लैंगिक शिक्षण

लैगिक शिक्षण 
© vidyamslife:

काही जण स्त्री पुरुषांकडे फक्त ह्या दोन जाती आहेत म्हणून बघतात!
साधी मैत्री असली तरी नजर दूषित करतात!
काही नाती ही मना ची ही असतात फक्त
शरीराची नाही
शरीराच्या पातळीवर असते ती निव्वळ
वासना!

वासनांध नजरा स्त्रीचा शोध घेत असतात
कधी कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात
कधी कोणत्या नातेवाईकांच्या लग्न
सोहळ्यात

स्त्री सोबत दूरच नातं असलं तरी ताई म्हणून
घरच्यांना ताब्यात घेतात
घरी येतात सतत!
एका अघटित क्षणी कोवळ्या कळी ला फुलण्या आधीच
कुस्करण्याचा बेत घालतात एकांतात

फक्त दोघे असताना एका खोलीत
कधी वासनांध असुरांचा बेत फसतो कधी सफल होतो
अश्या असुरांपासून लहान मुलांना
वयात आलेल्या मुलांना सावध करायचं असतं
स्पर्श काय
अनोळखी कोण याची जाणीव
पालकांनी च करून द्यायची असते
नाही तर कोवळ्या कळी च्या मनावर घाव सतत भरून राहतात
वासनांध नजरा दृष्टी क्षेपात येता
दूर मन घेऊन जात त्या असुरा पासून
जीव स्वतः चा मुठीत घेऊन वाचवत
शेवटी मोकळा श्वास घेत!
देवाचे आभार मानत

!

#विद्या #लैगिकशिक्षण


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .