कोकण प्रवास

कोकण रत्नागिरी देवरुख मध्ये गेली होती राज आणि प्राजक्ता यांची भेट झाली .
(18.12.2020 _22.12.2020)

दिसायला लहान आहेत फक्त पण माहिती खूप असते यांना समाजात काय चालले आहे काय बरोबर काय चूक ते!
एक राज आहे त्याचे वडील dj event management चा व्यवसाय करतात . त्याच्या काकांच दुकान पण आहे. वडलां बरोबर जातो तो. गावात दारू पिऊन एक जण गेला , दारू वाईट असते .या वयात कळलं. वडलां सोबत जातो म्हणजे सगळी मोठी मंडळी. तिथे व्यसन लागण्याची शक्यता पण मुलगा हुशार दारू ,सिगरेट कोणी दिल तरी नाही बोलायला शिकला !☺️ 

दुसरी आहे प्राजक्ता ती गाणं गाते. गाणं लिहिते ही . इतक्या लहान वयात कला असणं म्हणजे वरदान देवाचं.

तिचे वडील शेळी पालन चा व्यवसाय करतात .आजी गोधडी च काम करते सामाजिक संस्थेत चार पैसे मिळतात . आई सुद्धा काम करते दुसऱ्या च्या घरी.

राज ची आई आणि प्राजक्ता ची आजी सामाजिक संस्था मध्ये  काम करतात . तिथे गोधडी आणि इतर गोष्टी कापडी पिशव्या बनवायचं , purse  वैगेरे बनवायचं काम असते. 
पैसे मिळतात.

मी संस्थेच्या इथे भेट द्यायला गेली होती एकी सोबत . त्यांचं शिबीर होतं रेकी च.

मला कोकण बघण्यात रस म्हणून आम्ही तिघे दुसऱ्या रूम मध्ये बसलो. 

मग ओळख झाली आमची .🤣😊

कोकणातल्या गजाली यांच्या कडून कळल्या. Lockdown मुळे शाळेत जायला मिळत नव्हतं. खेळून खेळून किती खेळणार असं राज म्हणत होता 😆

त्यांना पण शाळा कधी सुरू होते याची वाट बघत होते.

Tailoring मुळे स्त्रियांची पाठ दुखते आजार होतो हे सुध्दा यांना माहिती दोघांना . कोकणात लग्न होण्यासाठी शिवणकाम कमीत कमी शिकवलं जातं . 

कोरोना च्या काळात कसं आहे तिथलं वातावरण कसं होतं हे मला या मुलांनी सांगितलं.

❤️

प्राजक्ता काळी आहे म्हणून तिला समजाचा वाईट अनुभव आलाय . मी बोलली त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस.

Miss universe का Miss world जिंकलेली काळी च होती देहाने .

मी ज्याच्या कडे राहायची त्या अति शिकलेल्या लोकांना काही माहिती नसतं 🤣mask सुद्धा लावायचं कसं ते ही.

माझा शेवटचा दिवस या दोघां मुळे चांगला गेला. नाहीतर आजूबाजूला पैसे ,स्वार्थी माणुसकी नसलेल्या बायका  होत्या  माझ्या.
ज्याच्या सोबत मी संपर्क तोडला. 

© #vidya ms life

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .