मन वाचायला शिकली असती तर जास्त देह आठवला नसता!सतत देहाच्या गोष्टी अमुक अमुक माणूस असा दिसतो नी तसा दिसतो! देहाच सौंदर्य नाकारलं नाही आहे. पण उत्तम कलाकार उत्तम दिसणे असल तरी स्वभाव उत्तम नसेल तर सगळ्या गोष्टी शून्य मग कितीही श्रीमंत असो.
आंघोळ करून देह धुतला जातो की पण मन नाही त्यासाठी वाचन हव नाहीतर आध्यात्मिक गोष्टी मध्ये तरी मन रमावे. वय झाल्यावर नामस्मरण कमी चिडचिड जबाबदारी कडे इतक लक्ष जात की मनुष्य देह फक्त पैसे कमावणे खाणे अणि जनावर सारखं आयुष्य व्यतीत करणे ह्यात जातो. जन्म मरणा चा फेरा पुन्हा सुरू होतो.
पुन्हा तेच तेच. द्वैत करून अद्वैत चा प्रवास माहिती असला तर आध्यात्मिक प्रवास सुखरूप होतो गुरूच्या आशिर्वादाने .
प्रत्येकाच्या आयुष्याच उद्दिष्ट आणि ध्येय ज्याच त्याने ठरवायचं असत.
कर्मांची फळे मिळतात ज्याला त्याला .
#vidyamslife

0 comments:
Post a Comment