atrocity कायद्याचा गैरवापर म्हणतात ह्याला...
धर्म जाती वर राजकारण नुसतं... आरक्षण आर्थिक आधारावर मिळावं किंवा प्रत्येक जाती साठी टक्के ठरवलेले बरे...#विद्या
धर्म जाती वर राजकारण नुसतं... आरक्षण आर्थिक आधारावर मिळावं किंवा प्रत्येक जाती साठी टक्के ठरवलेले बरे...#विद्या
---------------------
कोपर्डी येथील बालिकेच्या अत्याचार हत्या प्रकरणामुळे आता धनंजय सुद्रिक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला उजाळा मिळाला आहे. त्यावेळी पोलिसांनी वस्तुनिष्ठ तपास केला, तर कदाचित बालिकेच्या हत्येचे प्रकरण घडले नसते, असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. १५ डिसेंबर २०१५ रोजी कोपर्डी येथील धनंजय जयवंत सुद्रिक, त्यांचे सहकारी अक्षय गोरख सुद्रिक, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र बाबालाल शिंदेचा चुलतभाऊ शांतीलाल शिंदे विजय शिंदे हे चौघे धनंजयच्या नेटकेवाडी येथील मेहुण्याच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले होते. त्यावेळी हे सर्वजण खूप दारू प्यायले होते. रात्री ११ वाजता हे चौघे धनंजयच्या सासूरवाडीला घराच्या छतावर झोपले होते.
धनंजय पहाटे साडेचार वाजता कोपर्डीला आपल्या घरी जाणार होता. धनंजयची बायको नंदा घराच्या छतावर गेली, तेव्हा तो तेथे नव्हता. तिने तेथे झोपलेल्या शांतीलालला विचारले असता धनंजय खाली गेल्याचे त्याने सांगितले. मात्र, धनंजय खालीही नव्हता. घराच्या पाठीमागे आवाज येत असल्याने नंदाने वरून खाली पाहिले असता धनंजय खाली पडला असल्याचे दिसले.
शांतीलाल शिंदे विजय शिंदे यांनी मागील भांडणाचा राग मनात ठेवून धनंजयला छतावरून खाली टाकल्याचा आरोप नंदाने केला. धनंजयला खासगी रुग्णालयात तेथून पुढे बारामतीला उपचारांसाठी नेण्यात आले. उपचारांदरम्यान धनंजयचा तेथे मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू जबर मारामुळे झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आला. मात्र, पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद कशी काय केली गेली याचे गौडबंगाल कायम आहे. यात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. शांतीलाल विजय शिंदे यांची गावात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणीही धजावत नव्हते.
पोलिसात तक्रार करू नको, असा दम शांतीलालने दिल्याचे नंदा सांगते. पोलिसांनीही आरोपींना पाठीशी घालून नंदाची तक्रार एेकून घेता आरोपींची बाजू घेतली. आरोपी शिंदे याचे नाव घेतल्यास ते दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा वापर करून तुला कायमचे अडकवतील, अशी धमकी दिली गेल्याचा आरोप नंदा करत आहे.
मोकाट सुटल्याने आरोपी आणखी उन्मत्त झाले. नंतर हे आरोपी नंदाला तिच्या घरच्यांना सांगू लागले की, आम्हीच तुमच्या धनंजयला मारले. आपल्या मुलांच्या जीवाला काही धोका होऊ नये, म्हणून आपण गप्प बसून सगळे दुःख बाजूला सारले. मात्र, शिंदे बंधूंचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. याची दखल पोलिसांसह कोणीच घेतली नसल्याची तक्रार नंदा हिने केली आहे.
नंदाला दोन मुली एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत शिकते, तर दुसरी सातवीत आहे. मुलगा पाचवीत शिकतो. कुळधरण येथे शाळेत ते जातात. त्यांचे रस्त्यात बरे-वाईट केले जाऊ शकते. आपणही रानात मजुरीसाठी एकटे जातो. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आपले पती जाऊन सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होऊन गेला, तरीही न्याय मिळालेला नाही, असे नंदाचे म्हणणे आहे.
नंदाला दोन मुली एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत शिकते, तर दुसरी सातवीत आहे. मुलगा पाचवीत शिकतो. कुळधरण येथे शाळेत ते जातात. त्यांचे रस्त्यात बरे-वाईट केले जाऊ शकते. आपणही रानात मजुरीसाठी एकटे जातो. आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आपले पती जाऊन सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी होऊन गेला, तरीही न्याय मिळालेला नाही, असे नंदाचे म्हणणे आहे.
#अनामिक #बातमी

0 comments:
Post a Comment