काहींचा स्वभावच असतो प्रवाहा विरुद्ध वाहण्याचा ! प्रत्येक वेळी प्रवाह बरोबर असतो कुठे ? आपण आपल्या विचारावर ठाम राहायचं सामर्थ्य असावं लागतं किंवा असतंच जे मिळालेल्या ज्ञाना मुळे मिळतं! म्हणून सतत वाचन सुरू ठेवावं विचार प्रगल्भ होतात! मग समाजाच्या ८० % हून अधिक विचार आपल्या मनात असणारे आपल्या वर हुकूमत गाजवू शकत नाहीत ! निदान प्रत्येक जण इतकं तरी जागरूक असावं की कर्म आणि विचार आपलेच आहेत ! मग माणूस निर्भय होतो आयुष्य जगायला स्वतःच्या विचारांनी !मन मारून जगण्या पेक्षा किंवा स्वतः च्या स्वभावा विरुद्ध जगण्यापेक्षा स्वतःच्या विचारांनी सारासार बुद्धी ने विचार करून आयुष्य जगणं कधीही उत्तमच असतं !
© #vidyamslife


0 comments:
Post a Comment