शिक्षण आणि माणूस

प्रत्येक पिढी मध्ये संकुचित आणि मोकळ्या विचारांची माणसं असतात. समोरचा चुकतं असला तरी आपण त्याला काही बोलत नाही. मनाने दुखवतील म्हणून नात्यांना किंवा माणसाला स्वीकारलं जातं आणि प्रश्न तसेच राहतात मग. मनाची अंतर वाढली की नातं कसलं टिकून राहणार मग . यावर उपाय म्हणजे वाचन  आणि माणसांच्या भेटी गाठी एकमेकांचे विचार कळतात ..स्वतः मध्ये काय बदल करावा कसं वागावं कसं वागू नये हे ही कळतं.. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरूनही. तरीही हे सांगणारं   शिक्षण हवंच .. ! निदान शिक्षकांनी तरी दयायला हवं .. जपान का जर्मनी मध्ये तीन चार वर्षे व्यक्तीने चार चौघात कसं वागावं नम्र असावं समान वागणूक द्यावी हे शिकवतात .

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .