काळ जुना होता
अंग झाकायला कपडे नव्हते,
तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे
आज कपड्यांचे भंडार आहेत,
तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता, रहदारीची साधने कमी होती.
तरीही कुटुंबातील लोक
भेटतं असत
आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.
अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता,
घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.
आजची मुलगी ही
शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता, लोकं
गावातील वडीलधार्यांची
चौकशी करायचे
आज पालकांनाच
वृद्धाश्रमात ठेवले जाते
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता,
खेळण्यांचा तुटवडा होता.
तरी शेजारची मुलं
एकत्र खेळायचे.
आज खूप खेळणी आहेत,
मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता,
रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा
भाकरी दिली जायची
आज शेजारीच मुलंही
भुकेली झोपी जातात
समाज सुसंस्कृत झाला आहे.
*
काळ जुना होता,
शेजारच्या व आपल्या घरी
नातेवाईक भरले असायचे
आता परिचय विचारला तर
आज मला शेजारचे नावही माहीत नाही.
समाज सुसंस्कृत झाला आहे.
😔🙏‼️
(साभार : राजस्थानचे वर्गमित्र ग्रुप)

0 comments:
Post a Comment