आयुष्य

जितनी चाबी भरी राम ने उतना चले खिलोना ! वयाचा आणि जाण्याचा काही संबध नसतो ओ . जितकं क्षण मिळतील त्यांच सोनं करायचं इतकच आपल्या हातात असतं. पालक असो वा कोणी दुसऱ्याचा राग आपल्या मुलांवर .. जवळच्या व्यक्ती वर काढतात हे मात्र खरं. पण त्याचा त्रास होईल हा विचार सुद्धा त्या पालकांना शिवत नाही.म्हणून मुफट असेललं बरं वाटतं. मानसिक खच्चीकरण करण्यात पालक आणि समाज याचा जास्त हात असतो.प्रोत्साहन देण्यापेक्षा .संघर्ष असला की आजूबाजूचे लोकं चौकशी करतात आणि मग काही उत्तर नाही गवसलं तर इथेही तुलना करतात..  राग मुलांवर काढतात. स्वानुभव. काळ बदलला तरी बाप बदलत नसतो. ऐकावे जनाचे करावे मनाचे .आपल्याला योग्य वाटेल तेच करत राहायचं .स्वतः साठी ठाम राहायचा क्षण गवसला की झालं आपण आपल्या वाटेने चालायला मोकळे.तसही स्वतः ची स्वप्न पूर्ण करायला जन्म मिळाला असतो

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .