शारीरिक स्वास्थ्य जितकं महत्त्वाचं असतं तितकं मानसिक स्वास्थ सुद्धा !पण आपल्या कडे आजारी माणूस म्हणजे शारीरिक फक्त आजार असणारच असतो! मनाच्या आजारा कडे कोणाचच लक्ष नसतं!ना स्वतः च ना इतरांचं! माणसाचा सर्वात मोठा शत्रू आणि मित्र कोण असेल तर तो मन आहे! ते स्थिर नसेल तर काहीच स्थिर नाही! अस्वस्थ चित्त ना स्वतः ला आधार देऊ शकत ना इतरांना! जागरूकता कमी असावी की मानसिक स्वास्थ्याकडे इतकं दुर्लक्ष केलं जातं! माणसाने उंची गाठली की तो एकटा एकाकी जीवन जगतो! संवाद हीन आयुष्यच मग घात करत! दुसऱ्यांना impress करण्याच्या नादात मी सामान्य नाही मी असामान्य आहे ! अपमान सहन न होणे , परिस्थिती न स्वीकारणं, समस्या पेक्षा समाधान काय यावर विचार न करणे! ही सगळी कारण पुढे येतात! जितक्या सहजपणे शारीरिक आजाराकडे लक्ष देतो दूर व्हावा म्हणून डॉक्टर कडे जातो तितक्या सहजपणे मानसोपचार तज्ञा कडे अस्वस्थ व्यक्ती ने जायलाच हवं! नाहीतर चुकीचे विचार घात करतात! एवढं नक्की!
#vidya
Never ignore mental health.

0 comments:
Post a Comment