post 1Article

ऐकावे जनाचे करावे मनाचे ! 
एक गोष्ट आयुष्यात शिकली मी.
खरं तर आपल्या भारतीय समाजाने च शिकवली .
तुमच्या आयुष्यात जरा काही वेगळं झालं तर समाज पाठ फिरवतो.

आई गावी गेली . सात इमारती पण एक ही जण आलं नाही घरी ना खाली ह्या स्वार्थी , माणुसकी नसणाऱ्या निदान आमच्या भागातल्या तरी ..
साधी  board वर सूचना सुध्दा लिहिण्याची तसदी घेतली नाही . अमुक अमुक व्यक्ती च गावी निधन झालं वैगरे.

आई गेल्यावर त्या लोकांना जणू काही ते कायम अमर आहेत आणि आम्हाला बघून त्यांना मृत्यू ची आठवण होते जणू म्हणून लांब लांब राहू लागले आम्हा भावंडा पासून . बायका समोर असून सुद्धा ओळख दाखवत नव्हत्या.

२.
माणसाने आत्म निर्भर व्हावं .
ह्या समाजाला आणि पालकांना कोणी काय संघर्ष करतोय माहिती नसतं आणी फुकटचे सल्ले द्यायला यांच्या कडे फावला वेळ खूप असतो.

खूप दिवसांनी खाली बसायला गेली तर एक मराठी शेजारी दुसऱ्या इमारती मधली मुलं अमेरिका आणि लंडन तरी पैसा नाही यांच्या कडे  अश्या गप्पा करत होती.  विषय काय तर महागाई . दुसरा विषय लहान मुलं. स्वतः लहान असताना सुद्धा मोठ्यांनी जागरण केली होती की ... आता यांना स्वतः च्या घरातल्या लहान मुलांचा च त्रास होतोय..

भारतीय समाज संकुचित आहे आणि काही पिढ्या तरी राहील असंच दिसतंय सध्या तरी! आपण शिकायचं आणि  आपला मार्ग स्वतंत्र आपण निवडायचा इतका आत्मविश्वास आयुष्य जगायला पुरतो.
समाजाला आणि कोणाला म्हणजे पालक मालका सारखे वागले तरी त्यांना स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही.

प्रत्येक पाल्याला आई वडीलांनी किती कष्ट घेतले याची जाणीव असली तर आज ना उद्या विकास , प्रगती , हवा तो मार्ग नक्की सापडतो .
(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .