post 2

 आपल्या समाजात वय  
(जे नैसर्गिक पणे वाढत. काही कष्ट करावे लागत नाही.)  वाढलं की आम्ही आता मोठे झालो आमच्या हातून चुका कश्या घडतील ..जन्म लहानांना सल्ला देण्यासाठी झालाय.  वय नुसतं वाढून काय उपयोग ज्ञानात भर पडली का ?
नम्रभाव आहे का आधी मुळात नवीन काही शिकायला! परदेशात भारतीय ज्ञान घेऊन जातात आणि कोणी योग (yoga) शिकत तब्बेत ठीक राहावी म्हणून तर कोणी Meditation करत !
प्रत्येक जण स्वभावानुसार आपल्याला हवं ते ज्ञान  घेतो किंवा निवडतो आणि आयुष्य स्वतः च आधी कसं समृद्ध करता येईल ते बघतो. आयुष्य घालवत नाही चिंता करत आणि दुसरी गोष्ट प्रत्येक व्यक्ती ला स्वातंत्र्य असतं त्याला हवं त्या क्षेत्रात काम करण्याच जे पालक देतात! नाहीतर आपल्या इथे मालकी हक्क गाजवणारे जास्त असतात! काही पालक तर समाजात नाव मिळावं म्हणून मुलांना मानसिक त्रास देतात! तर काही आधी च नकाराची घंटा हे करू नको तिथे पैसा किती मिळेल शास्वती नाही! कलाकार एक कमी होतो आणि डॉ बनते ती व्यक्ती मग मन मारून!

माणूस चुका करतो स्वीकारणारे कमी असतात! ताज उदाहरण माजी नामधारी मुख्यमंत्री! 
एक वेळ मित्र बोध नाही झाला तरी चालतो पण शत्रू बोध व्हावा! सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो उगाच बोलतात का? 
शत्रू  तुम्ही सावध नसताना विष पेरून जातो आणि नंतर अधोगती निश्चित ! संघटना असेल हुकूमशाही , अहंकार असेल तर ह्रास ,बदनामी 
निश्चित होते ! 

माणसाला स्व विकास , आत्म विकास करायचा असेल तर कायम विद्यार्थी रहावं! पूर्व जन्मीच्या  कर्मामुळे मनुष्य जन्म मिळाला त्याचा लाभ घ्यावा की! माणसा चा विकास झाला की समाजाचा होतो! जपान उत्तम उदाहरण!

आर्थिक , सामाजिक , मानसिक रीत्या सक्षम समाज च पुढे जातो ! नाहीतर संकुचित विचारांची कमी नाही आपल्या समाजात ! विकसित देशा सोबत तुलना केली की सापडेल की उत्तरं!


(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .