post 84

आमच्या समोरच्या मंदिरात  एकदम मोठ पण नाही पण भजनी मंडळ बसेल अस छान केल आहे ...
जिर्णोद्धार करून. आज काल रोज शनिवारी भजन असत.
लहानपणी  मी माझ्या शेजारच्या काकां बरोबर  आरती करायला जायची तेव्हा फक्त गाभारा असायचा .आम्ही दोघे मालवणी  आणि  ते  तळाला रहायचे. 
सगळया  बातम्या  खिडकीवर  मिळायच्या ..श्रीराम  काका त्यांच नाव . मला गजानन  महाराज यांच्या  मंदिरात  आठवी त का सातवीत असताना  घेऊन  गेले.  ह्या  वर्षी  त्याच मठाच्या  मदतीने  वडि लां च डोळ्यांच मोतीबिंदू  च ऑपरेशन  झाल. .कमी पैशात.

एक वाटेत स्वतःच्या  पाठीवर  फटके  मारून  पैसे  कमावणारा भेटला ..
तर  काका बोलले  काही लाल वळ येत  नाही. 
रंग आहे तो.🤣

इंग्रजीचे रोज  पाच  शब्द  वाच बोललेले  पण मी काही ऐकल   नाही. तेव्हा लय अवघड  वाटायची भाषा. 

आता वाचन करून थोडी थोडी जमते आहे. 

भगवद्गीतेतला एक तरी श्लोक सांगायचे  .. काका त्यां  च्या  ओळखीच्या  व्यक्ति ना  ..किंवा मित्र  मंडळी  ना. 
मला  पण  सांगितला  होता. पण  अर्थ  वय  झाल्यावर 
कळला.

सात्विकता उपजतच असते काही मध्ये. त्या साठी अनुकरण कोणाचे करायची गरज च नसते. 

नंतर  मुलगा त्यांचा कितीही सांगत असला की  त्यांच्या  सारखा  दिसतो तरी गुण  कुठे  असतात व्यक्ती च 

 वेगळे पण  त्यातच असत  की. .

   (C) #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .