धर्माचं शिक्षण

आपल्या  देशात धर्माचं शिक्षण दिले जात नाही.
म्हणून माणुस असंवेदनशील झाला आहे. स्व विकास गरजेचा आहे. Self development हवी . दोन व्यक्तींना संवाद कसा करावा स्वतः सोबत इतरांसोबत कसं वागावं हे शिक्षण दिले जात नाही .  माणूस घडवला जाणं जास्त गरजेचं आहे . नंतर व्यावहारिक शिक्षण देणे गरजेचं आहे.
धर्म सोबत शास्त्र आणि शस्त्र दोन्ही शिक्षण गरजेचं आहे. मन शांत करणं आणि स्वतःचा आणि समाजाचा , देशाचा विकास करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी गुरुकुल काढणं गरजेचं आहे. शिक्षणाचा बाजार नाही तर समूह म्हणून एकमेकांना ज्ञान देणे महत्त्वाचे आहे.

#vidyamsblog

25.1.2025

कुंभ मेळा

कुंभ मेळयात आलेले साधु संत फक्त संन्यास घेत नाहीत तर सनातन धर्मा साठी आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या समाजासाठी भक्ती ही करतात.
आश्रम ही असतात आखाड्याचे जिथे शिक्षण ही दिलं जातं.. 
शास्त्र , व्यावहारिक शिक्षण , शस्त्र शिक्षण सगळं दिल जातं.
Vidya

western culture people lifestyle

आपल्या इथे Western culture हवं तेवढंच स्वीकारतात.
तिकडे पिज्जा बर्गर चीज सारखे पदार्थ खाणारे व्यायाम ही करतात. पालक मुलांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला स्वातंत्र्य देतात. वयस्कर माणसं मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत कोणी गाणी ऐकतात कोणी पुस्तक वाचतात कोणी meditation करतात काही author चे विचार ऐकण्यासाठी खऱ्या आयुष्यात त्यांच्या  कार्यक्रमात उपस्थित राहतात नवीन काही शिकतात काही youtube वर कला सादर करतात... किंवा स्वतःचे विचार मांडतात विडिओ ब्लॉगिंग करून ..
वय झालं म्हणून retired झालो शिक्का लावत नाहीत ना मरायची वाट बघतात 🤣 वृद्धापकाळ स्वा खुशीने स्वीकारतात.

काही काळा नंतर स्वतः साठी सुद्धा आयुष्य जगतात सतत मुलांना सल्ले देणं नसतं .. स्वतःही स्वातंत्र्य अनुभवतात आणि इतरांना ही स्वातंत्र्य देतात !

तिकडे ही कुटूंब व्यवस्था असते!

#vidyamsblog

35 movie

दक्षिण भारतीय चित्रपट आलाय एक अजून hindi dubbing नाही झालं.. एकाने youtube वर review दिला...
चित्रपट तारे जमीन पर च्या उलट गोष्ट दाखवली आहे..
एक मुलगा गणितात नापास होत असतो शाळेतला शिक्षक 
सगळ्यांना मार्क किती मिळाले त्यावरून हाक मारतो कोणाला  १०० कोणाला शून्य तर 
ह्या मुलाला zero म्हणून हाक मारतो आणि त्याच्या मित्राला १०० म्हणून..

अभ्यासात हुशार नाही म्हणून ब्राह्मण कुटूंब असतं त्यातले त्या  मुलाचे वडील सुचवतात शाळा सोडून धर्माचं शिक्षण पूजापाठ  शिक्षण देऊ म्हणून मुलाचे मित्र भेटणार नाही म्हणून मुलगा बैचेन होतो नकार देतो...३५ तरी मार्क घे म्हणून challenge देतात आई स्वतः सुध्दा १० वी नापास ती गणित शिकते मुलाला साथ देते... एकदा मुलगा हरवतो ही ..का घर सोडून जातो .. पूर्ण चित्रपट बघितला की कळेल ..
Hindi मध्ये कधी येतो बघू..

