माझ्या आजूबाजूची लोकं समाज कार्य करतात! समाज प्रबोधन करतात! म्हणून मलाही हुक्की आलेली माणसांना वळणं लावायची मत मांडायची सल्ले द्यायची ! पण अनुभवा नंतर सोडून दिलं ! माणसाने स्वतःला बदलावं स्वतः मधले दोष दूर करण जास्त महत्त्वाचं असतं इतरांकडे बोट दाखवणे सोपं असतं हे कळलं ! फुकटचा वेळ वाया जातो ते वेगळं!
#vidya 7.4.19
राजकारण जिथे तिथे चिखलफेक होतेच ! काहींना एकमेकांची पूजा करणं अपेक्षित असतं ! मुद्दाच बोला फक्त! इतकी समजूदार लोकं काही आपल्या देशात नाही मग जनता असो वा राजकारणी ! आजही निवडणुका भेदभाव करून च लढल्या जातात! ते राजकीय नेते एकवेळ राजकारण निवडणूक झाल्यावर इतरांची गळाभेट तरी करतात! नाहीतर इतर ठिकाणी होणार राजकारण साहीत्य क्षेत्र असो वा नोकरी मध्ये ! ते जास्तच खालच्या पातळीच असतं! 7.4.19
ज्या घरात स्त्रिला सौख्य लाभत नसतं मग मानसिक का असेना! त्या घरात कधीच सौख्याच वास्तव्य नसतं!
आपल्या कडे मानसिक छळ करणाऱ्यां विरुद्ध अजून तरी कायदे आले नाहीत ! मग तिचा छळ झाला असो वा त्याचा! फक्त लग्न झालेल्या बाईसाठी आहे! जी त्या कायद्याचा वापर जास्त करत नाही !So called कौटुंबिक व्यवस्था ! सोशिक वृत्ती ! Mind strong नसणं ! आत्मनिर्भर नसणं! आर्थिक दृष्टीने सक्षम असूनही काही मन कठोर .. खंबीर नसतात ! Mentally harrase someone is criminal offence! But law is only few people.
7.4.19
मला वाचनाचं व्यसन लागलं आहे thanks to my orkut old friends! जे रोज कविता पाठवायचे! आता कोणी शिव्या दिल्या तरी काही फरक पडत नाही किंवा कोणी शहाणपणा चे डोस दिले तरी माझ्यापर्यंत काही पोचत नाही! जे वाचते जे योग्य वाटतं ते घेते ! मनाला वाटत तसं वागून मोकळी होते ! खूप प्रश्नांची उत्तरं वाचना मुळे मिळतात ! काही प्रश्नांची उत्तरं च नसतात ! हे स्वतः वपु नीच मान्य केलं आहे ! सगळ्या भावना व्यक्त करण्यात काही मला दोष वाटतं नाही मग तो टोकाचा राग असो रडणं असो मोठ्याने हसणं असो ! स्वतः चाच वेडेपणा आवडू लागला की जगणं सहज होतं की ! इतरांनी वागणं स्वीकारावं किंवा नाही हा अट्टहास ही नसतो !
7.4.19
कवी संवेदनशील असतो ! लेखक वास्तविक आयुष्याच चित्रण लिहीत असतो!
....
प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते! जीवन जगण्याची पध्दत आणि दृष्टीकोन ही वेगळा असतो! तरीही ज्यांना स्वतःचे विचारच नसतात ते कितीही बौद्धिक क्षमता असली तरी मानसिक दृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून असतात! त्यात काही चूक नाही तरीही !ज्यांना स्वतःचे विचार असतात ते स्वतः च्या किंवा ऐकावे जनाचे करावे मनाचे ! सगळ्या बाजूने विचार करून जगतात! शेवटी निर्णय स्वतःच घ्यायचे असतात ! काही झालं तरी दुसऱ्यांवर तरी आपण खापर फोडणार नाही! #vidya 7.4.19
....
आपल्या इथे celebrity ना खूप च महत्त्व दिलं जातं! त्यांनी कसं वागावं कसं वागू नये! गरज काय आहे कोणालाही सुधारण्याची ! उंटावरून शेळया हाकणं! Celebrity खऱ्या आयुष्यात व्यसनी असेल तुम्ही व्यसनी होणार आहात का? आदर्श असं कोणी नसतं ? आपण स्वतः ही नाही आहोत ! Nobody is perfect. प्रत्येकामध्ये सत्त्व ,रज,तम गुण असतात कमी अधिक प्रमाणात! दुसऱ्याचे दोष दाखवून त्याला बदलण्यात आयुष्य घालण्या पेक्षा स्वतः ला च्या आनंदासाठी झटावं! दुसऱ्याला बदलण्याचा इतका अट्टहास कशाला?
....
आपण जसे आहोत तसे स्वतः ला स्वीकारलं..
इतरांनी स्वीकारलं पाहिजे असा हट्ट नाही ना अट्टहास आहे! मी बोलेन ती पूर्व दिशा इतर जण चुकीचे असं ही काही नाही आहे!
Be yourself .. प्रत्येक व्यक्ति सारख्याच परिस्थितित भिन्न वागू शकतो हेच तर वेगळेपण जपायचं असतं स्वतःच ज्याने त्याने!
दुसऱ्यांना प्रबोधन fb वर करायचं नसतं! खऱ्या आयुष्यात करायचं असतं!
.....
मी माझ्या कर्माची धनी तुम्ही तुमच्या कर्माचे धनी ।
U am not perfect person आणि दुसऱ्यांना perfect करण्यात मला काही च रस नाही आहे!
.....
वर्तमानात जगणं चुकीच नाही ! ज्यांना जमत ते जगतात मग सुखात जगो किंवा दुःखात ! आपण एखादी गोष्ट स्वीकारली की त्रास होत नाही! जगी सर्वसुखी असा कोण आहे ! 7.4.19
स्त्रीचा जन्म पुरुषाचा भोग घेऊन प्रजनन करायला झाला असतो का फक्त? तिला लग्न करावं की नाही करावं हे सुद्धा स्वातंत्र्य नाही का? 7.4.19
जगात फक्त सांसारिक सुख नसतात इतरही सुख असतात ! मग ती आत्मिक सुख असो किंवा मानसिक! 7.4.19
आपण आहोत तसे आपल्याला स्वीकारलं की झालं इतरांनी स्वीकारलं पाहिजे असा अट्टहास कशा साठी ! 7.4.19
स्त्री ने पुरुष होण्याचा अट्टहास का करावा ?? स्त्री ला स्त्री राहण्यात कमीपणा वाटतो का? Vidya 6.4.19
स्त्री भावनिक ही असते आणि कुटूंबाला धरून ही असते ! हे सगळं नाकारणं स्वतः साठी जगणं म्हणजे पुरुषा सारखं वागणं .. ती पुरुषाला follow करायला लागली म्हणू शकतो आपण ! आजूबाजूला कधी पुरुषां सारखं वागणाऱ्या बायका ही दिसतात की !
..
...
कोणत्याही भूमिकेत माणूस चोवीस तास नसतो ।## वपु
....
