कोणी कितीही बोललं मराठी बोला तरी इंग्रजी व्यवहारात वापरली जाणारी भाषा आहे . मुलाखत घेतली तरी ती इंग्रजी मधून च घेतली जाते हि वस्तुस्थिती आहे हे कोणी विसरू नका म्हणजे झालं. तेवढी इंग्रजी तर येतेच यायलाच हवी.
बाकी समाजात वावरताना शुद्ध मराठी बोलणं शिकणं गरजेच.
बाहेरच्या राज्यातली माणसं महाराष्ट्रात आली तरी त्यांच्या मुलांना मातृभाषा शिकण्या साठी special class लावतात आणि शाळेत English medium मध्ये पाठवतात .. आपण तर आपल्याच राज्यात राहतो तरी मातृभाषे पेक्षा इंग्रजी भाषेचा अभिमान जास्त ... मराठी शाळेत शिकून हि मराठी आणि इतर भाषा शिकू शकतात कि विद्यार्थी ...पण पालकांचा कल जास्त इंग्रजी भाषे कडेच .. खर्च किती हि झाला तरी English medium पाहिजे ..
हो ना English medium च्या शिक्षणाचा खर्च हि जास्त आणि तिथले शिक्षक मराठी शाळेतले संस्कार तरी देतील का . पालकांना मातृभाषेचा कमीपणा .. माझ्या ऐकण्यात आलेलं मागे उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर स्वतः हुन सांगायचे अभिमाने मुलांना त्यांनी मराठी शाळेत घातलं म्हणून ...
#विद्या

0 comments:
Post a Comment