पालक मुलांचं नातं कुटूंबाची गोष्ट दाखवली आहे👍

#vidyamsblog

social media वापर

आज काल fb चा वापर कशासाठी केला जातो?
१. कला सादर करण्यासाठी
२. Marketing करण्यासाठी

Instagram चा वापर 
१. वाचन
२. आयुष्यातल्या घडामोडी सांगण्यासाठी 
३.reel बनवण्यासाठी 
४. marketing 

Twitter 

1. News सांगण्यासाठी 
२. News वाचण्यासाठी

बाई पण भारी देवा

बाई पण भारी देवा चित्रपट बघितला छान आहे.
आज काल च्या काळातलं  स्त्रियांचं आयुष्य ते ही वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच दाखवलं समाजाचा चेहरा , कुटूंबाच वागणं सगळं. 
काही बहिणींची  गोष्ट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी.

बाई पण भारी देवा इथे फक्त विवाहित स्त्रियांवर भाष्य केलं आहे अविवाहित  स्त्रियाची एकही भूमिका नव्हती कारण काय असावं ??

प्रेक्षकांसाठी emotional काही दाखवायला मसाला मिळत नसावा बहुतेक  लेखकांना 😂

#vidyamsblog

बाई पण भारी देवा

बाई पण भारी देवा चित्रपट बघितला छान आहे.
आज काल च्या काळातलं  स्त्रियांचं आयुष्य ते ही वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच दाखवलं समाजाचा चेहरा , कुटूंबाच वागणं सगळं. 
काही बहिणींची  गोष्ट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी.

दोन बहिणींचे वाद होतात एकीला मूल होत आणि एकीला मुलं होता होता राहून जातं. सुख सगळे साजरे करतात दुःखात असणाऱ्या स्त्रीला एकट दुःख सहन कराव लागतं.

तिसरी स्त्री गृहिणी असते सारखे मोबाईल हरवते म्हणून नवरा ऐकवतो..स्वतःच्या कमाईने घे.

चवथी स्त्री हीचा divorce होणार असतो.. तिची आई पण तिचा भूतकाळ काढते मुलीला बघण्याचा कार्यक्रम असताना ही त्या मुला समोर येते चुकून हीच्या शी लग्न करायचं ठरवलं जातं.. नंतर divorce च्या वेळी let go करायला तिची आई शिकवते.. जबर दस्तीने कोणी हाथ पडकला की आपण कसा हाथ झटकतो किंवा धडपड करतो तसं let go कर आणि नात्याला धरून कशाला ठेवते संपलेल्या .. मोकळी हो असा सल्ला देते...

एकीच्या नवऱ्याचा business ची गडबड होते.. कर्ज घेतले असतं आणि ही नोकरी करते आणि नवरा घरी दोन मुलांना सांभाळायला जमत नाही तर हिची मदत घेतो सगळ्या गोष्टी मध्ये...
Stress मुळे हिला वेळे आधीच manapause सुरू होतो..

कर्ज घेणाऱ्या व्यक्ती सोबत बोलायचं, नोकरी करायची, मुलांना फोन वरच समजवायच इतका सगळा stress ..

ह्या सगळ्या बहिणी नंतर मंगळागौर स्पर्धे साठी एकत्र येतात..

ज्या बहिणीला मुलगी झाली असते तिची तब्बेत ठीक नसते.. म्हणून कधी ही बाळ होणार नाही ही surgery करावी लागते..

ज्यात तिची सासू साथ देते आणि मावशी जिला मुलं होता होता राहील ती शेवटी hospital मध्ये तिच्या सोबत असते...

शेवटी बहिणी एकत्र होतात..
त्यात एक बहीण तिचा food चा व्यवसाय सुरू करते आणि एक divorce झालेली तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू करते!

मंगळागौर स्पर्धेत एक जण गाणं गाणार असतं ज्यात तिला सासर्यांनी विरोध केला असतो पण ह्यावेळी ती गाणं गाणार पक्क करते..

बाई पण भारी देवा...

मंगळागौर मधल्या स्पर्धेत फक्त सुवासिनी नाही तर 
एक divorce झालेली आणि एक विधवा स्त्री ही भाग घेते हे ही दाखवलं आहे...

#vidyamsblog
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .