post. 6

अति सर्वत्र वर्ज्ययेत !
कोणतीही गोष्ट अति करू नये.

जे अति शिक्षण घेतलेले असतात ...व्याकरण .. शब्द संपदा उच्च दर्जाची वापरायची वाचन करायची सवय झाली असते त्यांना  वाचकां सोबत संवाद सुरू आहे हे विसरून गेले असतात ! तुमची प्रतिभा ,तुमचं व्यक्तिमत्त्व सुंदर , तुम्ही सामान्य माणूस म्हणून कधी जगलात का ... वपु  आवडतात कारण उच्च दर्जाचे लिहीत नाहीत ! रोज च्या जीवनातल्या गोष्टी लेखनात उतरवतात ! रसिक म्हणून आपण फक्त शिकत राहायचं आयुष्य , माणसांच्या मनाचं भाव विश्व  आणि समाज मन ! आणि स्वतःला घडवत राहायचं ! वाचनाने माणूस समृद्ध होतो! वाचन कोणतं करावं ही निवड करण्यास प्रत्येक जण स्वतंत्र आहे ! (लेखकांसाठी आहे कवी साठी नाही !) काही काही लेखन भावना शून्य असतं ! भावनेचा गंध नसतो नुसती प्रतिभा झळकत असते त्या त्या लेकणकर्त्या ची ! चं गो च लेखन भावना प्रधान असतं आणि त्या दोन लेखनाची तुलना केल्यावर झालेलं आकलन आहे !
(C) #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .