कविता जास्त करून वास्तव वादी कमी आणि कल्पना विलास अधिक असतो म्हणून वैचारिक लेखन जास्त आवडायला लागलं मला तरी ! वाचन करता करता माणूस नव्या गोष्टी शिकतो आणि स्वतः मध्ये बदल घडवून आणतो !
#vidyamslife
आपल्याला नियतीने सुंदर समृद्ध बालपण दिलं होतं हे जेव्हा कळत तेव्हा नक्कीच देवाचे आभार मानावेत !
काही जण तर वेळे आधीच मोठी होतात आणि घराची जबाबदारी घेण्यासाठी कला क्षेत्रात पाऊल टाकतात ! ज्या वयात छान खेळायचं मज्जा करायचे दिवस असतात त्या वयात घराला आर्थिक मदती साठी खारीचा वाटा उचलतात च ही वयाने लहान मुलं पण वेळे आधी मोठी झालेली मुलं !
#vidyamslife
एखादं उद्दिष्ट गाठण्यापेक्षा त्या आधी च आयुष्य जगण्यात जास्त मज्जा असते खूप सारे चढ उतार असतात ..पण आपण चालत राहायचं ! एक ना एक दिवस ध्येय पूर्तीचा निःश्वास सोडतं मन ! #vidyamslife

0 comments:
Post a Comment