संवाद
संवाद
संवाद नात्यांना जोडणारा एक दुवा
..संवाद कधी भाषेतून होतो ,कधी देह बोलीतून,कधी मौनातून ,कधी अंतकारणातल्या शांततेतून आलेला एक हुंकार आपलेपणाची जाणीव , आपलेपणाची एक ओढ घेऊन येतो त्याला अंतर्नाद म्हणतो.
ब्रह्मज्ञानी संत निराकराशी मौनातून संवाद साधतात ... मनाची शांती अनुभवतात.
संवाद फक्त माणसांसोबत नसून निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी सोबत सुरू असतो एकमेकांचा की आपला.फुलांचा गंध मन प्रफुल्लीत करतो . पक्ष्यांच्या किलबिलाट सृष्टी मध्ये नवं चैतन्य निर्माण करते
संवाद 2
एका हाताने टाळी वाजत नाही तस दोन व्यक्ती मध्ये संवाद व्हायला एकालाच रस असणं पुरेसं असत नाही ।
संवाद कधी इतरांसोबत साधतो कधी स्वतः सोबत ।वपु बोलतात दोघां मध्ये होतो तो संवाद आणि तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात
निसर्गाच्या विरुद्ध वागलो तर निसर्गाचा कोप होतो हा सुद्धा निसर्गाने आपल्या सोबत साधलेला संवादच की।
संवादासाठी शब्दांची भाषाच अनिवार्य आहे असं नसतं। संवाद आईच्या कधी जिवलगा च्या स्पर्शातून होतो कधी नजरभेटीतूनही होतो ।
मनाच्या नात्यासाठी सह वासाची गरज नसते संवादात खंड पडला कधी भेटी होतं नाहीत म्हणून दुरावा आला तरी पुन्हा भेट होता तेव्हा सोहळे होतात ।
#vidya
6.1.18 आणि
7.1.18

0 comments:
Post a Comment