post 30

काही गोष्टी समाजाला दाखवण्यासाठी करतात पालक. वय झाल्यावर मुलं आपला सांभाळ करतील म्हणून त्यांना जन्म देणं.त्यांच्या वर मालकी हक्क दाखवून कधी हिंसा करणं कधी मानसिक त्रास देणं. इतरांच्या मुलांसोबत तुलना करणे.
चाणक्य बोलतात १८ वर्ष झाली की मुलांसोबत मित्रासारखं वागावं.

शिक्षण सुद्धा घेण्याचं स्वातंत्र्य नसतं काही कलाकार जन्माला आले तर त्यांच भविष्य कसं होईल ह्या चिंतेत स्वतःला आणि पाल्याला त्रास देऊन वर्तमानात स्वतः ही जगत नाहीत ना इतरांना जगू देतात.

लहान मुल पडलं की उठत आणि सतत चुका करत करत शिकत इतकं मोकळं सोडावं की.

मराठी संस्कृती सुरवातीला शिक्षण नंतर  नोकरी काय करावी किंवा करू नये यावर पण स्वातंत्र्य नसत.

शिक्षण का करावं 
नोकरी का करावी याच कारण एकच लग्न कसं होणार..
इथे फक्त व्यवहार असतो मुला मुलींची लग्न होत नसतात पैसा बघून होतात...

तो व्यवसाय करत असला तर नाही मुळी...

बायको कशी उच्च शिक्षित हवी.सुगरण हवी 🤣स्वतः मात्र डाळ भात करणार , अंडा फ्राय पर्यंत मजल.

गृहिणी नको पण मुलं झाली की कितीही कमवणारी असो जास्त करून  तिला नंतर गृहिणी केलं जातं!

सुरवातीला फक्त मिरवायला गृहिणी नाही बरं का आमची सून 😂
आमची मुलं इतकी शिकली , आमची मुलं परदेशात गेली, आमच्या मुलाला नोकरी लागली...
आमच्या मुलांनी कर्ज घेतले  हे काय कोणी सांगत नाही..
कर्ज फेडण्यासाठी किती कष्ट करतात मुलं यावर एक शब्द नसतो..

गुजरात मध्ये मुलं मुली settled नसले तरी ती लोक लग्न करून मोकळी होतात फक्त कुटूंब बघतात.

सामान्य घरातला मराठी पालक समाजात मान मिळण्यासाठी किंवा काही गोष्टी मिरवण्यासाठी करत असतात मग त्यात मुलांची तुलना करणं अग्रेसर असतं.

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .