प्रवास करण्यापूर्वी च्या गोष्ट

फिरायला जायला पहिलं महत्त्वाची गोष्ट सोबत उत्तम हवी 🤣दोनदा चुकीच्या सोबती मुळे वाईट अनुभव आलाय ! फक्त fb वर ओळख आहे म्हणून बायकांसोबत गेली होती फिरायला एकदा गुजरात संमेलन निमित्त ,  दुसऱ्यांदा कोकणात !
दोघेही लिखाण करायच्या कविता किंवा लेखन करायच्या म्हणून ओळख झाली !
इथे मला ताई बोला बोलणारे प्रत्यक्षात मात्र मैत्रिणी सारखं वागवत नाही तर वयाने मोठे आहोत हे सतत जाणीव करून देतात किंवा  काही चुका झाल्या प्रवासात तर दुसऱ्याला दोष देतात ! त्यापेक्षा चांगली ओळख खऱ्या आयुष्यात असल्या शिवाय आणि आपल्या वयाच्या आसपास च्या व्यक्ती बरोबर जाणं निवडावं 🤣 नाहीतर वयाने मोठ्या मैत्रिणी निवडल्या वर   पालकां बरोबर फिरलो असतो तर बरं झालं असत अशी वेळ ही येऊ शकते ! 

दुसरं म्हणजे तिकीट पासून गाडी कितीला पोहचणार सगळी चौकशी करायची . आपण योग्य ठिकाणी पोहीचलो का स्वतंत्र फिरत असताना याची खात्री करून नंतर हॉटेल बुकिंग करायची असते .रिक्षावाले फसवायला च बसले असतात ! 😎 दोनदा प्रवास करून मिळालेलं शहाणपण  ! अज्ञानात सुख नसत ! हेच खरं ! 🤣

#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .