत्ताधारी तर मुळीच नाही । वरची कमाई असते ती वेगळी । राजकीय आयुष्य वेगळं । व्यक्तिगत आयुष्य असत ते वेगळं ।
4 September 2018 14:21
आपल्या इथे सण साजरे करण्या पेक्षा मनोरंजन जास्त असतं । देवाच नामस्मरण करणं कमीच । त्यांचा सण आणि संस्कृती शी काही संबंध नाही ।बाहेरच्या देशात किती छान पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी केली जाते ।https://m.facebook.com/story.php?story_fbid=421312738392929&id=490528224339434
4 September 2018 14:17
आपल्या इथे सणाच्या दिवशी सण साजरे होतं नाही। केवळ मनोरंजन , सुट्टी चा दिवस म्हणून मज्जा मस्ती तर कुठे कलाकारांना बोलवून कार्यक्रम साजरे होतात । पैश्याचा बाजार असतो तो वेगळा । स्पर्धा असते त्यात कोणी जखमी होत कोणी दगवत ते वेगळं । #विद्या
4 September 2018 14:02
देशावर राज्यावर आपत्ती आली की हेच करायला हवं ।☺️ उपाय एकदम भारी आहे । प्रत्येक वेळी जनता कशाला हवी ।
#photonote on #fb
3 September 2018 15:28
ह्यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्यांना काय झालंय काय माहित । किरकिर करणारे भोंगे वाजवतात truck मधून जाताना ।
3 September 2018 13:09
कौतुक, अपमान, टाळ्या, टीका - या सगळ्याची वासना किंवा भय सरलं की मग जे उरतं ते कलेचं खरं दान असतं. Kaushal S Inamdar
2 September 2018 12:38
प्राणी जंगलातच चांगले दिसतात । स्वातंत्र अनुभवताना । ते ही प्राणी संग्रहालया पेक्षा । जिथे प्राण्यांचा छळ होतो तिथे पैसे देऊन केवळ मनोरंजना साठी संग्रहालयाला समर्थन करण्यात काय अर्थ आहे । प्राणी संग्रहालय च करायचं असेल तर जिंवत प्राणी कशाला हवेत । पुतळे उभे करायचे की प्राण्यांचे । #विद्या
31 August 2018 11:15
आलिया भोगाशी असावे समर्थ । ☺️ कलाकारांना डोक्यावर घेतलं रसिकांनी की लगेच स्वीकारतात । एखादी गोष्ट आवडली नाही तर स्पष्टीकरण देत कशाला फिरतात । हे ही स्वीकारावं की । 😆😊



