माणसं सगळं काही बदलू शकतात पण आपल्या आयुष्यातल्या
त्या त्या व्यक्तींचं स्थान नाही बदलू शकत ! प्रत्येक जण काही तरी मनावर ठसा उमटवत .. चांगले कोणी वाईट .. माणसांना भेटून ,संवाद करून ओळखी होतात! कोणीच कोणाची जागा घेत नस तं इतकी नाती घट्ट असावीत ! जी नसतात ठाम विश्वास ,जिव्हाळा , आपुलकी ,माणुसकी नसते ती खरी नातीच नसतात ! त्यात ही आई च आणि मैत्री ची नाती निस्वार्थी असतात ! म्हणून मैत्री हवी च प्रत्येक नात्यात मग पालक ,मुले का असेनात! मानसिक त्रास ,नात्यांची गुंतागुंत कमी होते . अपेक्षा कमी आणि समजून घेणे जास्त! समाज पण आपलाच असतो ! काही परिपूर्ण समाज नसला तरी आपण आपलं आपल्याला हवं ती गोष्ट करायला स्वतंत्र्य आहोत फक्त आपल्या मुळे इतरांना त्रास नाही व्हायला ही एकच अट असते! इतका माणूस दुसऱ्याचा विचार करून जगला तर माणुसकी तरी टिकेल! माणूस म्हणून जन्माला आलेले काही सगळे माणूस
नसतात हा स्वनानुभव ह्यात स्त्री पुरुष दोघे ही आले. व्यक्ती तितके स्वभाव !
पु ल बोलतात तसं ज्यांच्या सोबत wavelength जुळेल तिथे मैत्री होते. नाहीतर सोबत असूनही काही मनाने सोबत कुठे असतात. ह्यात रक्ताची नातीही आलीच की जी आपण काही ठरवलेली नसतात. नातं जपायला फक्त समजून घेणे इतकंच महत्त्वाचे असत! जुन्या मैत्रिणी ला फोन केला काही वर्षांनी मग सहजपणे बोलणं सुरू काही नको ते प्रश्न राग वैगरे काढण्या पेक्षा मैत्री असावी मनात अपेक्षा कमी पण मन मात्र एकदा जुळा वीत की धागा मैत्रीचा
शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देतो !
(C) #vidyamslife

0 comments:
Post a Comment